Indian team topped the WTC points table 2023-25: डॉमिनिका येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवला. भारताने एक डाव आणि १४१ धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दुसरीकडे, जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताचे १२ गुण झाले आहेत. यामुळे तो गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा संघ या स्थानावर होता.

भारतीय संघ असा अव्वल स्थानावर पोहोचला –

खरेतर, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या आवृत्तीत आतापर्यंत एकूण चार संघ आहेत ज्यांनी किमान एक सामना खेळला आहे. भारताशिवाय या यादीत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि वेस्ट इंडिजचा समावेश आहे. यामध्ये या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर होता. ज्याने इंग्लंडविरुद्ध पहिले दोन कसोटी सामने जिंकले होते, मात्र शेवटच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. या प्रकरणात, गुणांच्या बाबतीत, ऑस्ट्रेलियाचे २२ गुण आहेत आणि भारताचे केवळ १२ गुण आहेत. पण एकही सामना न गमावल्यामुळे भारताच्या गुणांची टक्केवारी १०० आहे.

ऑस्ट्रेलियाला हेडिंग्ले कसोटीतील पराभवाचा फटका बसला आहे. तीन सामन्यांनंतर त्यांच्या गुणांची टक्केवारी ६१.११ आहे. त्याच वेळी, इंग्लंड या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याची विजयानंतर गुणांची टक्केवारी २७.७८ आहे. स्लो ओव्हर रेटमुळे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडने अॅशेसमध्ये प्रत्येकी दोन गुण गमावले, ज्यामुळे त्यांच्या गुणांच्या टक्केवारीवरही परिणाम झाला.

हेही वाचा – IND vs WI 1st Test: वेस्ट इंडिजविरुद्ध रविचंद्रन आश्विनची कमाल, शेन वार्नचा विक्रम मोडत केला मोठा पराक्रम

जागतिक कसोटी चॅम्पियनशिप २०२२३-२५ पॉइंट टेबल –

१.भारत – १०० गुण टक्केवारी
२.ऑस्ट्रेलिया – ६१.११. गुण टक्केवारी
३.इंग्लंड – २७.७८ गुण टक्केवारी
४.वेस्ट इंडिज – ० गुण टक्केवारी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताने असा जिंकला सामना –

सामन्याबद्दल बोलायचे तर, पहिल्या डावात रविचंद्रन अश्विनच्या घातक गोलंदाजीसमोर (५/६०) वेस्ट इंडिजचा संघ अवघ्या १५० धावांत आटोपला. प्रत्युत्तरात जैस्वालच्या (१७१) शतकी खेळीमुळे भारतीय संघाने पहिला ५ बाद डावात धावसंख्येवर घोषित केला. पहिल्या डावाच्या आधारे पिछाडीवर पडलेल्या कॅरेबियन संघाचा दुसऱ्या डावात १३० धावाच करता आल्या. त्यामुळे सामन्यात त्यांचा दारुण पराभव झाला. रविचंद्रन अश्विनने दुसऱ्या डावात 7 विकेट घेतल्या.