वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या वन-डे सामन्यात भारताने ७ गडी गमावत २७९ धावांपर्यंत मजल मारली. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात शतक झळकावत आपण फॉर्मात असल्याचं दाखवून दिलं. विराटने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा समाचार घेताना १२५ चेंडूत १२० धावा केल्या. त्याच्या या खेळीत १४ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. विंडीजविरुद्धचं कोहलीचं हे आठवं शतक ठरलं.

वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराटने दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमला, एबी डिव्हीलियर्स आणि हर्षल गिब्ज या माजी खेळाडूंना पिछाडीवर टाकलं आहे. या तिन्ही खेळाडूंच्या नावावर विंडीजविरुद्ध ५ शतकांची नोंद आहे.

सलामीवीर शिखर धवन माघारी परतल्यानंतर विराट कोहलीने सर्वात प्रथम रोहित शर्मासोबत ७४ धावांची अर्धशतकी आणि श्रेयस अय्यरसोबत १२५ धावांची शतकी भागीदारी केली. त्याच्या या खेळीमुळे भारताने सामन्यात आश्वासक धावसंख्या गाठली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अवश्य वाचा – Ind vs WI : ही आकडेवारी पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, होय विराट सचिनचा विक्रम मोडणार