Ravichandran Ashwin breaks Kapil Dev’s record : भारताचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने आपल्या १००व्या कसोटीत आश्चर्यकारक कामगिरी केली. धरमशाला येथील इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात अश्विनच्या गोलंदाजीची जादू पाहायला मिळाली. पहिल्या डावात ४ बळी घेणाऱ्या या गोलंदाजाने दुसऱ्या डावात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सला आपला बळी बनवले. बेन स्टोक्सचा बळी मिळवत रविचंद्रन अश्विनने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्याचबरोबर अश्विनने भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांचे दोन विक्रम मोडले आहेत. त्याचबरोबर दुसऱ्या डावात पाच विकेट्सही घेतल्या.

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी अश्विनने अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने दुसऱ्या डावात बेन डकेट, झॅक क्रॉऊली आणि बेन स्टोक्स यांना आपले बळी बनवले. दुसऱ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर त्याने डकेटला क्लीन बोल्ड केले. यानंतर सहाव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर अश्विनने जॅक झॅक क्रॉऊली सर्फराझ खानकरवी झेलबाद केले. तो इथेच थांबला नाही. यानंतर त्याने इंग्लिश कर्णधारालाही आपला बळी बनवले. २३ षटकातील पाचव्या चेंडूवर बेन स्टोक्स बाद झाला.

अश्विनने कपिल देव यांचा मोडला विक्रम –

अश्विनने स्टोक्सला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १७दा बाद केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा एकाच फलंदाजाला बाद करणारा तो गोलंदाज ठरला. अश्विनने या प्रकरणात माजी कर्णधार कपिल देव यांचा विक्रम मोडला. माजी अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांनी आपल्या कारकिर्दीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजच्या डेसमंड हेन्सला १६ वेळा बाद केले होते.

हेही वाचा – ‘बेन स्टोक्सच्या नशिबात लिहिले होते की…’, रोहितची विकेट घेतल्यावर इंग्लंडच्या सहाय्यक प्रशिक्षकाचे मोठे वक्तव्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अश्विन या बाबतीतही कपिल देव यांच्या पुढे –

जर फक्त कसोटी क्रिकेटबद्दल बोलायचे. तर अश्विनने १३व्यांदा स्टोक्सला पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहे. कसोटीत सर्वाधिक वेळा एकाच फलंदाजाला बाद करणारा तो भारतीय गोलंदाज ठरला. अश्विनने या प्रकरणात कपिल देव यांचाही विक्रम मोडला आहे. भारताच्या माजी कर्णधाराने पाकिस्तानच्या मुदस्सर नजरला कसोटीत १२ वेळा बाद केले होते. अश्विनने डेव्हिड वॉर्नरला ११ वेळा पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहे. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज इशांत शर्माने इंग्लंडचा माजी कर्णधार ॲलिस्टर कुकला ११ वेळा बाद केले आहे.