आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने आगामी हंगामासाठी जुन्या खेळाडूंवर विश्वास ठेवलाय. गेल्या दोन हंगामांमध्ये बंगळुरुच्या संघाला अपेक्षेप्रमाणे चांगली कामगिरी करता आलेली नव्हती. त्यामुळे आगामी हंगामासाठी बंगळुरुचा संघ महत्वाचे बदल करेल अशी आशा होती. मात्र बंगळुरुने आगामी हंगामासाठी सरफराज खानला करारमुक्त केलं आहे.
२०१९ आयपीएलसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने कायम राखलेले खेळाडू –
विराट कोहली (कर्णधार), मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, कुलवंत खेजरोलिया, पार्थिव पटेल, पवन नेगी, उमेश यादव, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, ए.बी. डिव्हीलियर्स, कॉलिन डी-ग्रँडहोम, मोईन अली, नेथन कुल्टर-नाईल, टीम साऊदी
२०१९ आयपीएलसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने करारमुक्त केलेले खेळाडू –
सरफराज खान, अनिकेत चौधरी, अनिरुद्ध जोशी, पवन देशपांडे