टी२० विश्वचषक २०२२ मध्ये टीम इंडियाच्या पराभवानंतर चाहते आणि अनेक दिग्गज संतप्त झाले आहेत. त्यानंतर एकदिवसीय मालिकेत टीम इंडियाच्या सततच्या पराभवाने दुखण्यावर मीठ चोळण्याचे काम  न्यूझीलंडविरुद्धची मालिका आणि बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या सामन्यातील खराब कामगिरी याने केले. यानंतर पुन्हा एकदा अनेक दिग्गजांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य करण्यास सुरुवात केली. त्यापैकी एक नाव आहे माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद कैफचे.

बांगलादेशविरुद्ध प्रथम भारताकडून खराब फलंदाजी पाहायला मिळाली. संपूर्ण संघ अवघ्या १८६ धावांत गारद झाला. त्यानंतर दुसऱ्या डावातील सामना अडकताच भारतावर दबाव आला आणि संघाकडून अत्यंत खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. अखेर यजमानांनी हा सामना १ गडी राखून जिंकला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. मोहम्मद कैफच्या म्हणण्यानुसार, टीम इंडियाकडे आता विश्वचषक जिंकण्याची क्षमता नाही. त्याने सांगितले की, जर तुम्ही क्रिकेटमध्ये दडपण हाताळू शकत नसाल तर तुमच्यासाठी मोठ्या स्पर्धा जिंकणे खूप कठीण जाईल.

हेही वाचा  : FIFA WC 2022: “मी घाबरलो होतो…” दुखापतीनंतर सावरलेल्या नेमारने शेअर केला वेदनादायी अनुभव

‘दबावामध्ये खेळायला शिकावे लागेल’ – मोहम्मद कैफ

बांगलादेशविरुद्ध टीम इंडियाच्या पराभवानंतर माजी क्रिकेटर कैफ म्हणाला, “शेवटी क्षेत्ररक्षक दडपणाखाली होते आणि गोलंदाजानेही दबावामुळे नो बॉल टाकला. दबावाखाली आम्ही अनेक चुका केल्या आणि विश्वचषकात विजेतेपद मिळवायचे असेल तर दबावाखाली खेळायला शिकले पाहिजे. कोणताही संघ दबावाखाली चमकदार कामगिरी करतो तेव्हाच तो यशस्वी होऊ शकतो.”

हेही वाचा  : FIFA WC 2022: ब्राझिलचा स्टार खेळाडू नेमारने केला नवा विक्रम; रोनाल्डो, मेस्सी आणि पेरिसिक यांच्या पंगतीत सामील

भारताच्या या लाजिरवाण्या पराभवानंतर माजी खेळाडू मोहम्मद कैफने टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचा खरपूस समाचार घेतला आहे. त्याने हिटमॅनला धावा करण्याची मागणी केली आहे. रोहित शर्मा जेव्हापासून भारतीय संघाचा नियमित कर्णधार झाला आहे, तेव्हापासून त्याची बॅट शांत आहे. त्याला सतत धावा काढता येत नाहीत. त्याच्यावर कर्णधारपदाचा दबाव निर्माण होत आहे. अशा स्थितीत टीम इंडियाच्या वरच्या क्रमांकावरील फलंदाजांना धावा कराव्या लागतील, असे मत भारताचा माजी अनुभवी खेळाडू मोहम्मद कैफने व्यक्त केले. कारण बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा पराभव त्याच्या गोलंदाजीने नव्हे तर फलंदाजीने झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोनी स्पोर्ट्सवर कैफ म्हणाला की, “तुला चांगली फलंदाजी करावी लागेल. आम्ही गोलंदाजीबद्दल बरीच चर्चा, टीकाटिपण्णी केली आहे, परंतु भारताच्या खराब फलंदाजीवर खऱ्या अर्थाने लक्ष देण्याची गरज आली आहे. बांगलादेश असो किंवा न्यूझीलंडमधील एकदिवसीय सामना आम्ही फलंदाजीमुळे तो गमावला. आम्हाला विराट कोहलीच्या धावांची गरज आहे, आम्हाला कर्णधार रोहित शर्माच्या धावांची गरज आहे. रोहित शर्मा कर्णधार म्हणून फॉर्ममध्ये नाही, तो नियमितपणे धावा करू शकला नाही. हे सत्य तो देखील नाकारणार नाही”