IND vs PAK Sunny Deol Champions Trophy 2025 :आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आज (रविवार, २३ फेब्रुवारी) भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना दुबईच्या आंदरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. या सामन्याकडे जगभरातील क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात बॉलिवूड अभिनेता सनी देओलची एंट्री झाली आहे. एका बाजूला भारत-पाकिस्तान सामना चालू आहे. तर, दुसऱ्या बाजूला या सामन्याचं प्रसारण करणाऱ्या स्टार स्पोर्ट्स वाहिनीच्या स्टुडिओला सनी देओलने भेट दिली. यावेळी सनी देओलची छोटीशी मुलाखत घेण्यात आली. ज्यावेळी त्याला क्रिकेट व भारत-पाकिस्तान सामन्याविषयी वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आले. त्यावर सनीने देखील दिलखुलास उत्तरं दिली. ‘जाट’ या सनीच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सनी देशभर फिरत आहे.

या मुलाखतीच्या वेळी सनीने त्याच्या चित्रपटाचा प्रचार करण्याची संधी सोडली नाही. त्याला भारतीय संघात स्थान मिळालं तर कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करायला आवडेल? असा प्रश्न विचारल्यावर सनी म्हणाला, “मी जाट आहे, तुम्हाला वाट्टेल त्या क्रमांकावर मला मला मैदानात उतरवा, मी धुमाकूळ घालेन”.

सनी देओलला विचारण्यात आलेले रॅपिड फायर प्रश्न

प्रश्न : तुमचा आवडता खेळाडू कोण आहे?

उत्तर : सर्वच जण माझे फेव्हरेट आहेत. सर्व खेळाडू देशासाठी प्राण पणाला लावून खेळतात.

प्रश्न : भारतीय संघासाठी एखादा डायलॉग म्हणून दाखवा

उत्तर : जब ये ढाई किलो के हाथ में बल्ला आता है ना, तो गेंद बाउंड्री पार नहीं, बॉर्डर पार चली जाती है (या अडीच किलोच्या हातात बॅट येते तेव्हा चेंडू मैदानाच्या पलिकडे नव्हे तर देशाच्या सीमेपलिकडे जातो)

प्रश्न : तुम्ही क्रिकेटपटू असता तर कोणत्या क्रमांकावर फलंदाजी केली असती?

उत्तर : मी जाट आहे, तुम्हाला वाट्टेल त्या क्रमांकावर मला मला मैदानात उतरवा, मी धुमाकूळ घालेन.

प्रश्न : आजच्या सामन्याबद्दल काय सांगाल?

उत्तर : हिंदुस्तान जिंदाबाद था, हिंदुस्तान जिंदाबाद हैं और जिंदाबाद रहेगा।

प्रश्न : विराट कोहलीबाबत तुमचं मत काय?

उत्तर : चक दे फट्टे।

प्रश्न : विराट कोहलीबाबत तुमचं मत काय?

उत्तर : हिटमॅन

प्रश्न : पाकिस्तानकडे भारताला पराभूत करण्याची संधी आहे का?

उत्तर : हा हा हा हा हा हा….। सॉरी बोल।

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सनी देओलबरोबर भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी हा देखील या हाय व्होल्टेज सामन्याचा आनंद घेताना दिसून आला.