Ashes vs India-West Indies Test Series: एकीकडे, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेली अ‍ॅशेस मालिका २०२३च्या कसोटी सामन्यांना प्रेक्षकांची गर्दी आहे, तर दुसरीकडे वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यातील कसोटी मालिकेतील सामन्यात प्रेक्षक कमी दिसून येत आहेत. हे दृश्य कसोटी वेस्ट इंडीजच्या कसोटी क्रिकेटसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी, विराट कोहली चांगल्या लयीत खेळत होता तरीही चाहते कंटाळलेले दिसत होते. त्यातील काही तर चक्क स्टेडियममध्ये झोप काढत होते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पत्रकार विमल कुमार यांनी एक व्हिडीओ ट्वीटरवर अपलोड केला ज्यामध्ये त्यांनी दोन्ही चित्रे दाखवली आणि एक कॅप्शन लिहिली आहे. ज्यामध्ये म्हटले आहे की, “कसोटी क्रिकेटची सद्यस्थिती फार वाईट आहे. या दोन्ही चित्रांमधून वर्तमान स्थिती काय हे स्पष्ट झालं आहे.” वेस्ट इंडीजचे बहुतेक खेळाडू हे आता क्रिकेट व्यतिरिक्त दुसरे खेळ खेळतात. तसेच, जे मुख्य खेळाडू आहेत ते वर्षभर वेगवेगळ्या क्रिकेट लीग खेळत असतात. त्यामुळे टी२०च्या झटपट क्रिकेटमुळे आणि वेस्ट क्रिकेटची उदासीनता या दोन्ही गोष्टींमुळे ही परिस्थिती आज कसोटी क्रिकेटवर आली आहे.

Rajat Patidar's 4 Consecutive Sixes Video Viral
६,६,६,६…पाटीदारने मयंकच्या षटकात धावांचा पाऊस पाडत रचला इतिहास, आरसीबीसाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू
crow playing tic tac toe viral video
मालक अन् कावळ्यात रंगला फुल्ली-गोळ्याचा खेळ! पाहा कोण जिंकलं…. Video होतोय व्हायरल
Suresh Raina Helps Limping ms dhoni Viral Video
IPL 2024: चालताना त्रास होणाऱ्या धोनीला सुरेश रैन्नाने दिला आधार, व्हीडिओ होतोय तुफान व्हायरल
Andre Russell Closed His Ears as fans cheer when ms dhoni came to bat
IPL 2024: धोनीची एंट्री होताच जल्लोष टिपेला; आंद्रे रसेलने ठेवले कानावर हात- व्हीडिओ व्हायरल

हेही वाचा: Rishabh Pant: वेटलिफ्टिंग करताना दिसला ऋषभ पंत, टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी घेत आहे मेहनत, पाहा Video

कसोटी क्रिकेटचे भविष्य काय आहे?

गेल्या काही वर्षांत, आयसीसीने कसोटी क्रिकेटचा घसरत चाललेला दर्जा उंचावण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत, ज्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसारख्या विजेतेपदांचा समावेश आहे. परंतु काही निवडक संघ वगळता उर्वरित संघांच्या कसोटी खेळण्याच्या पातळीत घसरण झाली आहे. त्यामुळे चाहते स्टेडियममध्ये सामने पाहण्यासाठी येत नाही आहेत. त्यांना आता त्यात अजिबात रस राहिलेला नाही. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात सुरु असलेली कसोटी मालिका आहे. त्यात विराट कोहली फलंदाजी करत असताना चक्क चाहते स्टेडियममध्ये झोपा काढत आहेत. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा: IND vs WI: अर्धशतक करताच रोहित शर्माने रचला इतिहास! गावसकरांचा मोडला ‘हा’ विक्रम, यशस्वीचीही शानदार खेळी

विराटचा ५००वा आंतरराष्ट्रीय सामना

जर दुसऱ्या कसोटी सामन्याबद्दल बोलायचे झाले तर भारताने वेस्ट इंडिजवर वर्चस्व गाजवले आणि अवघ्या ४ विकेट्स गमावून २८८ धावा केल्या. यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्मा यांनी शानदार सुरुवात करून दिली. दोघांनी आपापली अर्धशतके झळकावली. दुसरीकडे विराट कोहलीने त्याच्या ५००व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात नाबाद ८७ धावा करून तो खेळत आहे. भारत दुसऱ्या दिवशी मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करेल आणि वेस्ट इंडिजला विकेट्सची गरज असल्याने ते भारताला बाद कारणाचा प्रयत्न करतील.

विराट कोहलीने आपल्या ५००व्या सामन्यात अर्धशतक झळकावले. ५००व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात अर्धशतक ठोकणारा विराट कोहली पहिला फलंदाज ठरला आहे. आत्तापर्यंत ९ क्रिकेटपटूंनी ५०० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, परंतु आतापर्यंत या ऐतिहासिक क्षणी कोणीही अर्धशतक झळकावले नव्हते. विराट कोहलीने केवळ अर्धशतक झळकावून हा विक्रम आपल्या नावावर केला नाही तर आता त्याला शतक झळकावून विश्वविक्रम करण्याची इच्छा आहे.