पीटीआय, राजकोट

सलामीवीर यशस्वी जैस्वालचे (२३६ चेंडूंत नाबाद २१४ धावा) द्विशतक आणि रवींद्र जडेजाच्या (४१ धावांत ५ बळी) प्रभावी माऱ्याच्या बळावर भारताने इंग्लंडला तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात रविवारी चौथ्या दिवशी ४३४ धावांनी नमवत कसोटीमधील आपला सर्वात मोठा विजय नोंदवला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. इंग्लंडच्या ‘बॅझबॉल’ रणनीती भारतासमोर चालली नाही. ५५७ धावांच्या कठीण लक्ष्याचा पाठलाग करताना संघाला ३९.४ षटकांत १२२ धावाच करता आल्या. कुलदीप यादवने दोन तर, जसप्रीत बुमरा व रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: आशुतोष शर्माची आयपीएलमध्ये ऐतिहासिक कामगिरी, १७ वर्षांच्या इतिहासात ही कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
Rr Vs Gt Ipl 2024 Sanju Samson 50th Match As Captain
RR vs GT : संजू सॅमसनने ५०व्या सामन्यात केला खास पराक्रम, ‘या’ बाबतीत रोहित शर्मासह तीन कर्णधारांना टाकले मागे
Abhishek Sharma Breaks Chris Gayle and Sunil Narine's Record in SRH vs CSK Match
SRH vs CSK : अभिषेकने वादळी खेळीच्या जोरावर मोडला गेल-नरेनचा विक्रम, IPL मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
Rishabh becomes first player to play 100th match for Delhi
IPL 2024 : ऋषभ पंतने झळकावले अनोखे ‘शतक’, दिल्ली कॅपिटल्ससाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला खेळाडू

भारताने यापूर्वी, न्यूझीलंविरुद्ध २०२१मध्ये ३७२ धावांनी विजय मिळवला होता. इंग्लंडविरुद्ध कोणत्याही संघाचा हा दुसरा सर्वात मोठा विजय आहे. विशाखापट्टणमच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातज २०९ धावा करणाऱ्या जैस्वालने नाबाद २१४ धावांची खेळी केल्याने भारताने आपला डाव ४ बाद ४३० धावांवर घोषित केला. भारताने आपल्या पहिल्या डावात ४४५ धावा केल्या होत्या व त्यानंतर इंग्लंडला पहिल्या डावात ३१९ धावांवर रोखले. जैस्वालने आपल्या खेळीत १४ चौकार व १२ षटकार लगावले. जैस्वाल आणि पदार्पणवीर सर्फराज खानने (७२ चेंडूंत नाबाद ६८ धावा) पाचव्या गडय़ासाठी १७२ धावांची अभेद्य भागीदारी रचली. आपला पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या सर्फराजने सलग दुसरे अर्धशतक झळकावले. त्यामुळे शुभमन गिलने ९१ धावांची खेळी केली.

हेही वाचा >>>IND vs ENG 3rd Test : इंग्लंडविरुद्धच्या ऐतिहासिक विजयानंतर भारताची डब्ल्यूटीसीच्या गुणतालिकेत मोठी झेप

इंग्लंडच्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्या डावातील शतकवीर बेन डकेटच्या (४) रूपात संघाला पहिला धक्का बसला. बुमराने चहापानाच्या विश्रांतीपूर्वी झ्ॉक क्रॉलीला (११) बाद करीत संघाला अडचणीत आणले. यानंतर जडेजा ने ओली पोपला (३) माघारी धाडले व पुढच्याच षटकात जॉनी बेअरस्टोला (४) बाद केले. त्यामुळे इंग्लंडची अवस्था ४ बाद २८ अशी बिकट झाली. इंग्लंड ५० धावांवर असताना जो रूट (७) व कर्णधार बेन स्टोक्स (१५) बाद झाल्याने इंग्लंडच्या अडचणी वाढल्या. कुलदीपने रेहान अहमदला (०) बाद करीत संघाची अवस्था ७ बाद ५० अशी बिकट केली. बेन फोक्स (१६) व टॉम हार्टली (१६) यांनी पुढील ११ षटके गडी बाद होऊ दिला नाही. यानंतर फॉक्सला जडेजा व हार्टलीला अश्विनने माघारी धाडले. मार्क वूडने (३३) आपल्या खेळीत सहा चौकार व एक षटकार लगावला. जडेजाने वूडला यशस्वी करवी झेलबाद करीत इंग्लंडचा डाव संपुष्टात आणला.

त्यापूर्वी, जैस्वालने इंग्लंडच्या गोलंदाजांना धारेवर धरले. जैस्वालने ४१ वर्षीय वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनच्या एकाच षटकात तीन षटकार लगावले. जैस्वाल व सर्फराज यांनी आक्रमक फलंदाजी करताना दुसऱ्या सत्रातील १६ षटकांत ११६ धावा जोडल्या. सर्फराजने आपल्या खेळीत सहा चौकार व तीन षटकार झळकावले. भारताने चौथ्या दिवशी २ बाद १९६ धावसंख्येच्या पुढे खेळण्या सुरुवात केली. गिल व कुलदीप यादव (२७) यांनी एक तास इंग्लंडला यश मिळू दिले नाही व चौथ्या गडय़ासाठी ५५ धावांची भागीदारी केली. गिलला धावचीत झाल्याने ही भागीदारी मोडीत निघाली.

हेही वाचा >>>IND vs ENG 3rd Test : भारत ‘यशस्वी’, बॅझबॉल तंत्रासह दणदणीत विजय

अश्विन चौथ्या दिवशी चहापानानंतर मैदानात

भारताचा तारांकित ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विनने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या चौथ्या दिवशी चहापानानंतर मैदानात उतरला. अश्विन सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ५०० गडी बाद केल्यानंतर काही काळ आपली आई आजारी असल्याने तिसरा कसोटी सामना मध्येच सोडून गेला होता. रविवारी दुपारी राजकोटला दाखल झाल्यानंतर अश्विन चहापानाच्या विश्रांतीदरम्यान सराव करताना दिसला. त्यापूर्वी, अश्विन संघासोबत येईल हे ‘बीसीसीआय’ने पहिल्या सत्रातच सांगितले होते.

४३४ धावांच्या रूपाने भारताचा आजवरचा कसोटीतील सर्वात मोठा विजय आहे.

१२ यशस्वी जैस्वालने या सामन्यात १२ षटकार लगावले व वसीम अक्रमच्या (१२) विक्रमाची बरोबरी केली.

१पहिले तीन कसोटी शतक झळकावताना जैस्वालने १५०हून अधिक धावा केल्या. तसे करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला.

३ सलग सामन्यांत द्विशतक झळकावणारा जैस्वाल हा तिसरा भारतीय फलंदाज ठरला. यापूर्वी, विनोदकांबळी व विराट कोहली यांनी अशी कामगिरी केली आहे.

२२  जैस्वालने कसोटी मालिकेत सर्वाधिक २२ षटकार मारण्याचा विक्रम आपल्या नावे केला. अजूनही दोन सामने शिल्लक आहेत.

४ पुरुषांच्या कसोटीत पदार्पणातच दोन्ही डावांत अर्धशतक झळकावणारा सर्फराज खान हा चौथा भारतीय फलंदाज ठरला.

७ सामनावीर जडेजाने तब्बल सात वेळा जो रूटला बाद केले.

१ कसोटीमध्ये २५० डावखुऱ्या फलंदाजांना बाद करणारा अश्विन हा पहिला गोलंदाज ठरला.

संक्षिप्त धावफलक :

’भारत (पहिला डाव) : ४४५ ’इंग्लंड (पहिला डाव) : ३१९

’भारत (दुसरा डाव) : ९८ षटकांत ४ बाद ४३० घोषित (यशस्वी जैस्वाल नाबाद २१४, शुभमन गिल ९१, सर्फराज खान नाबाद ६८; टॉम हार्टली १/७८)

’इंग्लंड (दुसरा डाव) : ३९.४ षटकांत सर्वबाद १२२ (मार्क वूड ३३, बेन फोक्स १६, टॉम हार्टली १६; रवींद्र जडेजा ५/४१, कुलदीप यादव २/१९)

सामनावीर : रवींद्र जडेजा