IND vs WI, Wasim Jaffer: भारतीय संघ जुलैमध्ये वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे, जिथे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी, एकदिवसीय आणि टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळवली जाईल. या दौऱ्याची सुरुवात १२ जुलैपासून डॉमिनिका येथे होणार्‍या कसोटी सामन्याने होणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या या मालिकेत काही युवा खेळाडूंना टीम इंडियामध्ये संधी दिली जाऊ शकते. भारताचा माजी दिग्गज वसीम जाफरनेही संघात युवा खेळाडूंचा समावेश करण्याचा सल्ला दिला आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधील पराभवानंतर टीम इंडियावर अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. यामध्ये चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यासह अनेक खेळाडूंची चौकशी केली जाणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यातील पराभव टीम इंडियासाठी लाजिरवाणा होता. सीनियर खेळाडूंच्या सततच्या फ्लॉपनंतर टीम इंडियाचा माजी क्रिकेटर वसीम जाफरने वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी काही नवीन खेळाडूंची निवड करण्याचा सल्ला निवडकर्त्यांना दिला आहे.

हेही वाचा: ENG vs AUS: वाढदिवशीच मोईन अलीवर ICCने केली कारवाई, नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ठोठावला दंड

रोहित-विराटचा फॉर्म नसल्याने युवा खेळाडूंना संधी द्या- वसीम जाफर

वसीम जाफर म्हणाला की, “टीम इंडियाला आता बेधडक कुठलीही भीती न बाळगता निर्भय क्रिकेट खेळण्याची गरज आहे.” या माजी दिग्गज खेळाडूने यशस्वी जैस्वाल आणि रिंकू सिंग या खेळाडूंना वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियामध्ये संधी देण्याबाबत बोलले आहे. वसीम जफर आपल्या एका मुलाखतीत म्हणाले, “जर रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा फॉर्म नसेल तसेच पुजारही सतत अपयशी होत असेल तर मग संघात युवा खेळाडूंना संधी ही दिलीच पाहिजे. विशेषत: टी२०, वन डे फॉरमॅटमध्ये त्यांना अंतिम अकरामध्ये स्थान देण्याचा विचार संघ व्यवस्थापनाने करायला हवा. तुम्ही अशा लोकांना संधी द्यावी जे आक्रमक कुठलीही भीती न बाळगता बिनधास्त खेळतात. कारण, खेळ बदलत आहे आणि जर भारताला ट्रॉफी जिंकायची असेल तर त्यांना हा दृष्टिकोन स्वीकारावा लागेल.”

यशस्वी जैस्वालला भारतीय संघात संधी द्यावी- वसीम जाफर

व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये जैस्वालला टीम इंडियात संधी द्यावी असे मत जाफरने व्यक्त केले. तो म्हणाले. “टी२०, वन डे फॉरमॅटमध्ये अशा खेळाडूंचा विचार करण्यात यावा. विशेषत: जेव्हा टी२०चा विषय येतो तेव्हा मला वाटते की यशस्वी जैस्वाल तिथे असावा तसेच, रिंकू सिंगनेही चमकदार कामगिरी केली असून त्यालाही किमान संघासोबत जाण्याची संधी मिळावी.

हेही वाचा: Wrestlers Protest: ‘सुनो द्रौपदी शस्त्र उठा लो…’असे काय झाले की विनेश फोगाटने शेअर केली इंस्टाग्राम पोस्ट? जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जितेश शर्माचे नाव यष्टिरक्षक म्हणून घेतले

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत सध्या दुखापतीमुळे संघापासून दूर आहे. अशा परिस्थितीत इतर युवा खेळाडूंना चांगली संधी असेल. वसीम जाफरने पंतऐवजी जितेश शर्माचा संघात यष्टिरक्षक म्हणून समावेश केल्याचे सांगितले. जाफर म्हणाला, “ऋषभ पंत उपस्थित नाही त्यामुळे त्याच्या जागी जितेश शर्मा खेळू शकतो. पाच किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी तो करू शकेल. संजू सॅमसन कदाचित वन डे मध्ये येऊ शकेल. मला वाटतं या नावांवर BCCIने विचार करायला हवा.”