scorecardresearch

IND vs SL 2nd ODI: केएल राहुल धोनीची नक्कल करायला गेला अन्…चाहते म्हणाले, ‘क्या धोनी बनेगा तू?’ पाहा VIDEO

IND vs SL 2nd ODI Updates: भारत आणि श्रीलंका संघांत दुसरा वनडे सामना खेळला जातोय. या सामन्यात श्रीलंकेने भारताला २१६ धावांचे लक्ष्य दिले आहे. या दरम्यान केएल राहुलचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

IND vs SL 2nd ODI: केएल राहुल धोनीची नक्कल करायला गेला अन्…चाहते म्हणाले, ‘क्या धोनी बनेगा तू?’ पाहा VIDEO
यष्टीरक्षक केएल राहुल (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

वनडे मालिकेतील दुसरा सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्स येथे खेळला जात आहे. जेथे श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर २१६ धावांचे लक्ष्य ठेवले. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली. ज्यामुळे श्रीलंकेचा डाव ३९.४ षटकांत २१५ धावांवर गुंडाळला. या दरम्यान एक अशी घटना घडली, ज्यामुळे केएल राहुल सोशल मीडियावर जोरदार ट्रोल होत आहे.

श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २१५ धावा केल्या. नवोदित नुवानिंदू फर्नांडोने शानदार अर्धशतक झळकावले, पण इतर फलंदाजांनी निराशा केली. भारताकडून मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांनी जबरदस्त गोलंदाजी केली. वास्तविक, केएल राहुलचा यष्टिरक्षक म्हणून प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला होता, परंतु सामन्यादरम्यान त्याने महान कर्णधार आणि यष्टीरक्षक एमएस धोनीच्या शैलीत फलंदाजाला बाद करण्याची चूक केली.

श्रीलंकेच्या डावाच्या १५व्या षटकात ही घटना घडली. नुवानिंदू फर्नांडो आणि कुसल मेंडिस ही जोडी मैदानावर फलंदाजी करत होती. दरम्यान, हार्दिक पांड्याच्या चेंडूवर शॉट खेळून नुवानिंदू धावला. यादरम्यान सूर्यकुमार यादव फाइन लेगवर फसला, पण लगेच चेंडू पकडला आणि यष्टिरक्षकाच्या दिशेने फेकला. येथे यष्टीरक्षक केएल राहुल यष्टीच्या खूप पुढे आला होता, अशावेळी तो एमएस धोनीची नक्कल करताना दिसला.

म्हणजेच यष्टी आणि फलंदाजाकडे न बघता चेंडू सरळ यष्टीवर मारुन फलंदाजाला पॅव्हेलियनमध्ये पाठवायचे होते, पण यादरम्यान चेंडू यष्टीवर लागला नाही. त्यामुळे फलंदाज बाद झाला नाही. तसेच फलंदाजांने आरामात धाव पूर्ण केली. आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका यूजरने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले, ‘हद है यार, धोनी बनेगा ये?’

हेही वाचा – IND vs SL 2nd ODI: सामन्यापूर्वी राहुल द्रविडला उद्भवला बीपीचा त्रास; जाणून घ्या आता कशी आहे तब्येत

सध्या केएल राहुलचा फॉर्म फारसा चांगला नाही. त्यामुळेच केएल राहुलच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या चुकीवर सोशल मीडियावर चाहते प्रतिक्रिया देत आहेत. इशान किशनने नुकतेच एकदिवसीय फॉर्मेटमध्ये द्विशतक झळकावले आहे, अशा परिस्थितीत युवा इशान किशनला संघात स्थान दिले पाहिजे, अशी चाहत्यांची इच्छा आहे. पहिल्या सामन्यात केएल राहुलने फलंदाजीला अनुकूल खेळपट्टीवर ३९ धावा केल्या होत्या.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-01-2023 at 18:54 IST

संबंधित बातम्या