भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा ६७ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने ३७३ धावा केल्या. प्रत्युत्तरात लंकेचा संघ केवळ ३०६ धावाच करू शकला. या विजयासह भारतीय संघाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

भारतीय संघाच्या विजयाचा हिरो ठरला किंग कोहली, ज्याने शतक झळकावून सर्वांना मंत्रमुग्ध केले. विराट कोहलीने ८७ चेंडूचा सामना करताना १२ चौकार आणि १ षटकार लगावला. त्याचबरोबर त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ७३वे शतक झळकावले. या खेळीनंतर विराटचा मित्र सूर्यकुमार यादवने त्याची मुलाखत घेतली आणि अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.

विराट आणि सूर्या दिसले मस्तीच्या मूडमध्ये –

बीसीसीआय टीव्हीवर शेअर केलेल्या मुलाखतीत विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव मस्तीच्या मूडमध्ये दिसले. सुरुवातीला दोन्ही खेळाडू एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात, तर नंतर कोहली सूर्याचे कौतुक करतो आणि म्हणतो की आम्ही इतक्या वर्षांपासून हे करत आहोत, पण तू गेल्या वर्षी जे केले ते खूप खास आहे. या कौतुकाने सूर्याही आनंदी होतो. त्यानंतरही कोहली म्हणतोम्हणतो की प्रत्येक गोलंदाजाला तुला बाद करायचे असते.

हेही वाचा – Rahul Dravid Birthday: ‘या रिपोर्टरला बाहेर काढा…’, जेव्हा पाकिस्तानात संतापला होता द्रविड, जाणून घ्या किस्सा

विश्वचषक आणि ऑस्ट्रेलिया मालिकेबाबत विराटने हे सांगितले –

विराट कोहलीने या मुलाखतीत सूर्याला सांगितले की, या सामन्यात शतक झळकावल्याने मला खूप आत्मविश्वास मिळेल. विशेषत: या वर्षी विश्वचषक आहे आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकाही आहे जी खूप महत्त्वाची आहे. त्यासाठी मला सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागेल.

हेही वाचा – IND vs AUS Test Series: टीम इंडिया सावधान! ऑस्ट्रेलियाने ४ फिरकीपटूंसह १८ सदस्यीय संघ केला जाहीर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विराटने सांगितले की तो कसा फॉर्ममध्ये आला –

गेल्या वर्षीच्या सुरुवातीला विराट कोहली खराब फॉर्मशी झुंजत होता. त्याला संघातून वगळण्यात देखील आले होते, पण त्याने आशिया कपमध्ये पुनरागमन करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. त्याने सांगितले की लोकांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली दबल्याने अस्वस्थ झालो होतो. त्याचा माझ्या कुटुंबावरही परिणाम होत होता. हे लक्षात घेऊन मी नेटमध्ये भरपूर सराव करून स्वतःला तयार केले आणि हेच सर्वांनी केले पाहिजे.