भारताचा कार्यवाहक कर्णधार लोकेश राहुलने बांगलादेशविरुद्ध द्विशतक झळकावणाऱ्या इशान किशनचे कौतुक केले. राहुलने सांगितले, त्याने मिळालेल्या संधींचा चांगला उपयोग केला. कर्णधार म्हणाला की, या विजयामुळे १४ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाचा आत्मविश्वास खूप वाढेल. नियमित कर्णधार रोहित शर्माच्या दुखापतीमुळे संघात सामील झालेल्या किशनने १२६ चेंडूत द्विशतक पूर्ण करून नवा विक्रम केला.

इशानने १३१ चेंडूत २१० धावा केल्या. भारतीय संघाने आठ गड्यांच्या मोबदल्यात ४०९ धावा करत २२७ धावांनी शानदार विजय नोंदवला. त्याचवेळी लिटन दासनेही इशानच्या खेळीबद्दल मोठी टिप्पणी केली आहे.

सामन्यानंतर पुरस्कार वितरण सोहळ्यात राहुल म्हणाला, ”आमच्या संघाकडून ही अपेक्षा होती. विराट आणि ईशानने आमच्यासाठी स्टेज सेट केला. त्याने डावाची सुरुवात कशी केली हे स्कोअर सांगत नाही. ईशानने ही संधी दोन्ही हातांनी स्विकारली. त्याने शानदार फलंदाजी केली.” इशानसोबतच्या २९० धावांच्या भागीदारीदरम्यान मार्गदर्शकाची भूमिका बजावणाऱ्या कोहलीचेही राहुलने कौतुक केले.

तो पुढे म्हणाला, ”विराटने त्याला त्याच्या अनुभवाने उत्तम मार्गदर्शन केले.’ संघाच्या या कामगिरीने मी खूप खूश आहे. आम्ही एक संघ म्हणून शिकत आहोत. अजूनही चांगले होण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या दोन सामन्यांचे निकाल आमच्या बाजूने लागले नाहीत. आम्ही भाग्यवान नव्हतो. या विजयासह आम्ही कसोटी मालिकेसाठी आत्मविश्वास वाढवू इच्छितो.” विरोधी संघाचा कर्णधार लिटन दास यानेही इशानच्या निडर वृत्तीचे कौतुक केले आणि सांगितले की त्याच्या आणि कोहलीच्या भागीदारीने सामना त्यांच्या पकडीपासून दूर नेला.

हेही वाचा – Video: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे स्वप्न भंगताच अश्रू अनावर; तो कधीच विश्वचषक ट्रॉफी उचलू शकणार नाही का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लिटन दास म्हणाला, ”इशान आणि विराटने ज्या प्रकारे फलंदाजी केली. त्यामुळे सामना आमच्या पकडीतून बाहेर पडला. विशेषत: इशानने ज्या पद्धतीने फलंदाजी केली, तो खूपच आक्रमक होता. आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले. पण त्याला बाद करण्याचा कोणताही मार्ग सापडला नाही.” तो म्हणाला, ”जर स्कोअर ३३०-३४० असता, तर हा सामना वेगळा झाला असता. त्यांचा संघ चांगला आहे आणि आम्ही दोन सामन्यांमध्ये चांगले क्रिकेट खेळलो. यामुळे आमचा आत्मविश्वास खूप वाढेल.”