बांगलादेशविरुद्ध मर्यादित षटकांच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या पराभवाची जबाबदारी केएल राहुलने घेतली. शेवटपर्यंत फलंदाजी केली असती तर आणखी ३०-४० धावा करता आल्या असत्या, अशी खंत त्याने व्यक्त केली. या स्थितीत बांगलादेश संघावर दबाव अधिक राहिला असता आणि सामन्याचा निकाल वेगळा लागला असता. बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने मधल्या फळीत फलंदाजी करताना ७३ धावा केल्या आणि नंतर यष्टिरक्षकाची भूमिका स्वीकारली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारत आणि बांगलादेश यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील शेवटच्या सामन्यात टीम इंडियाला एका विकेटच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात लोकेश राहुलने मेहदी हसन मिराजचा महत्त्वाचा झेल सोडला आणि त्याला भारताच्या पराभवासाठी जबाबदार धरण्यात आले. राहुलनेही पराभवाची जबाबदारी स्वीकारली, मात्र झेल घेण्याऐवजी त्याच्या फलंदाजीने निराशा व्यक्त केली. बांगलादेशविरुद्धच्या महत्त्वाच्या टप्प्यावर भारताने दोन झेल सोडले. याचा फायदा घेत मेहदी हसन मिराज आणि मुस्तफिजुर रहमान यांनी १०व्या विकेटसाठी नाबाद ५१ धावांची भागीदारी करत भारताकडून सामना हिसकावून घेतला. धावांचा पाठलाग करताना १०व्या विकेटसाठी ही चौथी सर्वोच्च भागीदारी होती, ज्यामध्ये संघाने सामना जिंकला आहे.

हेही वाचा :   हार्दिक पांड्या नव्हे, तर ‘या’ खेळाडूला मनिंदर सिंगने सुचवले रोहितचा उत्तराधिकारी, कोण आहे घ्या जाणून

७३ धावांची खेळी करणाऱ्या राहुलने पत्रकार परिषदेत सांगितले की, “आदर्शपणे मला शेवटपर्यंत आणखी ३०-४० धावा करायच्या होत्या. जर मी शेवटपर्यंत फलंदाजी केली असती तर माझा अंदाज २३०-२५० झाला असता. (मोहम्मद) सिराजला हाताशी धरून  आम्ही चांगली फलंदाजी करत भागीदारी पुढे वाढवण्याचा प्रयत्न करत होतो, त्यामुळे जर मी आणखी १० षटके फलंदाजी करून ३०-४० धावा केल्या असत्या तर फरक पडू शकला असता.” शाकिब अल हसनच्या पाच इबादत हुसेनने चार गडी बाद करत भारतीय फलंदाजी खणखणली. या सामन्यात भारतीय फलंदाज अपयशी ठरले. टीम इंडिया ४२ षटकांमध्ये १८६ धावांवर गारद झाली. मात्र, केएल राहुलच्या अर्धशतकामुळे टीम इंडियाला २००च्या आसपास धावा करता आल्या. राहुलही अपयशी ठरला असता, तर टीम इंडियाचा डाव १०० धावांच्या आतच सर्वबाद झाला असता.

त्याच्या वैयक्तिक फलंदाजीबद्दल बोलताना केएल राहुल म्हणाला, “ते त्या दिवसांपैकी एक होते जेव्हा इतर सर्वांपेक्षा, मला असे वाटले की मी चेंडूला अधिक चांगले टाइमिंग करतो. मी जो काही शॉट हवेत मारला तो सुदैवाने तो सीमारेषा ओलांडून गेला. प्रत्येक पर्याय मी केले माझ्या बाजूने गेले.” पुढे बोलताना राहुल म्हणाला, की “सर्व तयारी सामन्यापूर्वी होते, त्यामुळे मी अशा खेळीने खूप आनंदी आहे. एक फलंदाज म्हणून तुम्हाला खरोखरच आनंद मिळतो, कारण तुम्हाला आव्हान दिले जाते आणि जेव्हा तुमच्या संघाला तुमची गरज असते तेव्हा ते करायला हवे होते आणि काही प्रमाणात मी ते केले.” संघाच्या वाईट काळातही तुम्ही हात वर करून सांगायला हवा की मी आहे आणि मी होतो हे कोणालाही सिद्ध करायची गरज नाही. कालच्या फलंदाजीचा मी पुरेपूर आनंद घेतला.”

हेही वाचा :   IND vs BAN ODI: के. एल. राहुलचा ऋषभ पंतबाबत मोठा खुलासा, म्हणाला “BCCI ने पंतला संघातून काढताना एक..”

भारतीय उपकर्णधार लोकेश राहुलने रविवारी खुलासा केला की भारतीय संघ व्यवस्थापनाने त्याला एकदिवसीय प्रकारामध्ये ‘मधल्या फळीत शेवटच्या आणि सलामीच्या फलंदाजांना दुवा बनण्याची जबाबदारी संघ व्यवस्थापनाने त्याच्यावर सोपवली आहे. लोकेश राहुलने २०२१च्या काही सामन्यांमध्ये यष्टीरक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs ban in a game of certainty uncertainty you get the unexpected kl rahul breaks silence on indias defeat avw
First published on: 05-12-2022 at 13:36 IST