IND vs ENG 1st test Day 3 Live Updates in Marathi: भारत वि. इंग्लंड पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ वेळेच्या आधीच अर्धा तास लवकर संपवण्यात आला आहे. इंग्लंडचा संघ तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात ४६५ धावांवर सर्वबाद झाला. जसप्रीत बुमराहने पाच विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद सिराजने २, प्रसिध कृष्णाने ३ विकेट घेतले. तर इंग्लंडकडून ऑली पोपने शतक, बेन डकेटने ६२ धावा, हॅरी ब्रुक ९९ धावा या फलंदाजांनी उत्कृष्ट फलंदाजी केली. त्यानंतर भारताने तिसऱ्या सत्रात फलंदाजी करताना २ विकेट्स गमात ९० धावा केल्या आहेत.

कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पावसाने तिसऱ्या सत्रात वादळी वाऱ्यासह हजेरी लावल्याने सामना अचानक लवकर थांबवण्यात आला. तोपर्यंत भारताने ९० धावा करत एकूण ९६ धावांची आघाडी घेतली आहे. केएल राहुल ४७ धावा तर शुबमन गिल ६ धावा करत खेळत आहे.

टीम इंडियाने गमावली दुसरी विकेट

साई सुदर्शनच्या रूपात भारताने दुसरी विकेट गमावली आहे. बेन स्टोक्सने पुन्हा एकदा सापळा रचत साई सुदर्शनला माघारी पाठवलं. साई ४८ चेंडूत ४ चौकारांसह ३१ धावा करत माघारी परतला.

भारताला पहिला धक्का

तिसऱ्या सत्रात भारतीय संघ ६ धावांच्या आघाडीसह फलंदाजी करण्यासाठी उतरला. पण अवघ्या ४ धावा करत शतकवीर यशस्वी जैस्वाल झेलबाद झाला. ब्रायडन कार्सने तिसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिला.

बुमराहचा फायफर

जसप्रीत बुमराहने जोश टंगला क्लीन बोल्ड करत इंग्लंडच्या संघाला सर्वबाद केलं आहे. जसप्रीत बुमराहने ५ विकेट्स आपल्या नावे केले आहेत. यासह इंग्लंडचा संघ ४६५ धावांवर ऑल आऊट झाला आहे आणि भारताने अवघ्या ६ धावांची पहिल्या डावात आघाडी केली आहे. भारताने यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल आणि ऋषभ पंतच्या शतकाच्या जोरावर ४७१ धावा केल्या होत्या.

ख्रिस वोक्स क्लीन बोल्ड

भारताची आघाडी खोडून काढत पुढे जाण्यासाठी इंग्लंडला ११ धावांची गरज असताना जसप्रीत बुमराहने ख्रिस वोक्सला क्लीन बोल्ड केलं. यासह बुमराहने भारताला नववी विकेट मिळवून दिली आहे. ख्रिस वोक्सने कमालीची फलंदाजी करत इंग्लंडसाठी महत्त्वपूर्ण धावा केल्या. ख्रिस वोक्स ५५ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह ३८ धावा करत माघारी परतला.

ब्रायडन कार्स क्लीन बोल्ड

मोहम्मद सिराजने त्याच्या षटकातील पाचव्या चेंडूवर ब्रायडन कार्सला क्लीन बोल्ड करत भारताला आठवी विकेट मिळवून दिली. ब्रुकच्या विकेटनंतर कार्सने वोक्ससह चांगली भागीदारी रचली होती. कार्सने २३ चेंडूत ४ चौकारांसह २२ धावा करत बाद झाला.

हॅरी ब्रुकचं एका धावेने हुकलं शतक

हॅरी ब्रुक ९९ धावांवर खेळत असताना प्रसिध कृष्णा गोलंदाजीसाठी आला आणि त्याने षटकातील तिसऱ्या चेंडूवर ब्रुकला झेलबाद केलं. प्रसिध कृष्णाने ब्रुकला चेंडू खेळायला भाग पाडलं आणि बॅटची वरची कड लागत चेंडू हवेत गेला आणि सीमारेषेवर शार्दुल ठाकूरने एक सोपा झेल टिपला. यासह इंग्लंडने सातवी आणि महत्त्वाची विकेट गमावली आहे. इंग्लंडने आता ४०० धावांचा टप्पा गाठला आहे. मैदानावर ख्रिस वोक्स कायम आहे, जो संघाचा डाव सावरत आहे.

प्रसिध कृष्णाच्या खात्यात विकेट

प्रसिध कृष्णाने लंचब्रेकनंतर संघाला सहावी विकेट मिळवून दिली आहे. प्रसिधच्या पहिल्या चेंडूवर जेमी स्मिथने षटकार खेचला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर कट लागून झेलबाद झाल्याचं अपील केलं, संघाने रिव्ह्यूही केला पण स्मिथ नाबाद राहिला. त्यानंतर प्रसिधने तिसरा चेंडू बाऊन्सर टाकला आणि सीमारेषेजवळ जडेजा आणि साई सुदर्शनने रिले झेल टिपत मोठी विकेट मिळाली.

लंचब्रेकपर्यंत इंग्लंडने केल्या इतक्या धावा

इंग्लंडने लंचब्रेकपर्यंत ५ विकेट्स गमावत ३२७ धावा केल्या आहेत. तिसऱ्या दिवशी इंग्लिश संघाने २८ षटकांत ११८ धावा केल्या. तर भारतीय संघाला २ विकेट्स घेता आल्या. यासह भारतीय संघाकडे १४४ धावांची आघाडी आहे. पण इंग्लंड ज्याप्रकारे फलंदाजी करत आहेत ते पाहता सामन्यात एक पाऊल पुढे आहेत.

हॅरी ब्रुक अर्धशतक

हॅरी ब्रुकने भारताविरूद्ध खेळताना १२ वं कसोटी अर्धशतक झळकावलं आहे. ब्रुकने ६५ चेंडूत ७ चौकार आणि एका षटकारासह अर्धशतक केलं आहे. यासह इंग्लंडने ७२ षटकांत ५ बाद ३०५ धावा केल्या आहेत. यासह भारताकडे १६६ धावांची आघाडी आहे.

मोहम्मद सिराजच्या खात्यात मोठी विकेट

मोहम्मद सिराजला अखेरीस विकेट मिळाली आहे. सिराजने त्याच्या ६५व्या षटकातील पाचव्या चेंडूवर स्टोक्सला झेलबाद केलं. सिराजच्या चेंडूवर स्टोक्स फटका खेळायला गेला आणि बॅटची कड घेत चेंडू पंतच्या हातात पोहोचला. बाद झालेलं पाहताच स्टोक्सने हवेत बॅट उडवली आणि नंतर ती पकडत पायावर बॅट मारली आणि निराशेत माघारी परतला. स्टोक्सने ५२ चेंडूत ३ चौकारांसह २० धावा केल्या.

शतकवीर ऑली पोप झेलबाद

प्रसिध कृष्णाने तिसऱ्या दिवसाच्या त्याच्या स्पेलमधील दुसऱ्या षटकात संघाला मोठी विकेट मिळवून दिली. प्रसिधच्या पहिल्याच चेंडूवर पोपने खेळण्याचा प्रयत्न केला पण बॅटची कड घेत चेंडू ऋषभ पंतच्या हातात गेला. यासह भारताला महत्त्वाची विकेट मिळवून दिली. पोप १३७ चेंडूत १४ चौकारांसह १०६ धावा करत बाद झाला.

तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू

भारत वि. इंग्लंड लीड्स कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाला सुरूवात झाली आहे. प्रसिध कृष्णाने भारताकडून गोलंदाजी आक्रमणाला सुरूवात केली. पहिल्याच षटकात प्रसिध कृष्णाने ११ धावा दिल्या. हॅरी ब्रुकने या षटकातील अखेरच्या दोन चेंडूवर चौकार-षटकार खेचले.

दुसऱ्या दिवशी काय काय घडलं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इंग्लंड संघाने भारताला ४७१ धावांवर सर्वबाद केल्यानंतर दुसऱ्या दिवशी फलंदाजीला उतरला. यानंतर जसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकात जॅक क्रॉलीला झेलबाद करत पहिली विकेट मिळवून दिली. यानंतर बेन डकेट-ऑली पोप यांनी अर्धशतकं झळकावली. टीब्रेकनंतर जकेट बुमराहच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला. तर ऑली पोप भारतीय संघाविरूद्ध शतक झळकावलं. त्यानंतर रूट झेलबाद झाला. अखेरच्या षटकात बुमराहने ३ नो बॉल टाकले पण हॅरी ब्रुकला एकही धाव दिली नाही.