India vs South Africa 1st T20 Match Highlights Scorecard, 28 September 2022: सुर्यकुमार आणि केएल राहुलच्या शानदार फलंदाजीने भारतीय संघाने आठ गडी राखत दक्षिण आफ्रिका संघावर पहिल्या टी२० सामन्यात विजय मिळवला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर १०७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. एका क्षणी ४२ धावांत सहा विकेट्स गमावलेल्या आफ्रिकन संघाला केशव महाराजांने १०० धावांच्या पुढे नेली. दक्षिण आफ्रिकेने २० षटकांत आठ गडी गमावून १०६ धावा केल्या.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील भारत दौऱ्यातील मालिकेला तिरुअनंतपुरम येथे सुरु असून भारतीय संघाने आज दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना नामोहरम केले. पॉवरप्ले मध्ये अर्शदीपचा दबदबा पाहायला मिळाला. चाहर आणि अर्शदीप या दोघांनी मिळून दक्षिण आफ्रिकन फलंदाजीचे कंबरडं मोडले. त्या दोघांनी मिळून ५ गडी बाद करत निम्मा संघ तंबूत धाडला. भारतीय संघ आजच्या सामन्यात गोलंदाजीच्या जोरावर मजबूत स्थितीत पाहायला मिळतो आहे. निम्या षटकानंतर दक्षिण आफ्रिका संकटात सापडली होती पण केशव महाराजने एक बाजू लढवत ठेवत त्याने ३५ चेंडूत ४१ धावा केल्या. आफ्रिकेची फलंदाजी ही सुमार दर्जाची झाली असून पत्त्याच्या बंगल्यासारखी त्याचे गडी बाद झाले. तत्पूर्वी, भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या सामन्यापूर्वी दोन्ही संघ समान समस्येचा सामना करत होते आता मात्र भारत वरचढ ठरताना दिसतो.

Sanju Samson should be groomed as next T20 captain for India after Rohit says Harbhajan Singh
Team India : रोहितनंतर भारताचा टी-२० कर्णधार कोण होणार? हार्दिक-पंतकडे दुर्लक्ष करत हरभजनने सांगितले ‘हे’ नाव
Sandeep Sharma may replace Shami
RR vs MI : टीम इंडियाच्या तिसऱ्या वेगवान गोलंदाजाचा शोध संपला! ‘हा’ गोलंदाज घेऊ शकतो मोहम्मद शमीची जागा
IND vs BAN T20I 2024 Starts On 28th April Women Team India Take Revenge of Harmanpreet Kaur
IND vs BAN Women’s T20I ‘या’ दिवशी होणार सुरु; २०२३ मधील ‘त्या’ वादाचा बदला घेणार का हरमनप्रीतची सेना?
IPL 2024 Lucknow Mumbai Indians vs Rajasthan Royal Match Updates in Marathi
IPL 2024 MI vs RR: रियान परागचं आईने केलं कौतुक; लेकाला पुन्हा घातली ऑरेंज कॅप, पाहा VIDEO
Live Updates

India vs South Africa Highlights Match Updates: भारत वि. दक्षिण आफ्रिका पहिली टी२० हायलाइट्स अपडेट्स तुम्ही पाहू शकता एकाच क्लिकवर

22:15 (IST) 28 Sep 2022
INDvsSA: सुर्यकुमार आणि राहुलच्या अर्धशतकी खेळीने भारत विजयी

सुर्यकुमार आणि राहुलच्या अर्धशतकी खेळीने भारत विजयी. भारतीय संघाने आठ गडी राखत दक्षिण आफ्रिका संघावर पहिल्या टी२० सामन्यात विजय मिळवला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

22:02 (IST) 28 Sep 2022
INDvsSA: भारत विजयाच्या उंबरठ्यावर

राहुल आणि सुर्यकुमारच्या भागीदारीने भारत विजयाच्या उंबरठ्यावर असून ३६ चेंडूत २७ धावांची गरज आहे.

भारत ८०-२

21:55 (IST) 28 Sep 2022
INDvsSA: सुर्यकुमारची फटकेबाजी

सुर्यकुमार यादव आणि राहुल यांच्या दरम्यान ५० धावांची भागीदारी झाली असून ती त्यांनी ३६ चेंडूत केली.

भारत ६७-२

21:46 (IST) 28 Sep 2022
INDvsSA: धावगती वाढवणे गरजेचे

राहुल आणि सुर्यकुमार यादव या दोघांनी मिळून धावगती वाढवणे गरजेचे आहे. चेंडू आणि धावा या जवळपास सारख्या झाल्या आहेत. राहुलचा झेल नॉर्खियाने त्याच्याच गोलंदाजीवर सोडला

भारत ४७-२

21:24 (IST) 28 Sep 2022
INDvsSA: भारताला मोठा धक्का कोहली बाद

एनरिक नॉर्खिया याने विराट कोहलीला षटकाच्या पहिल्याच चेंडूवर बाद केले. कोहलीने ९ चेंडूत ३ धावा केल्या.

भारत १७-२

21:21 (IST) 28 Sep 2022
INDvsSA: पहिल्या पॉवर प्ले सावध सुरुवात

पहिल्या पॉवर प्ले भारताची सावध सुरुवात झाली आहे. हातात विकेट्स असणे अधिक महत्वाचे आहे. आतापर्यंत भारताची पॉवर प्ले मध्ये २१ हा सर्वात कमी धावसंख्या होती.

पण तो आकडा आता १७ असा झाला आहे.

भारत १७-१

21:18 (IST) 28 Sep 2022
INDvsSA: खेळपट्टी गोलंदाजीला साथ देणारी

भारतीय फलंदाज ज्या पद्धतीने फलंदाजी करत आहेत त्यानुसार खेळपट्टी गोलंदाजीला साथ देणारी आहे. केएल राहुल विरोधात रिव्हू घेतला. आफ्रिकेचे गोलंदाज सहजासहजी धावा करू देत नाहीत.

भारत १६-१

21:07 (IST) 28 Sep 2022
INDvsSA: विराट कोहली आणि कगिसो रबाडा यांची जुगलबंदी

विराट कोहली आणि कगिसो रबाडा यांची जुगलबंदी या दोन दिग्गजांची खेळी बघण्यासाठी प्रेक्षक नेहमीच उत्सुक असतात.

भारत ११-१

21:05 (IST) 28 Sep 2022
INDvsSA: भारताला मोठा धक्का

कर्णधार रोहित शर्मा शून्य धावांवर बाद झाला. त्याला कगिसो रबाडाने बाद करत आफ्रिका संघाला सामन्यात आणण्यात मदत केली.

भारत ९-१

20:55 (IST) 28 Sep 2022
INDvsSA: पहिले षटक निर्धाव

भारतीय फलंदाजांनी खेळपट्टीचा अंदाज घेत पहिले षटक निर्धाव खेळले. खेळपट्टी ही गोलंदाजीला साथ देणारी आहे असे यावरून दिसते.

भारत ०-०

20:39 (IST) 28 Sep 2022
INDvsSA: भारताला विजयासाठी १०७ धावांचे माफक आव्हान

उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला १२० च्या आत रोखले. २० षटकात दक्षिण आफ्रिका १०६-८

20:35 (IST) 28 Sep 2022
INDvsSA: महाराज झाला बाद

हर्षल पटेलने शेवटच्या षटकात केशव महाराजला बाद केले. त्याने ३५ चेंडूत ४१ धावा केल्या.

दक्षिण आफ्रिका १०१-८

20:31 (IST) 28 Sep 2022
INDvsSA: केशव महाराजची एकाकी झुंज

केशव महाराजची एकाकी झुंजीने दक्षिण आफ्रिका १०० धावांवर पोहचली. त्याने ३४ चेंडूत ४१ धावा केल्या.

दक्षिण आफ्रिका १००-७

20:26 (IST) 28 Sep 2022
INDvsSA: आफ्रिका १२० चा आकडा गाठू शकेल का?

आफ्रिका १०० चा गाठू शकेल का? असा प्रश्न त्यांच्या फलंदाजी वरून पडतो असे आकाश चोप्रा समालोचन करताना म्हणाला. एकाही षटकात आफ्रिका दुहेरी धावसंख्या आतापर्यंत काढता आली नाही. शेवटचे दोन षटक त्यांच्यासाठी महत्वाचे आहे.

दक्षिण आफ्रिका ८३-७

20:19 (IST) 28 Sep 2022
INDvsSA: अक्षर पटेलने वेन पारनेलला केले बाद

फॉर्म मध्ये असलेल्या अक्षर पटेलने वेन पारनेलला केले बाद. त्याने ३७ चेंडूत २४ धावा केल्या. दक्षिण आफ्रिका आणखी संकटात.

दक्षिण आफ्रिका ६८-७

https://twitter.com/BCCI/status/1575134978198880262?s=20&t=1aUUwEr3ROMZOA7IOUj7yg

20:14 (IST) 28 Sep 2022
INDvsSA: अश्विनने आफ्रिकन संघाभोवती फास आवळला

अश्विनने आफ्रिकन संघाला धावा करू दिल्या नाहीत. चार षटकात केवळ आठ धावा दिल्या. आफ्रिकेच्या फलंदाजांना अजिबात हात उघडू दिले नाहीत.

दक्षिण आफ्रिका ६३-६

20:04 (IST) 28 Sep 2022
INDvsSA: आफ्रिकेने पूर्ण केल्या ५० धावा

आफ्रिकेने ११.१ षटकात पूर्ण केल्या ५० धावा. भारतीय संघाची मजबूत पकड

दक्षिण आफ्रिका ५०-६

19:55 (IST) 28 Sep 2022
INDvsSA: निम्या षटकानंतर दक्षिण आफ्रिका संकटात

निम्या षटकानंतर दक्षिण आफ्रिका संकटात सापडली आहे. त्यांची फलंदाजी ही सुमार दर्जाची झाली. पत्त्याच्या बंगल्यासारखी त्याचे गडी बाद झाले. पहिल्या दहा षटकानंतर

दक्षिण आफ्रिका ४८-६

19:47 (IST) 28 Sep 2022
INDvsSA: दक्षिण आफ्रिकेला सहावा धक्का एडन मार्करम बाद

दक्षिण आफ्रिकेला सहावा धक्का बसला. एडन मार्करम डाव सावरत असतानाच झाला बाद. त्याने २४ चेंडूत २५ धावा केल्या.

दक्षिण आफ्रिका ४२-६

19:36 (IST) 28 Sep 2022
INDvsSA: पॉवरप्ले मध्ये अर्शदीपचा दबदबा

पॉवरप्ले मध्ये अर्शदीपचा दबदबा पाहायला मिळाला. चाहर आणि अर्शदीप या दोघांनी मिळून दक्षिण आफ्रिकेचे कंबरडं मोडले. निम्मा संघ गारद झाला. भारतीय संघ मजबूत स्थितीत.

दक्षिण आफ्रिका ३०-५

19:27 (IST) 28 Sep 2022
INDvsSA: दक्षिण आफ्रिकेला धावा काढणे अशक्य

दक्षिण आफ्रिकेला धावा काढणे अशक्य!, अजूनही जेट लॅग मध्ये असल्यासारखे खेळत आहेत. रवी शास्त्रींचा टोमणा

दक्षिण आफ्रिका १८-५

19:19 (IST) 28 Sep 2022
INDvsSA: दक्षिण आफ्रिकेचा अर्धा संघ तंबूत

दक्षिण आफ्रिकेचा अर्धा संघ तंबूत परतला आहे. ट्रिस्टन स्टब्सला देखील खाते उघडण्यात अपयश आले. या सामन्यात भारताची पकड मजबूत

दक्षिण आफ्रिका ९-५

19:17 (IST) 28 Sep 2022
INDvsSA: अर्शदीप सिंगने आफ्रिकेला दिले जबरदस्त धक्के

अर्शदीप सिंगने आफ्रिकेला दिले जबरदस्त धक्के दिले. दक्षिण आफ्रिका संकटात सापडली आहे. किलर मिलर म्हणजेच डेविड मिलरला खाते ही न उघडता परत पाठवले.

दक्षिण आफ्रिका ८-४

19:15 (IST) 28 Sep 2022
INDvsSA: दक्षिण आफ्रिका संकटात तिसरी विकेट

एकाच षटकात अर्शदीप सिंगने दोन गडी बाद केले. रुसो शून्यावर बाद झाला.

दक्षिण आफ्रिका ८-३

19:10 (IST) 28 Sep 2022
INDvsSA: क्विंटन डी कॉक बाद

दक्षिण आफ्रिकेला दुसरा धक्का बसला. सलामीवीर क्विंटन डी कॉक अवघी एक धाव काढून बाद झाला. अर्शदीप सिंगने त्याला त्रिफळाचीत केले.

दक्षिण आफ्रिका १-२

19:07 (IST) 28 Sep 2022
INDvsSA: कर्णधार टेंबा बावुमा बाद

भारताने दीपक चाहरला बुमराह ऐवजी सामन्यात घेतले असून त्याने सामन्यातील पहिल्या षटकात टेंबा बावुमाला बाद केले. तो शून्यावर त्रिफळाचीत झाला.बुमराहला दुखापतीमुळे आजचा सामना खेळू शकणार नाही. ही भारतासाठी चिंतेची बाब आहे. दक्षिण आफ्रिका १-१

18:47 (IST) 28 Sep 2022
INDvsSA: पिच रिपोर्ट

आकाश चोप्राने पिच रिपोर्ट मध्ये सांगितले की, या मैदानावर फिरकीपटूंना सामन्याच्या उत्तरार्धात मदत मिळणार नाही. आज दव पडण्याचे प्रमाण खूप असणार आहे. साधारणपणे १८० ते १९० एवढ्या धावा होऊ शकतात.

18:41 (IST) 28 Sep 2022
INDvsSA: बुमराह, चहल बाहेर

रोहित शर्माने बुमराह आणि चहलला अंतिम अकरामध्ये स्थान न देता आश्चर्यचकीत केले. तर त्या दोघांऐवजी आश्विन आणि दीपक चाहरला संघात स्थान देण्यात आले.

https://twitter.com/BCCI/status/1575109843504930816?s=20&t=AzMhan4mmA_f4awEfyj9gg

18:32 (IST) 28 Sep 2022
INDvsSA: भारताने नाणेफेक जिंकली

भारताने नाणेफेक जिंकली. रोहित शर्माने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

18:14 (IST) 28 Sep 2022
IND vs SA 1st T20: थोड्याच वेळात पीच रिपोर्ट

मालिकेतील पहिला सामना तिरुवनंतपुरममधील ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियममध्ये खेळवला जातआहे. थोड्याच वेळात पीच रिपोर्ट आणि नाणेफेक होईल.

India vs South Africa Highlights Match Updates: भारत वि. दक्षिण आफ्रिका पहिली टी२० हायलाइट्स अपडेट्स तुम्ही पाहू शकता एकाच क्लिकवर

भारतीय संघाने आठ गडी राखत दक्षिण आफ्रिका संघावर पहिल्या टी२० सामन्यात विजय मिळवला आहे.