आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने गुरुवारी (२४ फेब्रुवारी) झालेल्या बैठकीत टाटा आयपीएल २०२२ हंगामाबाबत अनेक निर्णय घेतले आहेत. यादरम्यान मुंबई आणि पुण्यातील चार मैदानांवर ७० लीग सामने खेळवण्यात येणार आहेत. आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी गुरुवारीच स्पर्धेच्या उद्घाटन आणि अंतिम सामन्याच्या तारखा जाहीर केल्या होत्या. आज आयपीएलने स्पर्धेतील संघांचे स्वरूप आणि गटांची माहिती दिली आहे.

आयपीएलचा १५वा हंगाम बायो-बबलमध्ये खेळवला जाईल. पहिला सामना २६ मार्चला तर अंतिम सामना २९ मे रोजी होणार आहे. मुंबई आणि पुण्यातील चार मैदानांवर एकूण ७० साखळी सामने खेळवले जाणार आहेत. प्लेऑफ सामन्यांचा निर्णय नंतर घेतला जाईल.

विजेतेपदाच्या आधारे संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. १० संघ प्रत्येकी १४ लीग सामने खेळतील. साखळी फेरीत ७० सामने आणि त्यानंतर चार प्लेऑफ सामने होतील. सर्व संघ पाच संघांविरुद्ध प्रत्येकी दोन सामने खेळतील. उर्वरित चार संघांविरुद्ध एक सामना खेळण्याची संधी असेल. यासाठी संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. आयपीएल विजेतेपदाच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे.

आयपीएल संघ आणि गट

गट-अ

  • मुंबई इंडियन्स
  • कोलकाता नाईट रायडर्स
  • राजस्थान रॉयल्स
  • दिल्ली कॅपिटल्स पंजाब किंग्ज</li>
  • लखनऊ सुपरजायंट्स

गट-ब

  • चेन्नई सुपर किंग्ज
  • सनरायझर्स हैदराबाद
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
  • गुजरात टायटन्स

हेही वाचा – IPL 2022 : तारीखही ठरली आणि दुसरी खुशखबरही मिळाली..! ‘या’ तारखेपासून रंगणार आयपीएल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
संघ आणि सामन्यांची रचना

कोणत्या मैदानावर आयपीएलचे किती सामने?

मुंबईवानखेडे स्टेडियम२०
मुंबईडीवाय पाटील स्टेडियम२०
मुंबईब्रेबॉर्न स्टेडियम१५
पुणेमहाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम१५