India vs South Africa 2nd Test score : भारत आणि दक्षिण अफ्रिकेमध्ये सोमवारी (३ जानेवारी) जोहान्सबर्गमध्ये ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना सुरू आहे. सामन्याच्या पहिल्याच दिवशी ११ विकेट पडल्या. भारत सर्वबाद केवळ २०२ धावा करू शकला. दुसरीकडे मैदानात उतरलेल्या दक्षिण अफ्रिकेलाही १ झटका बसला. पहिल्या दिवसाच्या शेवटापर्यंत अफ्रिकेने ३५ धावा केल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिवस अखेर दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार डीन एलगर ११ आणि कीगन पीटरसन १४ धावांवर नाबाद खेळत होते. एडेन मार्कराम केवळ ७ धावा करून बाद झाला. त्याला मोहम्मद शमीने माघारी पाठवले. तो एलबीडब्ल्यू झाला.

प्रथम फलंदाजी करायला आलेल्या भारतीय संघाकडून कर्णधार के. एल. राहुलने सर्वाधिक ५० धावा केल्या. दुसरीकडे रवीचंद्रन अश्विनने ४६ धावांची खेळी केली. दक्षिण अफ्रिकेच्या मार्को यानसनने ४, डुआने ओलीविअर आणि कगिसो रबाडाने प्रत्येकी ३ विकेट घेतल्या.

दरम्यान, दक्षिण अफ्रिकेविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ विराट कोहलीशिवाय मैदानात उतरला. कोहलीच्या मान आणि पाठीच्या दुखण्यामुळे तो दुसऱ्या कसोटीत खेळला नाही. त्यामुळे भारतीय संघ के. एल. राहुलच्या नेतृत्वात खेळला. या सामन्यात कर्णधार के. एल. राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

भारतीय कसोटी संघ

के. एल. राहुल (कर्णधार), मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, रवीचंद्रन अश्वीन, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह (उप कर्णधार), मोहम्मद सिराज

भारताचे ऐतिहासिक कसोटी मालिका विजयाचे लक्ष्य

दरम्यान, सरत्या वर्षांला धडाकेबाज कसोटी विजयासह निरोप दिल्यानंतर नव्या वर्षांत ऐतिहासिक शिखर सर करण्यासाठी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सज्ज झाला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सोमवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात यश संपादन करून आफ्रिकन भूमीत प्रथमच कसोटी मालिका विजय साकारण्याची ऐतिहासिक संधी भारताला साद घालत आहे.

हेही वाचा : १९८३ च्या विश्वचषक विजयात सर्वात मोठा टर्निंग पॉईंट कोणता होता? कपिल देव म्हणाले, “जेव्हा भारतीय संघात…”

सेंच्युरिअन येथे झालेल्या ‘बॉिक्सग डे’ कसोटीत भारताने पावसामुळे एक दिवस वाया जाऊनही ११३ धावांनी दणदणीत विजय मिळवून तीन लढतींच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. १९९२ पासून भारतीय संघ आफ्रिका दौऱ्यावर जात आहे; परंतु त्यांना एकदाही तेथे कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. त्यामुळे भारतीय संघ कमकुवत आफ्रिकेविरुद्ध ही संधी नक्की यशस्वी करण्याचा प्रयत्न करेल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs south africa 2nd test day 1 score latest updates 3 january 2022 pbs
First published on: 03-01-2022 at 22:12 IST