२०१९ विश्वचषकानंतर भारतीय निवड समितीने आगामी टी-२० विश्वचषक लक्षात घेता ऋषभ पंतला पहिली पसंती दिली. मात्र वारंवार संधी देऊनही विंडीज आणि आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिकेत पंतने फलंदाजीमध्ये निराशा केली. ज्यामुळे आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत पंतला विश्रांती देत वृद्धीमान साहाला संधी दिली. वृद्धीमान साहानेही आपल्या मिळालेल्या संधीचं सोनं करत संघातील आपल्या स्थानावर पुन्हा एकदा दावा केला आहे.

अवश्य वाचा – Video : वृद्धीमान साहाचा यष्टींमागे ‘सुपरमॅन’ अवतार

दुसऱ्या डावात वृद्धीमान साहाने यष्टींमागे दोन सुरेख झेल पकडत आफ्रिकेच्या फलंदाजांवर दबाव टाकला. आकडेवारी पाहता, जलदगती गोलंदाजीवर यष्टींमागे वृद्धीमान साहा झेल घेण्यात सर्वात यशस्वी यष्टीरक्षक ठरतो आहे.

जलदगती गोलंदाजीवर यष्टींमागे झेल घेण्यात साहाची टक्केवारी ही ९६.९ असून पंत या यादीमध्ये नवव्या स्थानावर आहे. याचसोबत इतर देशातील यष्टीरक्षकांनाही साहासारखी कामगिरी करता आलेली नाहीये. कसोटी मालिकेसाठी विराट कोहली आणि रवी शास्त्री यांनी वृद्धीमान साहाच्या यष्टीरक्षण कौशल्याचं कौतुक केलं होतं. त्यात पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये केलेल्या सर्वोत्तम कामगिरीनंतर आगामी मालिकांमध्ये ऋषभ पंतला संघात स्थान मिळणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – Video : वृद्धीमान साहाची तारेवर कसरत, डु-प्लेसिस स्वस्तात माघारी