Akash Deep made his Test debut for India : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना आजपासून रांचीमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर या संघाने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले आहे. त्याचबरोबर भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला आहे. आकाश दीपला राहुल द्रविडकडून पदार्पणाची कॅप मिळाली.

इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लिश संघाने गुरुवारी आपला प्लेइंग इलेव्हन जाहीर केली होती. त्याचबरोबर भारतीय संघात एकच बदल करण्यात आला आहे. जसप्रीत बुमराहच्या जागी आकाश दीप आला आहे. हे त्याचे आंतरराष्ट्रीय पदार्पण आहे.

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
MI vs CSK: आयपीएल २०२४ मध्ये ऋतु’राज’, मुंबईविरूद्ध विस्फोटक फलंदाजीसह ‘हा’ विक्रम करणारा पहिला भारतीय खेळाडू
IPL 2024 Lucknow Super Giants vs Gujarat Titans Match Updates in Marathi
IPL 2024: लखनौला ‘यश’ मिळवून देणारा विदर्भवीर ठाकूर आहे तरी कोण?
IPL 2024 RCB vs LSG Match Updates in Marathi
RCB vs LSG : मयंकच्या वेगवान माऱ्यापुढे आरसीबीचे फलंदाज हतबल, लखनऊने २८ धावांनी नोंदवला दुसरा विजय
IPL 2024 Lucknow Super Giants vs Punjab Kings Match Updates in Marathi
IPL 2024: सर्वात वेगवान चेंडू टाकणारा मयंक यादव आहे तरी कोण?

आकाश दीपचे कसोटी पदार्पण –

जसप्रीत बुमराहला या कसोटीतून विश्रांती देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत त्याच्या जागी आरसीबीचा वेगवान गोलंदाज आकाश दीप पदार्पण केले आहे. पदार्पणाची कॅप मिळवणारा तो भारताचा ३१३ वा खेळाडू ठरला आहे. आकाशने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली होती. त्याला भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी पदार्पणाची कॅप दिली. आकाशची आईही त्याच्या पदार्पणाला उपस्थित होती. आकाशने आईला मिठी मारली आणि भावूक झाला. आकाशने ३० प्रथम श्रेणी सामन्यात १०४ बळी घेतले आहेत. ६० धावांत सहा ही त्याची एका डावातील सर्वोत्तम गोलंदाजी आहे.

हेही वाचा – IPL 2024 : लोकसभेच्या निवडणुकांमुळे आयपीएलचं अर्धच वेळापत्रक जाहीर, उर्वरित सामने कधी होणार?

रांची कसोटीत पाच दिवसांचे हवामान कसे असेल?

रांची येथे खेळल्या जाणाऱ्या या कसोटी सामन्याच्या पाच दिवसांच्या हवामानाबद्दल बोलायचे झाले तर, Accuweather च्या अहवालानुसार, २३ ते २६ फेब्रुवारी या कालावधीत तापमान २६ ते ३० अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ज्यामध्ये पावसाची कोणतीही आशा नाही. या कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी २७ फेब्रुवारीला पावसाची शक्यता आहे. अशा स्थितीत हा कसोटी सामना पाचव्या दिवशी पोहोचला तर हवामानही महत्त्वाची भूमिका बजावू शकते. २७ फेब्रुवारीला रांचीमध्ये २८ ते ३० अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता असून पावसाची ६७ टक्के शक्यता आहे.

हेही वाचा – IND vs ENG 4th Test : रांची कसोटीत पाऊस व्यत्यय आणणार? जाणून घ्या पाच दिवसांच्या हवामानाची माहिती

चौथ्या कसोटीसाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –

इंग्लंड: झॅक क्राउली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (यष्टीरक्षक), शोएब बशीर, टॉम हार्टले, ऑली रॉबिन्सन, जेम्स अँडरसन.

भारत : यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, सर्फराझ खान, रजत पाटीदार, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, आकाश दीप, मोहम्मद सिराज.