नवी दिल्ली : मधली फळी भक्कम होण्यासाठी भारताच्या निवड समितीने रविचंद्रन अश्विनला प्राधान्य द्यावे, असा सल्ला ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू इयान चॅपेल यांनी दिला आहे. ‘‘अनुभवी ऑफ-स्पिनर अश्विनकडे विविध खेळपट्ट्यांवर गोलंदाजी करण्याची त्याची क्षमता आहे,’’ असे चॅपेल यांनी म्हटले आहे.

‘‘भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात सलग दुसऱ्यांदा मालिकाविजय मिळवला, त्यानंतर इंग्लंडमध्येही या संघाने यशस्वी कामगिरी केली. त्यामुळे सर्वोत्तम अष्टपैलू संघ भारताला म्हणता येईल. रवींद्र जडेजा, अश्विन, हार्दिक पंड्या आणि ऋषभ पंत यांच्यामुळे भारताची मधली फळी आणखी सशक्त होईल,’’ असे मत चॅपेल यांनी व्यक्त केले.