Yashasvi Jaiswal broke Sourav Ganguly’s record 17 years ago : राजकोट कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात ज्या प्रकारची खेळी खेळली त्या खेळीनंतर यशस्वी जैस्वालने सर्वांची मने जिंकली. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात द्विशतक झळकावल्यानंतर यशस्वीने तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात या संघाविरुद्ध पुन्हा एकदा नाबाद द्विशतक झळकावले. या खेळीच्या जोरावर त्याने सौरव गांगुलीचा विक्रम मोडला. त्याचबरोबर वसीम अक्रमच्या विक्रमाशी बरोबरी केली.

यशस्वीला पहिल्या मोठी खेळी करता आली नाही, पण दुसऱ्या डावात त्याने नाबाद २१४ धावा केल्या. यादरम्यान त्याने १२ षटकार आणि १४ चौकार मारले. या खेळीच्या जोरावर यशस्वीने सौरव गांगुलीचा १७ वर्ष जुना विक्रम मोडला. जो त्याने पाकिस्तानविरुद्ध केला होता, तर त्याने १२ षटकार मारून वसीम अक्रमच्या विक्रमाशी बरोबरी केली.

IPL 2024 Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनीचा अद्भुत षटकार! संपूर्ण कारकिर्दीत माहीने पहिल्यांदाच लगावला भन्नाट शॉट; एबी-सूर्यालाही विसराल
IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: आशुतोष शर्माची आयपीएलमध्ये ऐतिहासिक कामगिरी, १७ वर्षांच्या इतिहासात ही कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
Rr Vs Gt Ipl 2024 Sanju Samson 50th Match As Captain
RR vs GT : संजू सॅमसनने ५०व्या सामन्यात केला खास पराक्रम, ‘या’ बाबतीत रोहित शर्मासह तीन कर्णधारांना टाकले मागे
Abhishek Sharma Breaks Chris Gayle and Sunil Narine's Record in SRH vs CSK Match
SRH vs CSK : अभिषेकने वादळी खेळीच्या जोरावर मोडला गेल-नरेनचा विक्रम, IPL मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज

यशस्वी जैस्वालने मोडला गांगुलीचा १७ वर्षे जुना विक्रम –

यशस्वी जैस्वालने इंग्लंडविरुद्धच्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांमध्ये ५४५ धावा केल्या आहेत. आता भारतासाठी कोणत्याही कसोटी मालिकेत डावखुरा फलंदाज म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो पहिल्या क्रमांकावर आहे. पण यापूर्वी हा विक्रम माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या नावावर होता, ज्याने २००७ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत एकूण ५३४ धावा केल्या होत्या.

हेही वाचा – IND vs ENG : द्विशतकानंतर यशस्वी जैस्वालची विराट-कांबळीच्या विक्रमाशी बरोबरी, गावसकरांच्या क्लबमध्येही मिळवले स्थान

भारतासाठी कसोटी मालिकेत डावखुऱ्या फलंदाजांनी केलेल्या सर्वाधिक धावा –

५४५ धावा- यशस्वी जैस्वाल विरुद्ध इंग्लंड, २०२४ (मायदेशात)
५३४ धावा- सौरव गांगुली विरुद्ध पाकिस्तान, २००७ (मायदेशात)
४६३ धावा- गौतम गंभीर विरुद्ध ऑस्ट्रेलिया, २००८ (मायदेशात)
४४५ धावा गौतम गंभीर विरुद्ध न्यूझीलंड, २००९ (विदेशात)

यशस्वीने अक्रमच्या २८ वर्षे जुन्या विक्रमाशी केली बरोबरी –

यशस्वी जैस्वालने राजकोट कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात इंग्लंडविरुद्ध १२ षटकार ठोकले. आता तो कसोटी क्रिकेटच्या एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत वसीम अक्रमसह संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. वसीम अक्रमने २८ वर्षांपूर्वी १९९६ मध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या कसोटी डावात एकूण १२ षटकार मारले होते.

हेही वाचा – Mike Procter : दक्षिण आफ्रिकेच्या महान क्रिकेटपटूचे निधन, वयाच्या ७७ वर्षी घेतला अखेरचा श्वास

एका कसोटी डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम –

१२ षटकार- यशस्वी जैस्वाल विरुद्ध इंग्लंड, राजकोट २०२४
१२ षटकार- वसीम अक्रम विरुद्ध झिम्बाब्वे, शेखुपुरा १९९६
११ षटकार- मॅथ्यू हेडन विरुद्ध झिम्बाब्वे, पर्थ २००३
११ षटकार- नॅथन ॲस्टल विरुद्ध इंग्लंड, क्राइस्टचर्च २००२
११ षटकार- ब्रेंडन मॅक्क्युलम विरुद्ध पाकिस्तान, शारजाह २०१४