scorecardresearch

IND vs NZ 2nd T20: लखनऊमध्ये टॉस ठरणार बॉस? प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचे राहिले आहे वर्चस्व

IND vs NZ 2nd T20I Updates: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना आज लखनऊ येथे खेळवला जाईल. या सामन्यात नाणेफेक महत्त्वाची भूमिका बजावेल.

IND vs NZ 2nd T20I Updates
भारत विरुद्ध न्यूझीलंड (फोटो- बीसीसीआय ट्विटर)

भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना आज (२९ जानेवारी) संध्याकाळी ७ वाजता खेळवला जाईल. लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होणार आहे. या मैदानावर नाणेफेक महत्त्वाची भूमिका बजावेल. कारण नाणेफेक जिंकणाऱ्या संघाचा सामना जिंकणेही जवळपास निश्चित मानले जात आहे.

वास्तविक, या मैदानावर आतापर्यंत झालेल्या सर्व टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानेच विजय मिळवला आहे. या मैदानावर आतापर्यंत ५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. नोव्हेंबर २०१८ मध्ये येथे पहिल्यांदा सामना खेळला गेला. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील या सामन्यात टीम इंडियाने ७१ धावांनी विजय मिळवला. यानंतर गेल्या चार वर्षात वेस्ट इंडिजने अफगाणिस्तानचा ३० धावांनी, त्यानंतर अफगाणिस्तानने वेस्ट इंडिजचा ४१ आणि २९ धावांनी पराभव केला होता. भारताने श्रीलंकेचा ६२ धावांनी पराभव केला.

हे सर्व विजय काहीसे एकतर्फी झाले आहेत. म्हणजेच प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला या विकेटवर अधिक मदत मिळते हे स्पष्ट आहे. जसजसा सामना पुढे सरकतो, तसतशी इथली विकेट मंदावते आणि फलंदाजीला त्रास होतो. अशा स्थितीत आजच्या सामन्यातही नाणेफेक जिंकणाऱ्या कर्णधाराला येथे प्रथम फलंदाजी करायला आवडेल. मात्र, रात्री दुसऱ्या डावात दवं गोलंदाजांना अडचणीत आणू शकतात.

हेही वाचा – IND vs NZ: पराभवानंतर वॉशिंग्टनचे ‘अति सुंदर’ उत्तर; म्हणाला ‘तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये आवडती बिर्याणी मिळाली नाही तर तुम्ही…’

भारतासाठी करो या मरोचा सामना –

तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा २१ धावांनी पराभव केला. अशा प्रकारे या तीन सामन्याच्या मालिकेत न्यूझीलंड १-० ने आघाडीवर आहे. आजचा सामनाही भारताने हरला तर मालिका किवी संघाच्या नावावर होईल. अशा स्थितीत भारतीय संघाला हा ‘करो या मरो’ सामना जिंकणे गरजेचा असणार आहे.

भारतीय संघ: शुबमन गिल, इशान किशन (यष्टीरक्षक), राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम मावी, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, पृथ्वी शॉ, युझवेंद्र चहल, जितेश शर्मा , मुकेश कुमार.

हेही वाचा – SA vs ENG: चालू सामन्यात पंचांचा बेजबाबदारपणा; प्रेक्षकांकडे पाहताना केले असे काही की VIDEO होतोय व्हायरल

न्यूझीलंड संघ: फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (यष्टीरक्षक), मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कर्णधार), ईश सोधी, जेकब डफी, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर, हेन्री शिपले, मायकेल रिप्पन, डेन क्लीव्हर, बेन लिस्टर.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-01-2023 at 12:32 IST
ताज्या बातम्या