Sai Sudharsan Test Debut in Tendulkar Anderson Trophy: बहुप्रतिक्षित भारत वि. इंग्लंड कसोटी मालिकेला सुरूवात आज म्हणजेच २० जूनपासून सुरूवात आहे. या नव्या कसोटी मालिकेसह भारतीय क्रिकेट मधील नव्या अध्यायाला सुरूवात होणार आहे. भारताचा नवा कसोटी कर्णधार शुबमन गिलच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ आजपासून नव्या मोहिमेला सुरूवात करत आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना लीड्स येथे खेळवला जात आहे.

पहिल्या कसोटी सामन्याची नाणेफेक झाली असून इंग्लिश संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडने एक दिवस आधीच लीड्स कसोटीसाठी आपली प्लेईंग इलेव्हन जाहीर केली आहे. तर नाणेफेकीनंतर भारताचा कर्णधार शुबमन गिलने भारतीय संघाची प्लेईंग इलेव्हन जाहीर केली आहे. भारताकडून साई सुदर्शनने कसोटीमध्ये पदार्पण केलं आहे.

भारत वि. इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका यापुढे अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी म्हणून ओळखली जाणार आहे. पहिल्या कसोटीच्या एक दिवस आधी या अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीचं अनावरण करण्यात आलं. यावेळी इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आणि भारताचा मास्टर ब्लास्टर खेळाडू सचिन तेंडुलकर उपस्थित होते. बीसीसीआय आणि आयसीसीने यावेळचे काही फोटो शेअर केले आहेत. तर मालिका विजेत्या कर्णधारा पतौडी मेडल देण्यात येणार आहे.

इंग्लंडविरूद्ध पहिल्या कसोटीसाठी भारताचा नवा कर्णधार शुबमन गिलने प्लेईंग इलेव्हन जाहीर केली. भारताकडून साई सुदर्शनने कसोटीमध्ये पदार्पण केलं आहे आणि तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसेल. तर करूण नायरचं देखील मोठ्या प्रतिक्षेनंतर भारताच्या कसोटी संघात पदार्पण झालं आहे. याशिवाय भारतीय संघ ३ वेगवान गोलंदाजांसह उतरला आहे. तर शार्दुल ठाकूरला देखील टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये जागा मिळवण्यात यश आलं आहे. तर फिरकी गोलंदाज म्हणून अष्टपैलू रवींद्र जडेजा असेल.

इंग्लंडची पहिल्या कसोटीसाठी प्लेईंग इलेव्हन

झॅक क्राऊली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताची पहिल्या कसोटीसाठी प्लेईंग इलेव्हन

यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), करुण नायर, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा