India A Squad Announced for South Africa A Match: ऑस्ट्रेलियाविरूद्ध मालिकेनंतर भारतीय संघ मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरूद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेपूर्वी भारत अ संघ दक्षिण आफ्रिका अ संघाविरूद्ध चार दिवसीय सामने खेळणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. हे सामने बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलेन्समध्ये बंगळुरूत खेळवला जाणार आहे.

दक्षिण आफ्रिका अ संघाविरूद्धच्या मालिकेतील पहिला सामना ३० ऑक्टोबरला होणार आहे. तर दुसरा सामना ६ नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल. दोन्ही सामने सकाळी ९.३० वाजता सुरू होतील. या दोन्ही सामन्यांसाठी भारताच्या अ संघाचे कर्णधारपद ऋषभ पंतकडे असणार आहे. इंग्लंडविरूद्ध मालिकेतील दुखापतीनंतर ऋषभ पंत पुन्हा एकदा मैदानावर पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे.

ऋषभ पंतला भारत अ संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. दोन्ही सामन्यांसाठी संघ वेगवेगळा आहे. पहिला सामना सुरू असताना भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असणार आहे. तर दुसऱ्या सामन्यासाठी केएल राहुल, ध्रुव जुरेल, मोहम्मद सिराज, प्रसिध हे खेळाडू संघाचा भाग असतील. तर पहिल्या सामन्यात सलामीवीर म्हणून आयुष म्हात्रेला संधी देण्यात आली आहे. तर साई सुदर्शन उपकर्णधार असेल.

पहिल्या चारदिवसीय सामन्यासाठी भारत अ संघ:

ऋषभ पंत (कर्णधार/यष्टीरक्षक), आयुष म्हात्रे, एन जगदीसन (यष्टीरक्षक), साई सुदर्शन (उपकर्णधार), देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार, हर्ष दुबे, तनुष कोटियन, मानव सुथार, अंशुल कंबोज, यश ठाकूर, सारांश जैन

दुसऱ्या चार दिवसीय सामन्यासाठी भारत अ संघ:

ऋषभ पंत (कर्णधार/यष्टीरक्षक), केएल राहुल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), साई सुदर्शन (उपकर्णधार), देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, हर्ष दुबे, तनुष कोटियन, मानव सुथार, खलील अहमद, गुरनूर ब्रार, अभिमन्यू ईश्वरन, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, आकाशदीप

भारत अ वि. दक्षिण आफ्रिका अ संघाची चार दिवसीय कसोटी मालिका

भारत अ वि. दक्षिण आफ्रिका अ – ३० ऑक्टोबर २०२५ – ९.३० वाजता

भारत अ वि. दक्षिण आफ्रिका अ – ६ नोव्हेंबर २०२५ – ९.३० वाजता