Virat Kohli Record IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना १ मार्चपासून इंदूरमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यात विराट कोहली एक खास विक्रम करू शकतो. कोहलीने आतापर्यंत भारतासाठी ४९२ सामने खेळले असून २९९ झेल घेतले आहेत. इंदोरमध्ये एकदा त्याने एक झेल घेतला की तो देशासाठी ३०० झेल पूर्ण करेल. ही कामगिरी करणारा कोहली हा दुसरा भारतीय खेळाडू ठरणार आहे. विराटच्या आधी राहुल द्रविडने ही कामगिरी केली आहे. द्रविडने देशासाठी ५०९ सामन्यांमध्ये ३३४ झेल घेतले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रॉस टेलर आणि पाँटिंगच्या क्लबमध्ये सामील होतील

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत सहा खेळाडूंनी ३०० किंवा त्याहून अधिक झेल घेतले आहेत. या यादीत पहिले नाव आहे श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेचे. जयवर्धनेने ६५२ सामन्यात ४४० झेल घेतले आहेत. त्याच वेळी, दुसऱ्या स्थानावर रिकी पाँटिंग आहे, ज्याने ५६० सामन्यांमध्ये ३६४ झेल घेतले आहेत. न्यूझीलंडच्या रॉस टेलरने ४५० सामन्यांत ३५१ झेल घेतले असून तो तिसऱ्या स्थानावर आहे. जॅक कॅलिस ३३८ झेलांसह चौथ्या आणि राहुल द्रविड ३३४ झेलांसह पाचव्या स्थानावर आहे. स्टीफन फ्लेमिंग ३०६ झेलांसह सहाव्या स्थानावर आहे. आता विराट कोहली अशी कामगिरी करणारा सातवा खेळाडू होण्याच्या जवळ आहे.

स्लीपमध्ये कॅच सोडताना विराट

विराट कोहली हा जगातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकांपैकी एक आहे पण अलीकडे त्याने स्लिपमध्ये बरेच झेल सोडले आहेत. २०२२ मध्येही स्लिपमध्ये सर्वाधिक झेल सोडणाऱ्या खेळाडूंच्या यादीत त्याचा समावेश होता आणि २०२३ मध्येही त्याने स्लिपमध्ये बरेच झेल सोडले आहेत. यातील अनेक झेल खूप अवघडही आहेत, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर कोहलीसारख्या खेळाडूकडून असे झेल घेणे अपेक्षित आहे. मात्र, विराट इंदोरमध्ये झेल घेईल तसेच बॅटने धावा करेल आणि क्रिकेटच्या प्रदीर्घ फॉरमॅटमध्ये शतकांचा दुष्काळ संपेल, अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा: IND vs AUS 3rd Test: भारतीय संघात केले दोन बदल, मोहम्मद शमीऐवजी उमेश यादवला मिळाले संघात स्थान

विराट कोहलीने नोव्हेंबर २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत शेवटचे शतक झळकावले होते. तेव्हापासून तो देशासाठी एकही सामना जिंकणारी खेळी खेळू शकलेला नाही. इंदोर कसोटीतील पहिल्या डावात विराट कोहली २२ धावा करून बाद झाला. त्याला टॉड मर्फीने एलबीडब्ल्यू आऊट केले. कोहलीने बाद होण्यापूर्वी ५२ चेंडू खेळले. त्याने आपल्या खेळीत दोन चौकार मारले.

आज सामना सुरू झाल्याच्या तासाभरात भारताने पाच विकेट गमावल्या आहेत. भारताची धावसंख्या सध्या ४५ धावा आहे. तिसऱ्या कसोटीत भारताची सुरुवात खराब झाली. रोहित शर्मा (१२), शुबमन गिल (२१), चेतेश्वर पुजारा (१), रवींद्र जडेजा (४) आणि श्रेयस अय्यर (०) तंबूत परतले. आतापर्यंतच्या सामन्यात ऑस्ट्रेलियन फिरकीपटूंचे वर्चस्व राहिले आहे. मॅथ्यू कुह्नेमनने रोहित, शुबमन आणि श्रेयसला बाद केले. त्याचवेळी नॅथन लायनने चेतेश्वर पुजारा आणि रवींद्र जडेजाला बाद केले. कोहलीला साथ  देणारा यष्टीरक्षक श्रीकर भरत (१७) धावा करून बाद झाला. भारताने २५ षटकात ७ गडी गमावून ८२ धावा केल्या आहेत. सध्या रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल खेळपट्टीवर आहेत.

हेही वाचा: IND vs AUS 3rd Test: कांगारूंसमोर भारतीय फलंदाजांच्या दांड्या गुल, पहिल्या सत्रात निम्मा संघ तंबूत

या मालिकेत भारत २-० ने पुढे आहे

भारताने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. नागपुरातील पहिली कसोटी भारताने एक डाव आणि १३२ धावांनी जिंकली होती, तर दुसरा सामना दिल्लीत सहा गडी राखून जिंकला होता. या मालिकेतील एकमेव शतक भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या बॅटने झळकावले. ज्याने नागपुरात १२० धावांची शानदार इनिंग खेळली होती. दोन्ही संघांच्या फिरकी गोलंदाजांनी चेंडूने कमाल केली आहे. भारताकडून अश्विन आणि जडेजाने विकेट घेतल्या आहेत. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाकडून टॉड मर्फी आणि नॅथन लायनने विकेट्स घेतल्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus king kohli can match this special record of coach dravid in indore will join this club with potting avw
First published on: 01-03-2023 at 11:45 IST