IND vs NZ 1st Test Day 2 Time Changed: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या कसोटीतील पहिला सामना आजपासून म्हणजेच १६ ऑक्टोबरपासून बेंगळुरू येथे सुरू होणार होता. पण कसोटीच्या पहिल्या दिवशीच जोरदार पावसाने हजेरी लावली होती. या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला आहे. बंगळुरूमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे आणि या कारणामुळे सामना सुरू होऊ शकला नाही. तर नाणेफेकही होऊ शकली नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने याबाबत माहिती दिली आहे. आता बीसीसीआयने गुरूवारी दुसऱ्या दिवसाचा खेळ नव्या वेळेत सुरू होणार आहे.

हेही वाचा – IND vs PAK: “भारताबद्दल बोलण्यावर बंदी…”, पाकिस्तानच्या कर्णधाराचे खळबळजनक वक्तव्य, भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी पाहा नेमकं काय म्हणाला?

भारत-न्यूझीलंड पहिला कसोटी सामना बुधवारी सकाळी ९.३० वाजता सुरू होणार होता. तत्पूर्वी ९ वाजता नाणेफेक होणार होती. पण पहिल्या दिवशी म्हणजेच आज खूप पाऊस पडला, ज्यामुळे नाणेफेकही झाली नव्हती. मध्येच पाऊस थांबला होता, पण पुन्हा सुरू झाल्याने सामना रद्द झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे दुसऱ्या दिवशी म्हणजेच उद्या गुरूवारी सामन्याची आणि नाणेफेक होण्याची नवी वेळ सांगितली आहे. या सामन्यासाठी नाणेफेक गुरुवारी सकाळी ८.४५ वाजता होणार आहे. तर सामना ९.१५ वाजता सुरू होईल.

हेही वाचा – IND vs NZ कसोटी मुंबईतील वानखेडेमध्ये होणार, रेल्वे तिकिटापेक्षाही मॅचची तिकिटे स्वस्त; कधीपासून सुरू होणार ऑनलाईन बुकिंग?

IND vs NZ: दुसऱ्या दिवसाचा खेळ किती वाजता सुरू होणार?

बंगळुरू कसोटीच्या दुसऱ्या दिवशीच्या सामन्याची वेळ बदलल्याने सत्राची वेळही बदलली आहे. दिवसाचे पहिले सत्र सकाळी ९.१५ ते ११.३० पर्यंत असेल. दुसरे सत्र दुपारी १२.१० ते ०२.२५ पर्यंत असेल. तर तिसरे सत्र दुपारी ०२.४५ ते ०४.४५ पर्यंत असेल.

दुसऱ्या दिवसाचे सत्र आणि वेळ
सकाळचे पहिले सत्र – ९.१५ ते ११.३०
दुपारचे दुसरे सत्र – १२.१० ते २.४५
संध्याकाळचे तिसरे सत्र – २.४५ ते ४.४५

हेही वाचा – Bangladesh Coach: बांगलादेशी खेळाडूच्या श्रीमुखात लगावल्याने संघाच्या कोचची पदावरून हकालपट्टी, बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय

भारत-न्यूझीलंड दुसरा कसोटी सामना १५ मिनिटे लवकर सुरू होईल आणि त्यानंतर प्रत्येक सत्रात १५ मिनिटं जोडली जातील. कसोटी क्रिकेटमध्ये एका दिवसात सुमारे ९० षटके खेळली जातात. पण भारत विरुद्ध न्यूझीलंड मालिकेतील पहिल्या सामन्यात प्रत्येक सत्रात थोडा वेळ जोडून किमान ९८ षटके खेळवण्याचा प्रयत्न केला जाईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विराट-यशस्वीचा मैदानावरील फोटो होतोय व्हायरल

अहवालानुसार विराट कोहलीसह काही भारतीय खेळाडूंनी इनडोर सरावही केला. सरावामुळे मैदान खूपच ओले झाले होते, त्यामुळे खेळाडूंनी इनडोर सराव केला. विराट कोहली आणि यशस्वी जैस्वाल मैदानातून सराव बॅग घेऊन जाताना दिसले. या दोघांचाही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.