इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पुढील म्हणजेच २०२२ च्या पर्वाआधी अनेक संघांनी आपल्या महत्वाच्या खेळाडूंनाही करार मुक्त केलं आहे. करार मुक्त केलेल्या खेळाडूंमध्ये अनेक मोठ्या खेळाडूंची नावं आहे. मुक्त करण्यात आलेल्या खेळाडूंना जानेवारीत होणाऱ्या भव्य लिलावप्रक्रियेत संघांना पुन्हा खरेदी करता येऊ शकेल. याच खेळाडूंबद्दल जाणून घेऊयात…

१) के. एल. राहुलला पंजाब किंग्सच्या संघाने रिटेन केलेलं नाही. के. एल. राहुल हा भारतीय संघातील महत्वाचा खेळाडू असून सालामीवीर म्हणून सध्या उत्तम कामगिरी करतोय. के. एल. राहुल आयपीएलमध्ये ९४ सामने खेळाला आहे. तो एक उत्तम यष्टीरक्षकही आहे. राहुलने ९४ सामन्यांमध्ये एकूण तीन हजार २७३ धावा केल्यात. ज्यात दोन शतकं आणि २७ अर्धशतकांचा सामावेश आहे.

नक्की वाचा >> IPL 2022 Retention: धोनीला मोठा आर्थिक फटका, कोहलीच्या पगारातही घट; केन विल्यम्सनला मात्र कोट्यवधींचा फायदा

२) आयपीएलच्या इतिहासामध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानी असणाऱ्या शिखर धवनलाही दिल्ली कॅपिटल्सने करार मुक्त केलंय. धवनने या टी २० स्पर्धेत आतापर्यंत ५ हजार ७८४ धावा केल्यात. सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीनंतर धवनचाच नंबर लागतो. विराटच्या नावावर सहा हजार २८३ धावा आहेत.

३) भारतीय संघांमध्ये नुकतेच पदार्पण करणाऱ्या श्रेयस अय्यरलाही दिल्लीच्या संघाने रिटेन केलेलं नाही. श्रेयसने यापूर्वी दिल्लीच्या संघाचं नेतृत्वही केलं आहे. अय्यरच्या नेतृत्वाखालीच दिल्लीचा संघ पहिल्यादा अंतिम सामन्यामध्ये पोहचला होता. अय्यरने ८७ सामन्यांमध्ये २ हजार ३७५ धावा केल्या असून त्यामध्ये १६ अर्धशतकांचा समावेश आहे.

४) ऑस्ट्रेलियाचा स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरलाही त्यांच्या सनरायझर्स हैदराबाद या संघाने रिटेन केलेलं नाही. वॉर्नरने आयपीएलमध्ये १५० हून अधिक सामने खेळले असून त्याच्या नावावर ५ हजार ४४९ धावा आहेत. वॉर्नरने या स्पर्धेमध्ये आतापर्यंत चार शतकं आणि ५० अर्धशतकं ठोकली आहेत.

नक्की पाहा ही यादी >> अनपेक्षित, अनाकलनीय… दमदार कामगिरीनंतरही संघांनी या खेळाडूंना केलं करारमुक्त

५) अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनलाही दिल्लीच्या संघाने रिटेन केलेलं नाही. अश्विनने २०२१ च्या आयपीएलमधील १३ सामन्यांमध्ये सात गडी बाद केले होते. तो न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघांमध्ये आहे.

६) अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि यष्टीरक्षक इशान किशन यांना मुंबई संघाला मुक्त करावे लागले. हार्दिकने अनेक वर्षे मुंबईसाठी विजयवीराची भूमिका बजावली. मात्र, मागील काही काळात हार्दिकला कामगिरी सातत्य न राखल्याने त्याला संघाबाहेर करण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

७) अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खानला सनरायझर्स हैदराबादने रिटेन केलेलं नाही. आता राशिद खानवर लिलावामध्ये बोली लागणार आहे. राशिद खान हा जगभरामधील वेगवेगळ्या टी-२० लीगमध्ये खेळतो.