England scored 353 runs in the first innings against India : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना रांचीत सुरू आहे. या सामन्यात इंग्लंडने जो रुटच्या नाबाद शतकाच्या जोरावर पहिल्या डावात ३५३ धावा केल्या. जो रुटने २७४ चेंडूत १० चौकाराच्या मदतीने नाबाद १२२ धावांचे योगदान दिले. त्याचबरोबर भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक ४, तर आकाश दीपने ३ विकेट्स घेतल्या.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या इंग्लंडचा पहिला डाव ३५३ धावांवर आटोपला. आज इंग्लंडने सात विकेट्सवर ३०२ धावांवरून खेळण्यास सुरुवात केली होती. यामध्ये संघाने या ५१ धावांची भर घालताना उर्वरित तीन विकेट गमावल्या. रवींद्र जडेजाने तिन्ही विकेट घेतल्या. त्याने एकाच षटकात ऑली रॉबिन्सन आणि शोएब बशीरला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. जडेजाने आधी रॉबिन्सन आणि जो रूटची १०२ धावांची भागीदारी तोडली.

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
MI vs CSK: आयपीएल २०२४ मध्ये ऋतु’राज’, मुंबईविरूद्ध विस्फोटक फलंदाजीसह ‘हा’ विक्रम करणारा पहिला भारतीय खेळाडू
Kolkata Knight Riders Vs Lucknow Supergiants Mathc Highlights in marathi
KKR vs LSG : कोलकाताचा ऐतिहासिक विजय! लखनऊचा ८ विकेट्सनी उडवला धुव्वा
Kolkata Knight Riders vs Delhi Capitals Match Highlights in Marathi
IPL 2024, DC vs KKR : कोलकाता नाईट रायडर्सचा मोठा विजय! दिल्ली कॅपिटल्सचा तब्बल १०६ धावांनी उडवला धुव्वा
Kolkata Knight Riders vs Delhi Capitals Match Updates in Marathi
DC vs KKR : केकेआरने रचला इतिहास! सुनील नरेनच्या वादळी खेळीच्या जोरावर दिल्लीसमोर ठेवले २७३ धावांचे लक्ष्य

रूट आणि रॉबिन्सनने सावरला डाव –

२४५ धावांत ७ विकेट्स गमावलेल्या इंग्लंडचा रॉबिन्सने सावरला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत रॉबिन्सन जो रूटसोबत खेळपट्टीवर टिकून होता. त्याने रुटसोबत ५७ धावांची भागीदारी केली होती. आज दुसऱ्या दिवशी त्याने रूटसोबत शतकी भागीदारी पूर्ण करत इंग्लंडला मजबूत स्थितीत पोहोचवले.

हेही वाचा – Sajeevan Sajana : मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर जावेद मियांदादची आठवण का झाली? सजना बनली स्टार, पाहा VIDEO

इंग्लंडच्या डावातील १०३ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर रॉबिन्सन यष्टिरक्षक ध्रुव जुरेलकरवी झेलबाद झाला. त्याला ५८ धावा करता आल्या. यानंतर षटकाच्या चौथ्या चेंडूवर जडेजाने शोएब बशीरला रजत पाटीदारकरवी झेलबाद केले. त्याला खातेही उघडता आले नाही. त्यानंतर त्याने जेम्स अँडरसनला एलबीडब्ल्यू आऊट करून इंग्लंडचा डाव १०४.५ षटकांत ३५३ धावांवर गुंडाळला. अँडरसनला खातेही उघडता आले नाही.

लंच ब्रेकपर्यंत भारताच्या पहिल्या डावात एक गडी गमावून ३४ धावा –

दुसऱ्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत भारताने पहिल्या डावात एक गडी गमावून ३४ धावा केल्या होत्या. सध्या यशस्वी जैस्वाल २७ धावा करून क्रीजवर असून शुबमन गिलने चार धावा केल्या आहेत. भारताला पहिला धक्का चारच्या धावसंख्येवर बसला. दोन धावा करून रोहित अँडरसनचा बळी ठरला. भारत अजूनही इंग्लंडपेक्षा ३१९ धावांनी मागे आहे.