India vs Neverlands Warm up: २०२३च्या विश्वचषकात भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहे. हा सामना ८ ऑक्टोबर रोजी होणार आहे. भारतासोबतच इतर संघही विश्वचषकापूर्वी सराव सामने खेळत आहेत. टीम इंडियाचा पहिला सामना इंग्लंडविरुद्ध होता जो पावसामुळे वाहून गेला होता. आता दुसरा सामना नेदरलँडशी होणार आहे. भारत आणि नेदरलँड्सचे संघ तब्बल १२ वर्षांनंतर एकमेकांविरुद्ध मैदानात उतरणार आहेत.

भारत आणि नेदरलँड यांच्यात आतापर्यंत एकूण तीन सामने झाले आहेत. यामध्ये दोन एकदिवसीय आणि एका टी२० सामन्याचा समावेश आहे. भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील पहिला वन डे फेब्रुवारी २००३ मध्ये खेळला गेला. टीम इंडियाने तो ६८ धावांनी जिंकला. दुसरा आणि आत्तापर्यंतचा शेवटचा वनडे सामना मार्च २०११ मध्ये खेळला गेला. टीम इंडियाने तो ५ विकेट्सने जिंकला, हा सामना दिल्लीत झाला होता. त्यामुळे आता १२ वर्षांनंतर दोन्ही संघ वन डे फॉरमॅटमध्ये एकमेकांविरुद्ध मैदानात उतरणार आहेत. भारत आणि नेदरलँड यांच्यात टी२० सामनाही खेळला गेला आहे. तो ऑक्टोबर २०२२ मध्ये आयोजित करण्यात आला होता. टीम इंडियाने ५६ धावांनी विजय मिळवला. अशाप्रकारे नेदरलँड संघाला भारताविरुद्धचा एकही सामना अद्याप जिंकता आलेला नाही. २०२३चा विश्वचषक जिंकणेही त्याच्यासाठी सोपे नसेल.

नेदरलँड्सविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीवर नजर टाकली तर युवराज सिंग पहिल्या क्रमांकावर आहे. युवीने २ सामन्यात ८८ धावा केल्या आहेत. या काळात त्याने नाबाद अर्धशतकही झळकावले. दुसऱ्या क्रमांकावर सचिन तेंडुलकर आहे. सचिनने ७९ धावा केल्या आहेत. विराट कोहली नेदरलँडविरुद्धही खेळला आहे. त्याने दोन सामन्यांत ७४ धावा केल्या आहेत. त्यात एक वन डे आणि एक टी२० सामना होता.

हेही वाचा: Asian Games 2023: प्रणॉयच्या दुखापतीने भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाचे सुवर्णपदक हुकले, फायनलमध्ये चीनकडून पराभव

ग्रीनफील्ड स्टेडियम तिरुवनंतपुरम खेळपट्टी अहवाल

या स्टेडियमची खेळपट्टी अतिशय संतुलित खेळपट्टी आहे, येथे गोलंदाज आणि फलंदाज दोघांनाही समान मदत मिळते. वेगवान गोलंदाजाला येथे खूप चांगला स्विंग मिळतो आणि तो फलंदाजांसाठीही धोकादायक ठरतो. मधल्या षटकांमध्ये फिरकी गोलंदाजांनाही चांगली मदत मिळते, याच काळात फिरकी गोलंदाज विकेट घेण्यात यशस्वी होतात. वनडेमध्ये पहिल्या डावाची सरासरी २४७ धावा आहे. मात्र, या स्टेडियममध्ये आतापर्यंत केवळ दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत.

तिरुवनंतपुरमचा हवामान अहवाल

वेदरकॉमने दिलेल्या हवामान अंदाजानुसार, मंगळवारी तिरुअनंतपुरममध्ये कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस आणि किमान २४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल. संपूर्ण सामन्यात पाऊस आणि ढगाळ आकाश राहण्याची ९०% शक्यता आहे.

हेही वाचा: IND vs NED: अनुष्काच्या प्रेग्नन्सीच्या चर्चा अन् विराट कोहली सराव सामना सोडून परतला मुंबईत; टीम इंडियाची सोडली साथ? जाणून घ्या

असे आहेत दोन्ही संघ:

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेदरलँड्स: स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), मॅक्स ओ’डॉड, बास डी लीडे, विक्रम सिंग, तेजा निदामनुरु, पॉल व्हॅन मीकरेन, कॉलिन एकरमन, रॉल्फ व्हॅन डर मर्वे, लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त, रायन क्लाइन, वेस्ली बॅरेसी, साकिब झुल्फिकार, शारिझ अहमद, साइब्रांड एंगेलब्रेक्ट.