Ind vs Eng 2nd Test: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना बर्मिंघममध्ये सुरू आहे. या सामन्यात इंग्लंडने भारतीय संघाला नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं आहे. पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने धावांचा डोंगर उभारला आहे. भारतीय संघाकडून कर्णधार शुभमन गिलने सर्वाधिक १६९ धावांची खेळी केली. भारताचा पहिला डाव ५८७ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडने दुसऱ्या दिवसाअखेर ३ गडी बाद ७७ धावांपर्यंत मजल मारली आहे. दरम्यान तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा संघ आघाडी कमी करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
शुबमन गिलचं दमदार द्विशतक
या सामन्यातही शुबमन गिलची बॅट चांगलीच तळपली. गिलने पहिल्या दिवशी फलंदाजी करताना आपलं शतक पूर्ण केलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याने दमदार द्विशतकी खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याने भारतीय कर्णधार म्हणून सर्वात मोठी खेळी करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने पहिल्या डावात ५८७ धावांपर्यंत मजल मारली आहे.
इंग्लंडचे ३ फलंदाज तंबूत
या मोठ्या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडला सुरुवातीलाच २ मोठे धक्के बसले आहेत. आपला पहिला सामना खेळत असलेल्या आकाश दीपने इंग्लंडला लागोपाठ २ मोठे धक्के दिले. बेन डकेट आणि ओली पोपला खातंही उघडता आलं नाही. तर जॅक क्रॉली १९ धावांवर माघारी परतला. इंग्लंडला पहिल्या दिवशी ३ गडी बाद ७७ धावा करता आल्या आहेत.
सिराजच्या लागोपाठ २ विकेट्स
मोहम्मद सिराजने २२ व्या षटकात कमाल गोलंदाजी केली आहे. त्याने या षटकात इंग्लंडचे २ प्रमुख फलंदाज जो रूट आणि बेन स्टोक्सला बाद करत माघारी धाडलं आहे. जो रूट २२ तर बेन स्टोक्स पहिल्याच चेंडूवर भोपळाही न फोडता माघारी परतला आहे.
इंग्लंडच्या २०० धावा पूर्ण
भारतीय संघाने दिलेल्या ५८७ धावांचं आव्हान पूर्ण करताना भारतीय संघाला हवी तशी सुरूवात करता आली नव्हती. इंग्लंडचे ५ प्रमुख फलंदाज स्वस्तात माघारी परतले. पण, जेमी स्मिथ आणि हॅरी ब्रुक यांनी मिळून इंग्लंडची धावसंख्या २०० पार पोहोचवली आहे.
इंग्लंडचा पलटवार
इंग्लंडकडून हॅरी ब्रुक आणि जेमी स्मिथ यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. या डावात फलंदाजी करताना जेमी स्मिथने ८० चेंडूंचा सामना करत आपलं शतक पूर्ण केलं आहे. यासह इंग्लंडकडून तिसरं सर्वात वेगवान शतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे.
इंग्लंडच्या ३५० धावा पूर्ण
भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला सुरूवातीला ५ मोठे धक्के दिले. पण, हॅरी ब्रुक आणि जेमी स्मिथ यांनी इंग्लंडची धावसंख्या ३५० धावांच्या पोहोचवली आहे. दुसऱ्या सत्राअखेर जेमी स्मिथ १५७ धावांवर नाबाद माघारी परतला आहे. तर हॅरी ब्रुक १४० धावांवर नाबाद आहे. इंग्लंडने ३५५ धावा केल्या आहेत. इंग्लंडचा संघ २३२ धावांनी पिछाडीवर आहे.
इंग्लंडचा डाव ४०७ धावांवर आटोपला
या डावात फलंदाजी करताना इंग्लंडला सुरुवातीलाच मोठे धक्के बसले होते. जॅक क्रॉली १९ धावांवर माघारी परतला. त्यानंतर बेन डकेट, बेन स्टोक्स आणि ओली पोप शून्यावर माघारी परतले. जो रूटने या डावात २२ धावांची खेळी केली. तर जेमी स्मिथने नाबाद १८४ धावांची खेळी केली. हॅरी ब्रुक १५८ धावांवर माघारी परतला. इंग्लंडचा डाव ४०७ धावांवर आटोपला. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना मोहम्मद सिराजने सर्वाधिक ६ गडी बाद केले. तर आकाश दीपने ४ गडी बाद केले.
भारतीय संघाकडे २४४ धावांची आघाडी
या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाने १८० धावांची आघाडी घेतली. इंग्लंडचा पहिला डाव ४०७ धावांवर आटोपला. दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला केएल राहुल आणि यशस्वी जैस्वालने चांगली सुरूवात करून दिली. दोघांनी मिळून ५१ धावांची भागीदारी केली. यशस्वी जैस्वाल २८ धावांवर माघारी परतला. तर केएल राहुल २८ धावांवर आणि करूण नायर ७ धावांवर नाबाद परतले आहेत. भारतीय संघाने दुसऱ्या डावात १ गडी बाद ६४ धावा केल्या आहेत. यासह भारतीय संघाने दुसऱ्या डावात २४४ धावांची आघाडी घेतली आहे.