India vs West Indies 2nd Test, Day 4 Live: भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाने ५१८ धावांवर डाव घोषित केला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेला वेस्ट इंडिजचा पहिला डाव अवघ्या २४८ धावांवर आटोपला. त्यामुळे भारतीय संघाने वेस्ट इंडिजला फॉलोऑन दिला आहे. तिसऱ्या दिवसाच्या समाप्तीनंतर वेस्ट इंडिजने २ गडी बाद १७३ धावा केल्या. वेस्ट इंडिजचा संघ ९७ धावांनी पिछाडीवर आहे. दरम्यान चौथ्या दिवशी वेस्ट इंडिजचे फलंदाज आघाडी भरून काढून भारतीय संघासमोर विजयासाठी मोठं आव्हान ठेवण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
वेस्ट इंडिजचे ८ फलंदाज तंबूत! भारतीय संघ मजबूत स्थितीत
या डावात चांगली सुरूवात मिळालेल्या वेस्ट इंडिजला एका पाठोपाठ एक ८ मोठे धक्के बसले आहेत. वेस्ट इंडिजडे अवघ्या ३७ धावांची आघाडी आहे.
वेस्ट इंडिजचा निम्मा संघ तंबूत! भारतीय गोलंदाजांचं दमदार पुनरागमन
वेस्ट इंडिजने चौथ्या दिवसातील पहिल्या सत्रात दमदार सुरूवात केली. पण दुसऱ्या सत्रात वेस्ट इंडिजला एका पाठोपाठ एक मोठे धक्के बसले आहे. कुलदीप यादवने इमलॅचला बाद करत माघारी धाडलं आहे.
वेस्ट इंडिजचे ‘होप’कायम! दमदार शतकासह टीम इंडियावर घेतली आघाडी
या सामन्यात भारतीय संघ आघाडीवर होता. पण आधी कॅम्पबेलने दमदार शतक झळकावलं. आता २०४ चेंडूंचा सामना करत होपने शतक झळकावलं आहे. यासह २७१ धावा करून भारतीय संघावर आघाडी घेतली आहे.
वेस्ट इंडिजला मोठा धक्का शतकवीर कॅम्पबेल परतला माघारी
वेस्ट इंडिजला तिसरा मोठा धक्का बसला आहे. शतक झळकावणारा कॅम्पबेल ११५ धावांवर बाद होऊन माघारी परतला आहे. त्याला जडेजाने पायचित करत माघारी धाडलं आहे.
कॅम्पबेलचं षटकारासह दमदार शतक!
वेस्टइंडिजचा फलंदाज कॅम्पबेलने षटकार मारून आपलं शतक पूर्ण केलं आहे. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पहिलं शतक ठरलं आहे.