IND vs WI 2nd Test Day 1 Live Updates in Marathi: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. भारताने पहिला कसोटी सामना एक डाव आणि १४० धावांनी जिंकला. यासह टीम इंडिया या मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. पहिल्या दिवशी भारतीय संघाने २ बाद ३१२ धावा केल्या आहेत. यादरम्यान यशस्वी जैस्वाल आणि साई सुदर्शन यांनी १८० अधिक धावांची भागीदारी रचली. तर सुदर्शन ८७ धावांवर बाद होत माघारी परतल्याने त्याचं शतक हुकलं. गिल आणि जैस्वालनेही अर्धशतकी भागीदारी रचली. याशिवाय आता यशस्वी १७३ धावा तर गिल २० धावा करत खेळत आहे.

यशस्वी जैस्वालचं दीडशतक, भारताच्या ३०० धावा पूर्ण

यशस्वी जैस्वालने उत्कृष्ट फलंदाजी करत आपला डाव पुढे नेला आहे. यासह जैस्वालने १५० धावा पूर्ण केल्या आहेत. तर भारतीय संघाने पहिल्याच दिवशी ३०० धावांचा पल्ला गाठला आहे. तर गिल आणि यशस्वीने अर्धशतकी भागीदारीही पूर्ण केली आहे.

साई सुदर्शन बाद

साई सुदर्शन जोमेल वेरिकनच्या षटकात पायचीत होत बाद झाला. यासह ८७ धावांवर बाद झाल्याने साईचं पहिलं कसोटी शतक १३ धावांनी हुकलं. यासह साई-जैस्वालची उत्कृष्ट भागादीरीदेखील तुटली. यासह आतापर्यंत भारताने २ बाद २५१ धावा केल्या आहेत.

भारताने दुसऱ्या सत्रात किती धावा केल्या?

यशस्वी जैस्वालचं शतक आणि साई सुदर्शनच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने दुसऱ्या सत्रात १२६ धावा कुटल्या आहेत. यासह भारताने आतापर्यंत १ विकेट गमावत २२० धावा केल्या आहेत. यामध्ये यशस्वी जैस्वाल १११ धावा तर साई सुदर्शन ७१ धावा करत आहे. यासह जैस्वाल-साईने आतापर्यंत १६२ धावांची भागीदारी केली आहे.

यशस्वी जैस्वालचं शतक

यशस्वी जैस्वालने दिल्लीच्या मैदानावर शानदार शतक झळकावलं आहे. या शतकासह त्याने अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. तर साई सुदर्शन आणि जैस्वाल यांनी दीडशतकी भागीदारी केली आहे.

साई सुदर्शनचं अर्धशतक

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या साई सुदर्शनची बॅट अखेरीस तळपली आहे. साईने दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात ८८ चेंडूत ७ चौकारांसह अर्धशतक केलं आहे.

जैस्वाल-साईची शतकी भागीदारी

यशस्वी जैस्वाल आणि साई सुदर्शन यांनी दुसऱ्या विकेटसाठी १४१ चेंडूत शतकी खेळी केली आहे. साई सुदर्शन आणि यशस्वी जैस्वाल यांनी दुसऱ्या सत्रात चौकारांचा पाऊस पाडत वेगाने धावा केल्या.

यशस्वी जैस्वालचं अर्धशतक

दुसरं सत्र सुरू होताच जैस्वालने एका षटकात ३ चौकार लगावत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. जैस्वालने १० चौकारांसह आपलं अर्धशतक पूर्ण केलं. तर साई सुदर्शनसह त्याने अर्धशतकी भागीदारीदेखील रचली आहे.

पहिल्या सत्रात भारताने किती धावा केल्या

दिल्ली कसोटीच्या पहिल्या दिवसाचा लंचब्रेक झाला असून भारताने पहिल्या सत्रात १ बाद ९४ धावा केल्या आहेत. दरम्यान वेस्ट इंडिज संघाने गोलंदाजी केली. जोमेल वेरिकनच्या गोलंदाजीवर राहुल स्टंपिंग होत बाद झाला. तर आता यशस्वी जैस्वालने ४० धावा आणि साई सुदर्शन १६ धावा करत खेळत आहे.

केएल राहुल बाद

भारतीय संघाला १८व्या षटकात पहिला धक्का बसला. जोमेल वेरिकनच्या कमालीच्या फिरकीवर राहुल स्टंपिंग होत बाद झाला, वेरिकनने टाकलेला चेंडू खेळपट्टीवर पडताच कमालीचा फिरला आणि यष्टीरक्षकाच्या हातात गेला. दरम्यान फटका खेळण्यासाठी पुढे आलेला राहुल चेंडू खेळायला चुकला अन् विकेटकिपरने त्याला स्टंपिंग करत माघारी धाडलं. राहुल ५४ चेंडूत ५ चौकार व एका षटकारासह ३८ धावा करत बाद झाला.

१० षटकांत भारताने किती धावा केल्या?

भारतासमोर वेस्ट इंडिजने दुसऱ्या डावात चांगली गोलंदाजी करत भारताला झटपट धावा करण्याची संधी दिली नाही. यासह टीम इंडियाने एकही विकेट न गमावता २९ धावा केल्या आहेत.

वेस्ट इंडिजची प्लेईंग इलेव्हन

जॉन कॅम्पबेल, तेजनारायण चंदरपॉल, अ‍ॅलिक अथानाझे, शे होप, रोस्टन चेस (कर्णधार), टेविन इमलाच (यष्टीरक्षक), जस्टिन ग्रीव्हज, जोमेल वॉरिकन, खॅरी पियरे, अँडरसन फिलिप, जेडेन सील्स

वेस्ट इंडिजविरूद्ध दुसऱ्या कसोटीसाठी भारताची प्लेईंग इलेव्हन

यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

नाणेफेक

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याची नाणेफेक भारतीय संघाने जिंकली असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर विडिंजचा संघ गोलंदाजीने सुरूवात करणार आहे. शुबमन गिलने सहावेळा नाणेफेक गमावल्यानंतर अखेरीस सातव्या प्रयत्नात पहिली नाणेफेक जिंकली आहे.

भारत वि. वेस्ट इंडिज पहिल्या कसोटीत काय घडलं?

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या अहमदाबाद कसोटी सामना अडीज दिवसात संपला. भारताने पहिल्या कसोटीत १४० धावांनी आणि एका डावाने विजय मिळवलाय. भारताकडून दुसऱ्या डावात रवींद्र जडेजाने ४ विकेट्स, सिराजने ३ विकेट्स, कुलदीपने २ विकेट्स आणि सुंदरने एक विकेट मिळवली. वेस्ट इंडिजचा संघ भारताच्या गोलंदाजीविरूद्ध फलंदाजी करण्यात अपयशी ठरला आणि भारताने एकतर्फी विजय मिळवला. यासह भारताने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. वेस्ट इंडिजचा संघ पहिल्या डावात १६५ धावांवर सर्वबाद झाला, तर भारताने पहिल्या डावात ४४८ धावांचा डोंगर उभारला. तर दुसऱ्या डावात विडिंजचा संघ फक्त १४६ धावा करत सर्वबाद झाला.