न्यूझीलंडचा संघ लवकरच भारत दौऱयावर येणार असून, ऑक्टोबर महिन्यात सुरू होणाऱया एकदिवसीय मालिकेत नवी दिल्लीतील फिरोजशहा कोटला स्टेडियमवर रंगणाऱया तिसऱया सामन्याच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय ‘बीसीसीआय’ने घेतला आहे. ‘करवा चौथ’ सणामुळे वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. नियोजित वेळापत्रकानुसार भारत आणि न्यूझीलंड दरम्यान १९ ऑक्टोबर रोजी दिल्लीच्या फिरोजशहा कोटला येथे एकदिवसीय सामना खेळविला जाणार होता. मात्र, याच दिवशी येथे ‘करवा चौथ’ सण आल्याने सामना एका दिवसाने पुढे ढकलण्यात आला आहे. उत्तर भारतात ‘करवा चौथ’ सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यामुळे १९ ऑक्टोबर रोजी होणारा तिसरा एकदिवसीय सामना आता २० ऑक्टोबर रोजी खेळविण्यात येईल.
दिल्ली क्रिकेट बोर्डाचे उपाध्यक्ष केसी खन्ना यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘करवा चौथ’ सणामुळे १९ ऑक्टोबरला होणारा सामना एका दिवसाने पुढे ढकलण्यात यावा अशी मागणी दिल्ली क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयकडे केली होती. ती मंजूर करण्यात आल्याची माहिती खन्ना यांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 8th Sep 2016 रोजी प्रकाशित
‘करवा चौथ’मुळे न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात ‘बीसीसीआय’कडून बदल
'करवा चौथ' सण आल्याने सामना एका दिवसाने पुढे ढकलण्यात आला आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 08-09-2016 at 20:52 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs new zealand bcci shifts kotla odi by a day due to karva chauth