Asia Cup 2025 Team India Playing 11 Announced: भारत आणि पाकिस्तानचे संघ आशिया चषक २०२५ च्या सुपर फोर टप्प्यात आज भिडत आहेत. गट टप्प्यातील सामन्यात भारत आणि पाकिस्तान सामन्यात हस्तांदोलनच्या वादावरून मोठा गोंधळ झाला होता. यात भारतीय संघातील खेळाडूंना पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलनास नकार दिला होता. नाणेफेकीवेळीही सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हस्तांदोलन केलं नव्हतं. त्यामुळे या सामन्यात कसं वातावरण असणार यावर सर्वांच्या नजरा आहेत.
भारत आणि पाकिस्तान सुपर फोर टप्प्यातील सामन्याची नाणेफेक जिंकली आहे आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर पाकिस्तानचा संघ प्रथम फलंदाजीने सामन्याला सुरूवात करणार आहे. हा सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. या सामन्याकरता भारताने प्लेईंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले आहेत. तर पाकिस्तानच्या प्लेईंग इलेव्हनमध्येही दोन बदल करण्यात आले आहेत.
भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये दोन बदल करण्यात आले आहेत. अर्शदीप सिंग आणि हर्षित राणाच्या जागी जसप्रीत बुमराह व वरूण चक्रवर्ती यांची प्लेईंग इलेव्हनमध्ये निवड केली आहे. गट टप्प्यात भारतीय संघाची जशी प्लेईंग इलेव्हन होती, त्याच प्लेईंग इलेव्हनसह टीम इंडिया सुपर फोरमध्ये उतरली आहे. तर पाकिस्तानच्या संघात हसन नवाज आणि खुशदिल शाह संघात परतले आहे. भारताच कर्णधार सूर्यकुमार यादवचा या सामन्यातही तोच स्वॅग पाहायला मिळाला. सूर्यादादाने पुन्हा एकदा पाकिस्तानच्या कर्णधाराकडे दुर्लक्ष केलं आणि हस्तांदोलन केलं नाही.
पाकिस्तानची प्लेईंग इलेव्हन
सैम अयुब, साहिबजादा फरहान, फखर जमान, सलमान आघा (कर्णधार), हुसैन तलत, मोहम्मद हारिस (यष्टीरक्षक), मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, हारिस रौफ, अबरार अहमद
भारत प्लेइंग इलेव्हन
अभिषेक शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती