भारत आणि बांगलादेश संघात पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात ४०४ धावांचा डोंगर उभारला. भारतीय संघाकडून चेतेश्वर पुजारा आणि श्रेयस अय्यरने सर्वाधिक धावांचे योगदान दिले. श्रेयस अय्यर आपले अर्धशतक झळकावताना विराट आणि सूर्याला मागे टाकताना एक खास पराक्रम केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रेयस अय्यरने बांगलादेशविरुद्ध पहिल्या डावाच ८६ धावांची शानदार खेळी केली. त्याने आपल्या खेळीत १९२ चेंडूचा सामना करताना १० चौकार लगावले. दरम्यान, श्रेयस अय्यरने सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली यांसारख्या सहकारी फलंदाजांना मागे टाकले आहे. तो २०२२ मध्ये खेळाच्या सर्व फॉरमॅटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे.

अय्यरने या वर्षी आतापर्यंत ३८ डावांमध्ये १४८९ धावा केल्या आहेत, ज्यासह त्याने सूर्यकुमार यादवला २०२२ मध्ये भारतासाठी खेळाच्या सर्व फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून मागे टाकले आहे. मुंबईचा स्टार फलंदाज अय्यरने या वर्षी एकूण १४८९ धावांपैकी १७ टी-२० सामन्यांमध्ये ४६३ धावा, १७ एकदिवसीय सामन्यांच्या १५ डावांमध्ये ७२४ धावा आणि चार कसोटी सामन्यांच्या सहा डावांमध्ये ३०६ धावा केल्या आहेत.

२०२२ मध्ये भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत श्रेयस अय्यर (१४८९) आघाडीवर आहे, तर सूर्यकुमार यादव (१४२४) आणि विराट कोहली (१३०४) अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. त्याचबरोबर ऋषभ पंत १२७८ धावांसह चौथ्या स्थानावर आहे. या यादीत कर्णधार रोहित शर्मा (९९५) पाचव्या स्थानावर आहे.

हेही वाचा – IND vs BAN 1st Test: भारताचा पहिला डाव ४०४ धावांवर आटोपला; पुजारा, अय्यर आणि आश्विनची दमदार अर्धशतके

सामन्याबद्दल बोलायचे तर बांगलादेश संघाने आपल्या डावाला सुरुवात केली आहे. या संघाने १५ पंधरा षटकानंतर ३बाद ४४ धावा केल्या आहे. नजमुल हुसेन शांतो (०), यासिर अली (४) आणि लिटन दास (२४) बाद झाले आहेत. त्याचबरोबर झाकिर हसन १३ आणि मुशफिकर रहीम ४ धावांवर खेळत आहेत. भारताकडून गोलंदाजी करताना, मोहम्मद सिराजने २ आणि उमेश यादवने १ विकेट घेतली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs ban shreyas iyer became the highest run scorer in all three formats in 2022 surpassing virat kohli and suryakumar yadav vbm
First published on: 15-12-2022 at 14:43 IST