भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामने नेहमीच रोमांचक होत असतात. उभय संघ केवळ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये खेळताना दिसतात. या सामन्यांना नेहमीच प्रेक्षक वर्ग आणि मिडिया कव्हरेज असते. यातून उत्पन देखील अधिक मिळते. याच अनुषंगाने इंग्लंड क्रिकेट मंडळाने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कसोटी मालिकेसाठी पुढाकार घेतला होता. जवळपास मागील १५ वर्षांपासून या दोन्ही देशांदरम्यान कोणतीही कसोटी मालिका खेळली गेलेली नाही. मात्र, आता चाहत्यांना पुन्हा एकदा भारत पाकिस्तान कसोटी सामना पाहण्याची पर्वणी मिळू शकते.

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष मार्टिन डार्लो यांनी नुकतीच पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. पाकिस्तान आणि इंग्लंडमध्ये सध्या सात सामन्यांची टी२० मालिका खेळली जात आहे. ईसीबी भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान इंग्लंडमध्ये तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेचे तटस्थ आयोजक म्हणून यजमानपद भूषवण्यासाठी तयार असल्याचे त्यांनी म्हटले. ही मालिका इंग्लंडमध्ये राहणाऱ्या आशियाई लोकांना आकर्षित करू शकते असे त्यांचे मत आहे. तसेच यामुळे क्रिकेटच्या लोकप्रियतेतही वाढ होईल.

हेही वाचा :  IND vs SA: भारतीय संघाविषयी आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाचे टी२० मालिकेआधी मोठे विधान, जाणून घ्या काय म्हणाला… 

टेलिग्राफच्या वृतानुसार इंग्लंड क्रिकेट मंडळाने भारत विरुद्ध पाकिस्तान कसोटी मालिका इंग्लंडमध्ये आयोजित करण्याची ऑफर दिली होती. भारत आणि पाकिस्तान यांच्यात जवळपास दशकभरात कोणतीही द्विपक्षीय मालिका झालेली नाही. त्यामुळे आता होऊ शकते असे त्यांनी म्हटले. एका प्रमुख वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआय अधिकाऱ्यांनी याबाबत आपले मत सांगितले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, “ईसीबीने पीसीबीला भारत-पाकिस्तान मालिकेविषयी विचारणे हेच मुळता हास्यास्पद वाटते.”

हेही वाचा :  IND vs SA 1st T20: रोहित आणि विराटसाठी दाक्षिणात्य क्रिकेट चाहत्यांकडून विशेष सरप्राईज; मैदानाबाहेरील ही दृश्यं पाहिलीत का? 

ते पुढे असेही म्हणाले की, “अशा प्रकारची मालिका आयोजित करणे आमच्या हातात नव्हे तर सरकारच्या हातात आहे. पुढील काही वर्ष तरी अशी मालिका खेळली जाण्याची कोणतीही शक्यता नाही. आम्ही जास्त पुढचे काही सांगू शकत नाही.” पण या प्रस्तावाला आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) केराची टोपली दाखवल्याचे वृत्त समोर येत आहे. नजीकच्या काळात तरी ही मालिका शक्य नसल्याचे बीसीसीआयकडून सांगण्यात येतेय.