IND vs ENG 2nd Test Day 2 Live Updates: भारत वि. इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज म्हणजेच २ जुलै पासून खेळवला जात आहे. हा सामना एजबेस्टन बर्मिंगहममध्ये आहे. इंग्लंडने पहिल्या सामन्यात ५ विकेट्सने विजय मिळवल्यामुळे भारत ०-१ ने मालिकेत पिछाडीवर आहे. भारतीय संघाची नजर मालिकेत बरोबरी साधण्यावर आहे. भारतीय संघाने पहिल्या डावात ५८७ धावा करत सर्वबाद झाला आहे. तर दुसऱ्या दिवशी इंग्लंडने ३ विकेट गमावत ७७ धावा केल्या आहेत.
इंग्लंडने दुसऱ्या दिवशी किती धावा केल्या?
इंग्लंडने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ३ विकेट्स गमावल्या आणि २० षटकांत ७७ धावा केल्या आहेत. जो रूट आणि हॅरी ब्रुकची जोडी नाबाद परतली आहे. तर भारताकडून आकाशदीप आणि सिराजने चांगली गोलंदाजी करत संघाला विकेट्स मिळवून दिल्या. यासह आता भारताकडे ५१० धावांची आघाडी आहे.
आकाशदीपने भारताला मिळवून दिला पहिला ब्रेकथ्रू
भारताने इंग्लंडला पहिली विकेट घेत मोठा धक्का दिला आहे. इंग्लंडचा सामनावीर बेन डकेट शून्यावर बाद झाला. आकाशदीपच्या गोलंदाजीवर फटका खेळायला गेला आणि स्लिपमध्ये गिलने एक कमालीचा झेल टिपला आणि डकेटला माघारी धाडलं. यानंतर आकाशदीपच्या पुढच्या चेंडूवर ऑली पोपला राहुलने स्लिपमध्ये बाद करत भारताला दोन विकेट मिळवून दिले आहेत.
इंग्लंडच्या डावाला सुरूवात
भारताने केलेल्या 578 धावांना प्रत्युत्तर देण्यासाठी इंग्लंडचे सलामीवीर मैदानावर उतरले आहेत. आकाशदीपने गोलंदाजीला सुरूवात केली असून त्याच्या पहिल्याच षटकात क्रॉलीने दोन चौकार मारले आहेत. तर याशिवाय भारताचा कर्णधार शुबमन गिल फिल्डिंगसाठी मैदानात उतरलेला नाही. त्यामुळे ऋषभ पंत संघाचं नेतृत्त्व करत आहे.
टीम इंडिया ऑल आऊट
भारतीय संघ दुसऱ्या कसोटीत पहिल्या डावात करत सर्वबाद झाला आहे. शुबमन गिलचं द्विशतक, जडेजा-गिलची २०३ धावांची भागीदारी, गिल-वॉशिंग्टनची १४४ धावांची भागीदारी आणि जैस्वालच्या ८७ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या डावात ५८७ धावा केल्या आहेत. आता पहिल्या डावात इंग्लंडच्या फलंदाजांच्या झटपट विकेट घेत त्यांना फॉलोऑन देणं यावर संघाचं लक्ष्य असेल.
आकाशदीप झेलबाद
आकाशदीप मोठा षटकार खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. आकाशदीपला हा षटकार मारणं महागात पडलं. गिलनंतर पुढच्या षटकात आकाशदीप झेलबाद झाला.
शुबमन गिल झेलबाद
शुबमन गिल २६९ धावांची विक्रमी खेळी करत झेलबाद झाला. जोश टंगच्या गोलंदाजीवर शुबमन गिल हलक्या हाताने पुल शॉट खेळायला गेला, पण ऑली पोपच्या हातात सोपा झेल देत झेलबाद झाला. गिल ३८७ चेंडूत ३० चौकार आणि ४३ षटकारांसह २६९ धावा करत बाद झाला.
टीब्रेक
भारतीय संघाने टी-ब्रेकपर्यंत ७ विकेट्स गमावत ५६४ धावा केल्या आहेत. यासह भारताने दुसऱ्या सत्रात ३१ षटकांत १४५ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये गिलने द्विशतक केलं आहे. शुबमन गिल २६५ धावा करत नाबाद आहे.
वॉशिंग्टन झाला बाद
वॉशिंग्टन सुंदर जो रूटच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला आणि रूटने संघाला महत्त्वपूर्ण ब्रेकथ्रू मिळवून दिला आहे. यासह त्याने गिल आणि सुंदरची १४४ धावांची भागीदारी तोडली आहे. सुंदरचं अवघ्या ९ धावांनी अर्धशतक हुकलं. सुंदर १०३ चेंडूत ३ चौकार आणि एका षटकारासह ४१ धावा करत बाद झाला. यासह भारताने १३९ षटकांत ७ बाद ५५८ धावा केल्या आहेत.
सिराजच्या खात्यात पहिली विकेट
मोहम्मद सिराजने आठव्या षटकातील पहिल्या चेंडूवर जॅक क्रॉली बाद करत संघाला पहिली विकेट मिळवून दिली आहे. इंग्लंडने तिसरी विकेट गमावली असून भारताला अजून एक मोठी विकेट मिळाली आहे.
शुबमन गिलच्या २५० धावा पूर्ण
भारताचा नवा कसोटी कर्णधार शुबमन गिलने द्विशतकानंतर २५० धावांचा पल्ला गाठला आहे. गिलची ही कसोटीमधील सर्वात मोठी वैयक्तिक धावसंख्या आहे. यानंतर गिलने २५५ धावा करत भारताच्या कसोटी इतिहासात कर्णधार म्हणून सर्वात मोठी खेळी केली आहे. यापूर्वी विराट कोहलीने २५४ धावांची कसोटी कर्णधार म्हणून मोठी खेळी केली होती.
भारताची धावसंख्या ५०० पार
शुबमन गिलने १२८व्या षटकात चौकार लगावत भारताला ५०० धावांच्या पलीकडे पोहोचवलं आहे. शुबमन गिल यासह मैदानावर कायम आहे. तर वॉशिंग्टन सुंदरही त्याला चांगली साथ देत आहे. दोन्ही फलंदाजांनीही १०४ धावांची भागीदारी केली आहे.
शुबमन गिलचं पहिलं कसोटी द्विशतक
भारताच्या कसोटी संघाचा नवा कर्णधार शुबमन गिलने इंग्लंडविरूद्ध दुसऱ्या कसोटीत त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पहिलं कसोटी द्विशतक झळकावलं आहे. शुबमन गिलचं भारताचा कर्णधार म्हणूनही हे पहिलं द्विशतक असणार आहे. गिलने ३११ चेंडूत २१ चौकार आणि २ षटकारांसह २०० धावा केल्या आहेत. यासह भारतीय संघाने ४७५ धावा केल्या आहेत.
लंचब्रेकपर्यंत किती धावा?
भारताने दुसऱ्या दिवशी लंचब्रेकपर्यंत ६ बाद ४१९ धावा केल्या आहेत. यादरम्यान संघाचा कर्णधार गिल १६८ धावा करत नाबाद आहे. तर जडेजा ८९ धावांवर झेलबाद झाला. गिलच्या साथीला आता मैदानावर वॉशिंग्टन सुंदर असणार आहे. भारतीय संघाची खालची फळी गिलला किती साथ देते आणि भारतीय संघ किती धावा करतो यावर सर्वांच्या नजरा आहेत.
रवींद्र जडेजा झेलबाद
रवींद्र जडेजा जोश टंगच्या शॉर्ट बॉलवर खेळण्यासाठी गेला अन् चेंडूने बॅटची कड घेत हवेत उंच उडाला आणि जेमी स्मिथने कमालीचा झेल टिपला. यासह जडेजा ८९ धावा करत बाद झाला आणि त्याचं शतक हुकलं.
भारताच्या ४०० धावा पूर्ण
भारतीय संघाने १०७व्या षटकात जडेजाच्या षटकारासह ४०० धावांचा पल्ला गाठला. यासह जडेजा आणि गिलने २०० अधिक धावांची भागीदारी रचली आहे.
शुबमन गिल १५० धावा
शुबमन गिलने कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा १५० धावांचा पल्ला गाठला आहे. त्याने २६० चेंडूत १७ चौकारांसह १५० धावा पूर्ण केल्या. यासह भारताने ३७५ धावांचा टप्पा गाठला आहे.
भारताने पार केला ३५० धावांचा पल्ला
जडेजा आणि गिलच्या भागीदारीच्या ३५० धावांचा पल्ला गाठला आहे. दरम्यान जडेजा आणि गिलची जोडी चांगली फलंदाजी करत असून १५० अधिक धावांची भागीदारी केली आहे.
रवींद्र जडेजाचं शानदार अर्धशतक
रवींद्र जडेजाने ८० चेंडूत ६ चौकारांसह आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. जडेजाने गिलला चांगली साथ देत भारताचा डाव उचलून धरला आहे. जडेजाचं हे २३वं कसोटी अर्धशतक आहे.
जडेजा गिलची शतकी भागीदारी
रवींद्र जडेजा आणि शुबमन गिलने दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होताच पहिल्याच चेंडूवर एक धाव घेत १०० धावांची भागीदारी पूर्ण केली आहे. जडेजा ४१ तर गिल ११५ धावांवर खेळत आहे.
भारत-इंग्लंड कसोटी पहिला दिवस
पहिल्या दिवशी भारताने पहिल्या सत्रात २ विकेट्स गमावत ९८ धावा केल्या. दुसऱ्या डावात भारताने एक विकेट गमावत ८६ धावा केल्या होत्या. तर तिसऱ्या सत्रात भारताने २ विकेट्स गमावत १२८ धावा केल्या. ज्यामध्ये शुबमन गिलने शतक पूर्ण केलं. तर यशस्वी जैस्वालच्या ८६ धावांच्या खेळीने भारताच्या धावसंख्येचा पाया रचला. भारताने गिलच्या शतकाच्या जोरावर पहिल्या दिवशी आपला दबदबा राखला आहे. टीम इंडियाचा निम्मा संघ जर तंबूत परतला असला तरी भारताच्या टॉप फलंदाजी फळीने धावांमध्ये मोठं योगदान दिलं आहे. यासह भारताने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ५ बाद ३१० धावा केल्या आहेत. यासह जडेजा ४१ धावा तर गिल ११४ धावा करत नाबाद परतले आहेत.