India vs Australia, U19 World Cup Final : भारताच्या वरिष्ठ संघाप्रमाणेच युवा संघाचंदेखील विश्वविजेतेपदाचं स्वप्न भंगलं आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माच्या भारतीय संघाला अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने पराभवाची धूळ चारली होती. अशीच काहीशी अवस्था भारताच्या युवा संघाचीदेखील झाली आहे. यंदाच्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ७९ धावांनी पराभव केला आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार ह्यू वैबगेन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पहिल्या डावात फलंदाजी करताना कांगारुंच्या संघाने निर्धारित ५० षटकांमध्ये ७ बाद २५३ धावा करत भारतासमोर २५४ धावांचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ सपशेल अपयशी ठरला. भारत निर्धारित ५० षटकंदेखील खेळू शकला नाही. भारतीय संघांला ४३.५ षटकांत केवळ १७४ धावांपर्यंत मजल मारता आली. सलामीवीर आदर्श सिंह (४७) आणि खालच्या फळीत मुरुगन अभिषेक (४२) या दोघांनी थोडीफार झुंज दिली. परंतु, ते दोघे या सामन्यात भारताला विजय मिळवून देऊ शकले नाहीत.

Indian men women team entered archery world cup 2024 finals
भारतीय तिरंदाजांची पदकनिश्चिती; पुरुष, महिला कम्पाऊंड संघ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत; प्रथमेश, सुरेखाची चमक 
Sanju Samson should be groomed as next T20 captain for India after Rohit says Harbhajan Singh
Team India : रोहितनंतर भारताचा टी-२० कर्णधार कोण होणार? हार्दिक-पंतकडे दुर्लक्ष करत हरभजनने सांगितले ‘हे’ नाव
Along with Wanderers Kingsmead Newlands will host 2027 World Cup matches sport news
वॉण्डरर्ससह किंग्जमीड, न्यूलॅण्ड्सला २०२७च्या विश्वचषकाचे सामने
Abhishek Sharma Breaks Chris Gayle and Sunil Narine's Record in SRH vs CSK Match
SRH vs CSK : अभिषेकने वादळी खेळीच्या जोरावर मोडला गेल-नरेनचा विक्रम, IPL मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज

या सामन्यात आदर्श आणि मुरुगन अभिषेक व्यतिरिक्त कुठल्याही भारतीय फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. संघातील ७ खेळाडू दुहेरी धावसंख्या गाठू शकले नाहीत. अर्शीन कुलकर्णी (३), कर्णधार उदय सहारन (८), मुशीर खान (२२), सचिन धस (९), प्रियांशू मोलिया (९), अरवली अविनाश राव (०), राज लिंबानी (०), सौमी कुमार (२) हे खेळाडू अपयशी ठरले. नमन तिवारी ११ धावांवर नाबाद राहिला. गोलदाजीत ऑस्ट्रेलियाकडून राफेल मॅकमिलन याने ३, मह्ली बीअर्डमनने ३ आणि कॉलम विडलरने २ बळी टीपले. तर, चार्ली अँडरसन आणि टॉम स्ट्रॅकरने प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केलं.

हे ही वाचा >> …म्हणून मुशीर खानने निवडली ९७ क्रमांकाची जर्सी, वडिलांशी आहे खास कनेक्शन

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ऐतिहासिक कामगिरी केली होती. या स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या संघाने फायनलमध्ये २५० धावांचा टप्पा ओलांडला. पहिल्या डावात फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाकडून या सामन्यात हरजस सिंगने सर्वाधिक ५५ धावांची खेळी साकारली. ६५ चेंडूत त्याने ३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने अर्धशतक झळकावलं. त्याचबरोबर स्वतः कर्णधार ह्यू वैबगेन (४८), ऑली पीक नाबाद ४६ आणि सलामीवीर हॅरी डिक्सन याने ४२ धावांची खेळी साकारत ऑस्ट्रेलियाच्या डावाला आकार दिला. गोलंदाजीत भारताकडून राज लिंबानी याने सर्वाधिक ३ बळी घेतले, तर नमन तिवारीने दोन कांगारूंना पव्हेलियनचा रस्ता दाखवला. सौमी कुमार पांडे आणि मुशीर खान या दोघांनी प्रत्येकी एक बळी टीपला.