Abhishek Sharma Video Calls Yuvraj Singh After 1st Century: भारत विरूद्ध झिम्बाब्वेमध्ये सुरू असलेल्या टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर १०० धावांनी दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात नुकतीच पदार्पणाची संधी मिळालेल्या तरूण अभिषेक शर्माने झंझावाती शतक झळकावले. आयपीएलमध्ये आपल्या स्फोटक खेळीने प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या अभिषेकला पहिल्या टी-२० सामन्यात खातेही उघडता आले नव्हते आणि डकवर बाद झाला. यानंतर दुसऱ्या सामन्यात थेट शतक झळकावत त्याने वादळी खेळी केली. कारकिर्दीतील पहिल्या शतकानंतर अभिषेकने त्याचा गुरू युवराज सिंगला व्हीडिओ कॉल केला. युवराज सिंग आपल्या शिष्याच्या शतकी कामगिरीवर काय म्हणाला पाहा.

हेही वाचा – कुलदीप यादव बॉलिवूड अभिनेत्रीशी लग्न करणार? वर्ल्डकप विजयानंतर स्वतःच केला खुलासा; म्हणाला…

BCCI ने शतकी कामगिरीनंतर अभिषेक शर्माबरोबर विशेष संवाद साधला, ज्याचा व्हीडिओही पोस्ट करण्यात आला आहे. अभिषेक या व्हीडिओमध्ये होलताना म्हणाला की, या सामन्यात तो ज्या बॅटने खेळला ती बॅट त्याचा सलामीचा जोडीदार आणि जवळचा मित्र शुभमन गिलची आणि सामन्यात काही फटके खेळल्यानंतर त्याला माहित होते की आज आपला दिवस आहे आणि त्याने संधीचा फायदा घेतला. भारताने यजमानांवर १०० धावांनी विजय मिळवून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधला. यासह अभिषेकला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

अभिषेक शर्मानेया व्हिडिओमध्ये हेही सांगितले की, शुभमन गिलची बॅट त्याच्यासाठी खूप लकी आहे. जेव्हा जेव्हा तो महत्त्वाच्या सामन्याला जातो किंवा त्याला असे वाटते की त्याच्याकडे दुसरा पर्याय नाही तेव्हा तो शुभमन गिलच्या बॅटने खेळतो. मात्र, गिल त्याला त्याची बॅट सहजासहजी देत ​​नाही. यासाठी त्याला शुबमनला खूप समजवावं लागतं.

हेही वाचा – रोहित-विराटने फायनलमध्ये बॅटिंग करण्यापूर्वीच दिले होते निवृत्तीचे संकेत, भावुक करणारा VIDEO व्हायरल

अभिषेकने या खेळीनंतर सर्वप्रथम त्याच्या कुटुंबीयांना व्हिडिओ कॉल केला. त्याचे आई-वडिल खूप आनंदात होते आणि अभिषेकचे अभिनंदन करताना दिसले. यानंतर त्याने युवराज सिंगला फोन केला. युवराज म्हणाला, ‘या शतकाबद्दल तुझे अभिनंदन, मला तुझा खूप अभिमान आहे. तू या शतकासाठी पात्र होतास. ही फक्त सुरूवात आहे.’ अभिषेकनेही युवराजचे आभार मानले.

View this post on Instagram

A post shared by Team India (@indiancricketteam)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभिषेक व्हीडिओमध्ये म्हणाला, “पहिल्या सामन्यानंतर मी युवी पाजींना (युवराज सिंग) फोन केला होता आणि का माहित नाही, पण ते खूप आनंदी होते, ते म्हणाले ही एक चांगली सुरूवात आहे. त्यांनाही माझ्या कुटुंबाप्रमाणेच आज अभिमान वाटला पाहिजे, असं मला वाटतं होतं. त्यामुळे मी खूप खूश आहे आणि हे सगळं त्यांच्यामुळे (युवराज सिंग) ही आहे. गेल्या २-३ वर्षांपासून त्यांनी माझ्यावर खूप मेहनत घेतली आहे. फक्त क्रिकेटच नाही तर मैदानाबाहेरही. हा माझ्यासाठी एक मोठा क्षण आहे,”