India vs West Indies 2nd T20I: भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसरा टी २० सामना सोमवारी (१ ऑगस्ट) सेंट किट्समधील बॅस्टेअर वॉर्नर पार्क येथे खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होईल. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने ६८ धावांनी जिंकला होता. त्यामुळे आपली विजयी घोडदौड कायम ठेवण्याच्या हेतून भारतीय संघ मैदानात उतरेल. तर, वेस्ट इंडीजचा संघ पाहुण्या संघाला लगाम घालून विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करेल.

या मैदानावरती धावांचा पाठलाग करणे हा अधिक योग्य पर्याय आहे. येथील खेळपट्टी प्रामुख्याने गोलंदाजांना मदत करणारी आहे. वेस्ट इंडीजने येथे खेळलेल्या १० सामन्यांपैकी सहा जिंकले आहेत आणि दोन गमावले आहेत. आज या ठिकाणी पावसाची शक्यता नाही. मात्र, वेस्ट इंडीजचे हवामान लहरी आहे. त्यामुळे अचानक पावसाची एखादी सर कोसळी तर आश्चर्य वाटणार नाही.

हेही वाचा – IND W Vs PAK W T20 in CWG 2022 : स्मृतीला बघून चाहत्यांना आली धोनीची आठवण!

आगामी टी २० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघ प्रत्येक सामना गांभीर्याने घेत असल्याचे दिसत आहे. पहिल्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन आणि रवि बिश्नोई हे तीन फिरकीपटू खेळवून अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला होता. याशिवाय सलामीवीर म्हणून तो सूर्यकुमार यादवसह मैदानात उतरला होता. आजच्या सान्यातही तो काही बदल करेल का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

भारत संभाव्य संघ: रोहित शर्मा (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, रविंद्र जडेजा, रवि बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, रविचंद्रन अश्विन, अर्शदीप सिंग.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वेस्टइंडीज संभाव्य संघ: शामराह ब्रूक्स, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, निकोलस पूरन (कर्णधार), कायले मेयर्स, जेसन होल्डर, अकील होसेन, ओडियन स्मिथ, कीमो पॉल, अल्जारी जोसेफ, ओबेड मॅककॉय.