आयपीएलच्या बाराव्या हंगामाने आता प्रेक्षकांच्या मनावर आपली पकड घ्यायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यात, रविचंद्रन आश्विनने बटलरला ‘मंकड’ पद्धतीने धावबाद करत नवीन वादाला तोंडही फोडलं. पहिल्याच सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने राजस्थानवर मात केली. या सामन्यात पंजाबच्या लोकेश राहुल स्टिव्ह स्मिथचा झेल पकडत सर्वांची वाहवा मिळवली. हा झेल पकडल्यानंतर राहुलने शाहरुख खानसारखं सेलिब्रेशनही केलं.

अवश्य वाचा – IPL 2019 : आश्विनच्या ‘त्या’ रनआऊटबद्दल राहुल द्रविड म्हणाला…

याबद्दल विचारलं असताना राहुल म्हणाला, “कसलं सेलिब्रेशन?? मला त्यावेळी काय करावं हे सूचत नव्हतं. माझ्या मित्रांनी यावरुन माझी खिल्लीही उडवली. काही जणांनी तर मला, स्वतःला शाहरुख समजतोस का असंही विचारलं??” लोकेश राहुल India Today वाहिनीशी बोलत होता.

पहिल्या सामन्यात पंजाबने आश्वासक कामगिरी करत राजस्थानवर मात केली आहे. गेल्या हंगामात चांगली सुरुवात करुनही पंजाबचा संघ बाद फेरीत प्रवेश करु शकला नव्हता. त्यामुळे यंदा या स्पर्धेत पंजाबचा संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अवश्य वाचा – Video : चेन्नईच्या ड्रेसिंग रुममध्ये रंगलं केदार जाधवचं बर्थ-डे सेलिब्रेशन