IPL २०१९ मध्ये मुंबईचा संघ अंतिम सामन्यात पोहोचला आहे. चेन्नईच्या संघाविरुद्ध झालेल्या क्वालिफायर १ सामन्यात मुंबईने चेन्नईला ६ गडी राखून सहज पराभूत केले. १३२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या सूर्यकुमार यादवने नाबाद अर्धशतकी खेळी केली. या विजयासह मुंबईने पाचव्यांदा स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. आज होणाऱ्या क्वालिफायर २ सामन्यातील दिल्ली आणि चेन्नई यांच्यातील विजेत्या संघाविरुद्ध मुंबईचा संघ खेळणार आहे.

मुंबईचा संघ अंतिम सामन्यासाठी हैदराबादला पोहोचला असून तेथे चाहत्यांनी त्यांचे स्वागत केले. हैदराबादच्या मैदानावर मुंबई इंडियन्सने अनेक सामने खेळले आहेत. पण अंतिम सामन्यात खेळणे हे नेहमीच इतर सामन्यांसाठी कठीण आणि आव्हानात्मक असते. त्यामुळे मुंबईचा संघ कसून सराव करत आहे.

या दरम्यान, मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने तिरुपती येथे दर्शनासाठी गेला होता. यावेळी त्याच्यासोबत त्याची पत्नी रितिका आणि मुलगी समायरा देखील होती. रोहितची पत्नी रितिका हिने समायराला जन्म दिल्यापासून रोहितने फारसा वेळ आपल्या कुटुंबासोबत घालवायला मिळालला नाही. IPL नंतरदेखील रोहित इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी रवाना होणार आहे. त्यामुळे रोहित जसा जमेल तसा आपल्या कुटुंबाला वेळ देत असल्याचे वेळोवेळी दिसून आले. त्याने बरेचसे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावरही पोस्ट केले. त्यातच रोहितने अगदी ताजा तिरुपती येथील फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत त्याच्यासोबत रितिका व समायरा दिसत असून त्याने लोकेशन तिरुपती असेही लिहिले आहे.

 

View this post on Instagram

 

#OneFamily ready for one final chapter down south 0. #Believe #CricketMeriJaan #MumbaiIndians @rohitsharma45 @ritssajdeh

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

A post shared by Mumbai Indians (@mumbaiindians) on

१२ मे रोजी IPL चा अंतिम सामना होणार आहे. या सामन्यासाठी दिल्ली आणि चेन्नई या संघात शुक्रवारी लढत रंगणार असून या सामन्यात महेंद्रसिंग धोनी विरुद्ध ऋषभ पंत असं प्रमुख द्वंद्व रंगेल, असा सूर सध्या नेटकऱ्यांमध्ये दिसून येत आहे.