India W vs England W 1st Test: भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने शनिवारी मुख्य प्रशिक्षक अमोल मजुमदार यांना संघासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्याचे श्रेय दिले. तिने कबूल केले की, “इंग्लंडविरुद्धच्या ३४७ धावांच्या विक्रमी विजयात प्रशिक्षकाने महत्त्वाची भूमिका बजावली कारण, त्यांच्याकडे कसोटी सामना जिंकण्याची ताकद होती. माझ्याकडे कर्णधारपदासाठी आवश्यक अनुभव नव्हता.” भारतीय महिला संघाला एवढ्या धावांनी सर्वात मोठा कसोटी विजयाचा विश्वविक्रम प्रस्थापित करण्यासाठी सात हंगाम लागले. टीम इंडियाचा इंग्लंडवर ३९ कसोटी सामन्यांमधला हा सहावा विजय ठरला.

२०१४ मध्ये कसोटी पदार्पण करणाऱ्या हरमनप्रीतने प्रथमच या फॉरमॅटमध्ये भारताचे नेतृत्व केले. हरमनप्रीतने मोठ्या विजयानंतर माध्यमांना सांगितले की, “आमच्या प्रशिक्षकाने आम्हाला खूप मदत केली. मला कसोटीत संघाचे नेतृत्व करण्याचा अनुभव नव्हता. मला मुझुमदार सरांच्या निर्णयांवर विश्वास होता, मग शुभाला (सतीश) पहिल्या डावात वन-डाऊन पाठवणे असो किंवा गोलंदाजीत त्यांनी जे काही बदल केले, जसे की आज पहिली ४० मिनिटे महत्त्वाची होती, या सर्व कल्पना त्यांच्या होत्या. सकाळच्या परिस्थितीचा स्विंग गोलंदाजीसाठी कर,” असे सांगितले.

IPL 2024 Gujarat Titans vs Delhi Capitals Match Updates in Marathi
IPL 2024: ‘तू वेडा आहेस का?’ लाइव्ह मॅचमध्ये आपल्याच संघातील खेळाडूवर कुलदीप यादव भडकला, पंतने असं शांत केलं प्रकरण; पाहा VIDEO
Boucher Pollard Argued With Umpire
MI vs CSK : चेन्नईविरुद्धच्या ‘लाइव्ह मॅच’मध्ये मुंबईच्या बाउचर, पोलार्ड आणि डेव्हिडने पंचांशी घातला वाद, पाहा VIDEO
IPL 2024 Chennai Rajasthan Royals vs Gujarat Titans Match Updates in Marathi
IPL 2024: “असा विचार करू नका…” हर्षा भोगलेंना विजयानंतर शुबमन गिल नेमकं काय म्हणाला, पाहा व्हीडिओ
Mohit Sharma on Ravi Shastri's Comment
GT vs SRH : वयांवरुन खिल्ली उडवणाऱ्या रवी शास्त्रींना मोहित शर्माचे चोख प्रत्युत्तर; म्हणाला, ‘माझं वय वाढतंय…’

हरमनप्रीत म्हणाली, “त्याच्या अनुभवाने आम्हाला खरोखर मदत केली आणि मला संघासाठी सर्वोत्तम काय आहे हे ठरवण्यासाठी वेळ दिला. तो म्हणाला की भारत आपल्या सर्व योजना अंमलात आणण्यात आणि आपल्या क्षेत्ररक्षणाने सर्वांना आश्चर्यचकित करण्यास सक्षम आहे, जे यजमानांसाठी निर्णायक ठरले. कर्णधार म्हणाला की पुढील आठवड्यात ऑस्ट्रेलियाचा सामना करण्यासाठी ते एकमात्र कसोटी सामना करण्यास तयार आहेत.

भारतीय कर्णधार पुढे म्हणाली, “सर्व काही योजनेनुसार घडले. आम्हाला मोठी धावसंख्या करता आली आणि त्यानंतर गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. मध्यमगती गोलंदाज आणि फिरकीपटू दोघांनाही त्यांच्या योजना माहित होत्या आणि त्यांनी त्यानुसार अंमलबजावणी केली. सर्वात सकारात्मक बाब म्हणजे आमचे क्षेत्ररक्षण. विशेषत: कसोटी फॉरमॅटमध्ये जेव्हा तुम्हाला ९० षटके एका दिवसात टाकायची असतात, तेव्हा ऊर्जा राखणे खूप महत्त्वाचे असते. आम्ही आमच्या क्षेत्ररक्षणासह खूप प्रगती केली आहे.”

हरमन म्हणाली की, “गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण योजना तयार करण्यासाठी भारताने पहिल्या डावातील फलंदाजीच्या अनुभवावर खूप अवलंबून राहिल्याने इंग्लंडचा संघ दोन डावांत १३६ आणि १३१ धावांत आटोपला.” हरमनप्रीत पुढे म्हणाली, “आमच्याकडे कसोटी क्रिकेट खेळण्याचा पुरेसा अनुभव नाही. कोणत्या प्रकारची फील्ड प्लेसमेंट कुठे लावायची हे माहीत नव्हते. त्यासाठी मुझुमदार सर यांचे मार्गदर्शन खूप मोलाचे ठरले. त्यांच्या मदतीशिवाय हे शक्य नव्हते. तुम्ही जितकी जास्त फलंदाजी कराल तितकेच तुमच्या गोलंदाजांसाठी कोणते क्षेत्ररक्षण सेट करायचे, हे तुम्हाला समजेल, असे त्यांनी सांगितले.”

हेही वाचा: Rohit Sharma: मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून रोहितला हटवल्यानंतर आकाश चोप्राचे सूचक विधान; म्हणाला, “… एका युगाचा अंत”

हरमनप्रीत म्हणाली, “याचे श्रेय गोलंदाजांनाही जाते. त्यांना जी फील्ड सेट करून दिली होती, त्यानुसार त्यांनी गोलंदाजी केली. तुमचे गोलंदाज जेव्हा योग्य ठिकाणी गोलंदाजी करू शकतात तेव्हा तुमचे काम सोपे होते.” हरमनप्रीतने पदार्पणाच्या कसोटीतच पहिल्या डावात ६९ धावा करणाऱ्या शुभाचे कौतुक केले आणि त्यात पुन्हा एकदा मुझुमदारांच्या भूमिकेचा उल्लेख केला. ती म्हणाला, “शुभाने आम्हाला खूप चांगली सुरुवात केली. हाही आमच्या प्रशिक्षकाचा निर्णय होता. एनसीएमध्ये सराव करताना त्यांनी तिला फलंदाजी करताना आणि डावाला पुढे नेताना पाहिले होते.”

टीम इंडियाची कर्णधार पुढे म्हणाली, “मुझुमदार म्हणाले की जर आम्ही तिला वन-डाउन पाठवू शकलो तर ती आम्हाला चांगली सुरुवात देऊ शकते. शुभाने देखील आम्हाला तिच्याकडून ज्या अपेक्षा होत्या त्याप्रमाणे तिने कामगिरी केली.” पुढील आठवड्यात वानखेडे स्टेडियमवर २१ ते २४ डिसेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार्‍या एकमेव कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाच्या दृष्टिकोनात कोणताही बदल होणार नसल्याचे भारतीय कर्णधाराने सांगितले.

कर्णधार शेवटी म्हणाली, “वानखेडेची खेळपट्टी या खेळपट्टीपेक्षा थोडी वेगळी आहे. आमच्याकडे सराव करण्यासाठी दोन ते तीन दिवस आहेत आणि खेळपट्टी कशी आहे ते बघून त्यानुसार आम्ही निर्णय घेऊ शकतो. पण आम्ही त्याच दृष्टिकोनाने पुढे जाऊ आणि जिंकू इच्छितो.” गोलंदाजी प्रशिक्षक ट्रॉय कुलीचे कौतुक करताना हरमनप्रीत म्हणाली की, “भारतीय गोलंदाजांना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड पुरुष संघाच्या माजी प्रशिक्षकावर खूप विश्वास आहे.” पुढे ती म्हणाली, “जेव्हाही आम्हाला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळते तेव्हा ते आम्हाला नेहमीच प्रेरणा देतो. विशेषत: गोलंदाजांना कोणत्या भागात गोलंदाजी करायची आहे, त्यांची लाईन आणि लेन्थ कशी असावी यावर मार्गदर्शन करतात.”

हेही वाचा: Champions Trophy: ठरलं! पाकिस्तान भूषवणार चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद, पीसीबीने आयसीसीबरोबर केला करार

जाता जाता हरमन म्हणाली, “गोलंदाजही स्वतःवर आणि त्यांच्या कामगिरीवर विश्वास ठेवतात. मी त्यांच्यासाठी जे काही निर्णय घेते त्यावर त्यांचा विश्वास असतो. ते निर्णय त्यांच्यासाठी करत असलेल्या योजनांची अंमलबजावणी करण्यास सक्षम ठरतात. तुम्‍हाला विश्‍वास ठेवता येईल अशा कोणाची गरज असते, विशेषत: प्रशिक्षक, आणि ते त्यांच्या कल्पना आणि योजनांवर विश्‍वास ठेवतात. याचा भविष्यातील कामगिरीवर नक्कीच सकारात्मक परिणाम होईल.”