IND vs IRE 2nd T20 Match Updates: भारताने आयर्लंडचा ३३ धावांनी पराभव करत तीन सामन्यांची मालिका जिंकली. भारतीय संघाने टी-२० मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना १८५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात आयर्लंडचा संघ केवळ १५२ धावा करू शकला आणि सामना गमावला.

या विजयासह भारताने तीन सामन्याची मालिका २-० ने खिशात घातली आहे. मालिकेतील अखेरचा सामना २३ ऑगस्टला होणार आहे.

RCB's unwanted record
GT vs RCB : गुजरातविरुद्धच्या विजयानंतरही आरसीबीने नोंदवला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत पंजाब किंग्जची केली बरोबरी
Rajat Patidar's 4 Consecutive Sixes Video Viral
६,६,६,६…पाटीदारने मयंकच्या षटकात धावांचा पाऊस पाडत रचला इतिहास, आरसीबीसाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू
Royal Challengers Bangalore Unwanted Record
KKR vs RCB : आरसीबीच्या संघाने नोंदवला नकोसा विक्रम, IPL इतिहासात पहिल्यांदाच ‘या’ रेकॉर्डची झाली नोंद
Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव

भारताने दिलेल्या १८६ धावांचा पाठलाग करताना आयर्लंडची सुरुवात निराशजनक झाली. कर्णधार पॉल स्टर्लिंग शून्य धावा केल्या. दुसरा सलामी फलंदाज एंड्रयू बालबर्नी याने एकाकी झुंज दिली. एंड्रयू बालबर्नीने ५१ चेंडूत चार षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने ७२ धावांची खेळी केली. बालबर्नी वगळता एकाही फलंदाजाला तीस धावांचा पल्ला पार करता आला नाही.

भारताकडून जसप्रीत बुमराहने चार षटकात १५ धावा देत दोन विकेट घेतल्या. प्रसिद्ध कृष्णा आणि रवि बिश्नोई यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. तसेच, अर्शदीप सिंह यानेही एक विकेट घेतली आहे.