India vs England 5th Test Highlights: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना केनिंग्स्टन ओव्हलच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार ऑली पोपने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाने पहिल्या दिवशी फलंदाजी करताना ६ गडी बाद २०४ धावा केल्या आहेत.
पहिल्या दिवशी फलंदाजी करताना भारतीय संघाला सुरूवातीलाच मोठे धक्के बसले. संघातील सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल स्वस्तात माघारी परतले. यशस्वी जैस्वाल २ तर केएल राहुल अवघ्या १४ धावांवर माघारी परतला. तर साई सुदर्शनला चांगली सुरूवात मिळाली होती. पण तो ३८ धावांवर माघारी परतला. तर कर्णधार शुबमन गिल २१ धावा करत माघारी परतला. रवींद्र जडेजा ९ आणि ध्रुव जुरेल १९ धावांवर माघारी परतला.
दुसऱ्या दिवशी काय घडलं?
या सामन्यातील दुसऱ्या दिवशी भारतीय संघ फलंदाजीला आला. पण सुरुवातीच्या अर्ध्या तासात भारताचे ४ फलंदाज तंबूत परतले. त्यामुळे भारतीय संघाचा डाव २२४ धावांवर आटोपला. त्यानंतर इंग्लंडचा संघ पहिल्या डावात फलंदाजीसाठी आला. इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या २४७ धावांवर आटोपला. या डावात इंग्लंडने २३ धावांची आघाडी घेतली. दरम्यान भारतीय संघाकडून दुसऱ्या डावात फलंदाजी करताना यशस्वी जैस्वाल ५१ धावांवर नाबाद आहे. तर केएल राहुल ७ आणि साई सुदर्शन ११ धावा करत माघारी परतला आहे. भारतीय संघाने दुसऱ्या डावात २ गडी बाद ७५ धावा करत ५२ धावांची आघाडी घेतली आहे.
इंग्लंडकडून फलंदाजी करताना हॅरी ब्रुक शेवटपर्यंत उभा राहिला. त्याने अर्धशतकी खेळी केली. पण मोहम्मद सिराजने त्याला बाद करत माघारी धाडलं आहे. इंग्लंडचा डाव २४७ धावांवर आटोपला. यासह इंग्लंडने पहिल्या डावात २३ धावांची आघाडी घेतली. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना प्रसिध कृष्णा आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी ४-४ गडी बाद केले. तर आकाशदीपने एक गडी बाद केला.
इंग्लंडचे ७ फलंदाज तंबूत
या सामन्यातील पहिल्या डावात डावाची सुरूवात करताना इंग्लंडने दमदार सुरूवात केली. पण त्यानंतर प्रसिध कृष्णा आणि मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या फलंदाजांना चांगलाच दणका दिला आहे. इंग्लंडकडून फलंदाजी करताना जॅक क्रॉलीने ६४, बेन डकेटने ४३, ओली पोपने २२, जो रूटने २९, जेकब बेथलने ६ आणि जेमी स्मिथने अवघ्या ८ धावांची खेळी केली. त्यानंतर ओव्हरटन देखील शून्यावर बाद होऊन माघारी परतला.
भारतीय संघाचा डाव आटोपला
पहिल्या दिवशी फलंदाजी करताना भारतीय फलंदाजांनी ६ गडी बाद २०४ धावा केल्या होत्या. त्यामुळे भारतीय संघाकडे दुसऱ्या दिवशी मोठी धावसंख्या उभारण्याची संधी होती. पण एटकिन्सन इंग्लंडकडून चमकला. त्याने भारताच्या ५ फलंदाजांना तंबूत धाडलं. आधी करूण नायर बाद होऊन माघारी परतला. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर , मोहम्मद सिराज आणि प्रसिद कृष्णा देखील बाद होऊन माघारी परतले. भारतीय संंघाचा डाव २९ मिनिटांत आटोपला. भारतीय संघाला अवघ्या २२४ धावा करता आल्या.
भारतीय संघाला लागोपाठ २ धक्के! करूण नायरनंतर वॉशिंग्टन सुंदरही बाद
भारतीय संघाला दुसऱ्या दिवशी हवी तशी सुरूवात करता आलेली नाही. पहिल्या दिवशी अर्धशतक झळकावून नाबाद माघारी परतलेला करूण नायर दुसऱ्या दिवसाच्या सुरूवातीलाच बाद होऊन माघारी परतला. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरही बाद होऊन माघारी परतला.
करूण नायरचं अर्धशतक
या सामन्यासाठी केएल राहुलचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. या संधीचं सोनं करत त्याने दमदार अर्धशतक झळकावलं. ज्या खेळपट्टीवर इतर फलंदाज संघर्ष करत होते, त्याच खेळपट्टीवर करूण नायरने अर्धशतक पूर्ण केलं. तो ५२ धावांवर नाबाद परतला. तर वॉशिंग्टन सुंदर १९ धावांवर नाबाद परतला.