India vs South Africa T20I Series India Squad: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात चार सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. बॉर्डर गावसकर ट्रॉफी संघाबरोबरच दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टी-२० मालिकेसाठीही संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेतील पहिला सामना ८ नोव्हेंबरपासून खेळवला जाणार आहे. टीम इंडियाचे कर्णधारपद पुन्हा एकदा सूर्यकुमार यादवकडे असणार आहे. टीम इंडियाच्या संघात तीन नवीन खेळाडूंनाही संधी मिळाली आहे. या मालिकेदरम्यान हे नवे खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करू शकतात. काही खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत.

IND vs SA: कोणत्या ३ नव्या खेळाडूंनी संधी मिळाली?

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-२० मालिकेदरम्यान टीम इंडियासाठी तीन खेळाडू आंतरराष्ट्रीय पदार्पण करू शकतात. त्या खेळाडूंमध्ये रमणदीप सिंग, विजयकुमार वैशाख आणि यश दयाल यांच्या नावांचा समावेश आहे. या तीन खेळाडूंचा पहिल्यांदाच टीम इंडियाच्या संघात समावेश करण्यात आला आहे. बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत यश दयालला संधी मिळाली, पण त्याला पदार्पण करता आले नाही. याशिवाय काही खेळाडूंनाही या संघातून वगळण्यात आले आहे.

हेही वाचा – IND vs AUS: बॉर्डर-गावस्कर मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर; ऋतुराजऐवजी अभिमन्यू इश्वरनला संधी, नितीश कुमार रेड्डी-हर्षित राणाचा समावेश

दुखापतीमुळे मयंक यादव संघाबाहेर

आफ्रिकेविरूद्धच्या या टी-२० मालिकेसाठी काही खेळाडूंना संधी मिळालेली नाही. या खेळाडूंमध्ये मयंक यादव, शिवम दुबे आणि रियान पराग यांच्या नावाचा समावेश आहे. या तिन्ही खेळाडूंना दुखापतीमुळे संघात स्थान मिळालेले नाही. मयंक यादव आणि रियान पराग बांगलादेशविरुद्ध टीम इंडियाचा भाग होते. नितीशकुमार रेड्डी याच्या नावाचाही या संघात समावेश नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाच्या संघात त्याचा समावेश करण्यात आला आहे.

हेही वाचा – ACC Emerging Asia Cup: अफगाणिस्तानने युवा टीम इंडियाला दिला पराभवाचा धक्का; जेतेपदाचं स्वप्न भंगलं

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार वैशाख, आवेश खान, यश दयाल.