IPL 2019 RR vs KXIP Updates : जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात पंजाबच्या संघाने राजस्थानवर १४ धावांनी विजय मिळवला. १८५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानला केवळ १७० धावांपर्यंत मजल मारता आली. पंजाबकडून गेलने सर्वाधिक ७९ धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थानच्या बटलरचे (६९) प्रयत्न तोकडे पडले.
रहाणे-बटलरने फटकेबाजी करत राजस्थानला धडाकेबाज सुरूवात करून दिली. त्यामुळे ६ व्या षटकात राजस्थानने अर्धशतकी मजल मारली. त्यानंतर कर्णधार रहाणे बाद झाला. त्याने २७ धावा केल्या. बटलर आणि सॅमसनने फटकेबाजी सुरूच ठेवली. पण पंजाबचा कर्णधार रविचंद्रन अश्विन याने अर्धशतकवीर जोस बटलरला अजब पद्धतीने धावबाद (६९) केले. गोलंदाजीत चेंडू टाकण्याआधी त्याने नॉन-स्ट्राईककडील यष्ट्यांच्या वरील बेल्स उडवल्या. त्यावेळी बटलर धाव घेण्यासाठी क्रीजबाहेर निघाला होता. त्यामुळे पंचानी त्याला बाद ठरवले. त्यानंतर राजस्थानच्या डावाला गळती लागली. सॅमसनने ३० तर स्मिथने २० धावा केल्या. उर्वरित फलंदाज एकेरी धावसंख्येवर माघारी परतले. पंजाबकडून सॅम करन, राजपूत, रहमानने २-२ बळी घेतले.
नाणेफेक जिंकून राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पंजाबला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. टीम इंडियाकडून फारसा प्रभावी न ठरलेल्या लोकेश राहुलची IPL ची सुरुवातदेखील वाईट झाली. धवल कुलकर्णीने त्याचा बळी टिपत राजस्थानला पहिले यश मिळवून दिले. राहुलने केवळ ४ धावा केल्या. या दरम्यान पंजाबचा सलामीवीर ख्रिस गेल याने एक नवा इतिहास रचला. त्याने आपल्या डावात ६ धावा करत IPL मध्ये ४ हजार धावांचा टप्पा पार केला. हा टप्पा सर्वात जलद पार करण्याचा मान गेलला मिळाला. पण ख्रिस गेल मैदानात असूनही पंजाबची सुरुवात संथ झाली. पंजाबने ८ षटकात अर्धशतक पूर्ण केले. गेल संयमी खेळ करत असल्याने मयंक अग्रवालने फटकेबाजीची जबाबदारी स्वतःवर घेतली. पण त्याला फार मोठी खेळी करता आली नाही. तो २४ चेंडूत २ षटकार आणि १ चौकार लगावून २२ धावांवर बाद झाला. त्यानंतर २९ चेंडूत ३४ धावांची संयमी खेळी करणाऱ्या गेलने जयदेव उनाडकटला चोपून काढले. सलग ३ चौकार आणि त्यानंतर षटकार अशी फटकेबाजी करत गेलने ३३ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. पण झंझावाती खेळ करणारा ख्रिस गेल ७९ धावांवर बाद झाला. राहुल त्रिपाठी याने सीमारेषेवर त्याचा अप्रतिम झेल टिपला. ४७ चेंडूच्या खेळीत गेलने ८ चौकार आणि ४ षटकार खेचले. बेन स्टोक्सने त्याला माघारी धाडले. पाठोपाठ निकोलस पूरण १२ धावा काढून बाद झाला. पण सर्फराजने २९ चेंडूत धमाकेदार नाबाद ४६ धावांची खेळी केली.
सॅमसन, स्टोक्स बाद; पंजाबचे सामन्यात 'कमबॅक'
स्टीव्ह स्मिथ बाद, राहुलने टिपला अप्रतिम झेल
पंजाबचा कर्णधार रविचंद्रन अश्विन याने अर्धशतकवीर जोस बटलरला अजब पद्धतीने धावबाद केले. गोलंदाजीत चेंडू टाकण्याआधी त्याने नॉन-स्ट्राईककडील यष्ट्यांच्या वरील बेल्स उडवल्या. त्यावेळी बटलर धाव घेण्यासाठी क्रीजबाहेर निघाला होता. त्यामुळे पंचानी त्याला बाद ठरवले.
कर्णधार रहाणे बाद, बटलरचे २९ चेंडूत अर्धशतक
रहाणे-बटलरने फटकेबाजी करत राजस्थानला धडाकेबाज सुरूवात करून दिली. त्यामुळे ६ व्या षटकात राजस्थानने अर्धशतकी मजल मारली.
ख्रिस गेलच्या ७९ धावा आणि सर्फराज अहमदची नाबाद ४६ धावांची खेळी याच्या जोरावर पंजाबने २० षटकात ४ बाद १८४ धावा केल्या आणि राजस्थानपुढे विजयासाठी १८५ धावांचे आव्हान ठेवले.
निकोलस पूरण बाद, पंजाबला चौथा धक्का
१० षटकांचा खेळ झाल्यानंतर झंझावाती खेळ करणारा ख्रिस गेल ७९ धावांवर बाद झाला. राहुल त्रिपाठी याने सीमारेषेवर त्याचा अप्रतिम झेल टिपला. ४७ चेंडूच्या खेळीत गेलने ८ चौकार आणि ४ षटकार खेचले.
२९ चेंडूत ३४ धावांची संयमी खेळी करणाऱ्या गेलने जयदेव उनाडकटला चोपून काढले. सलग ३ चौकार आणि त्यानंतर षटकार अशी फटकेबाजी करत गेलने ३३ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.
गेल संयमी खेळ करत असल्याने मयंक अग्रवालने फटकेबाजीची जबाबदारी स्वतःवर घेतली. पण त्याला फार मोठी खेळी करता आली नाही. तो २४ चेंडूत २ षटकार आणि १ चौकार लगावून २२ धावांवर बाद झाला.
ख्रिस गेल मैदानात असूनही पंजाबची संथ सुरुवात झाली आहे. त्यांनी ८ षटकात अर्धशतक पूर्ण केले असून गेल शांत आणि संयमी खेळी करताना दिसत आहे. तर मयंक अग्रवाल काहीशी फटकेबाजी करताना दिसत आहे.
पंजाबचा सलामीवीर ख्रिस गेल याने एक नवा इतिहास रचला आहे. त्याने आपल्या डावात ६ धावा करत IPL मध्ये ४ हजार धावांचा टप्पा पार केला. हा टप्पा सर्वात जलद पार करण्याचा मान गेलला मिळाला आहे.
सुपरफास्ट गेल! रचला नवा इतिहास
टीम इंडियाकडून फारसा प्रभावी न ठरलेल्या लोकेश राहुलची IPL ची सुरुवातदेखील वाईट झाली. धवल कुलकर्णीने त्याचा बळी टिपत राजस्थानला पहिले यश मिळवून दिले. राहुलने केवळ ४ धावा केल्या.
राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब या २ संघांमध्ये आजचा सामना सुरु आहे. नाणेफेक जिंकून राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.