आयपीएल २०२३ चा मिनी-लिलाव शुक्रवारी कोची येथे पार पडला. या लिलावात बऱ्याच युवा खेळाडूंनी भाव खाल्ला, तर काही दिग्गज खेळाडूंना भाव मिळाला नाही. अशात आयसीसी टी-२० विश्वचषकात शानदार कामगिरी करणाऱ्या आयर्लंडच्या जोशुआ लिटलला मात्र लॉटरी लागली आहे. गुजरात टायटन्सने या वेगवान गोलंदाजाला आपल्या ताफ्यात सामील करुन घेतले आहे. जोशुआ लिटलला ४.४० कोटी रुपयांची मोठी रक्कम मिळाली आहे.

लिलावापूर्वीच याच खेळाडूंने सीएसके संघातील अनुभव सांगताना चेन्नईवर गंभीर आरोप केले होते. जोशुआ लिटल हा गोलंदाज आयपीएलमध्ये करार मिळवणारा आयर्लंडचा पहिला क्रिकेटर आहे. आता तो २०२३ मध्ये गुजरात टायटन्सकडून खेळताना दिसणार आहे.

IPL 2024 MI vs RCB Predicted Playing 11 Pitch Report details in Marathi
MI vs RCB Match Preview: रोहित शर्मा आणि विराट कोहलीचे संघ आमनेसामने, कशी असणार दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग इलेव्हन
Virender Sehwag Says Yuzvendra Chahal's brilliant bowling
IPL 2024 : वीरेंद्र सेहवागला राजस्थानच्या ‘या’ खेळाडूला विश्वचषक खेळताना पाहायचंय; म्हणाला, “तो टी-२० क्रिकेटचा महान…”
sourav ganguly
पंत तंदुरुस्त, पण सिद्ध करण्यासाठी वेळ हवा – गांगुली
Wakad Police Arrest 10 for IPL Betting Extortion through Betting
पिंपरी : आयपीएल क्रिकेट सामन्यावर बेटिंग; दहा जण अटकेत

लिलावापूर्वी, जोशुआ लिटल या वर्षाच्या सुरुवातीला चेन्नई सुपर किंग्जमध्ये नेट बॉलर म्हणून सामील झाला होता, परंतु दोन आठवड्यांच्या आत त्याने एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जची बाजू सोडली होती. जोशुआने अलीकडेच सीएसकेमधील त्याचा वाईट अनुभव सर्वांसोबत शेअर केला होता. २३ वर्षीय तरुणाने म्हटले होते की, कोणी जखमी झाले तर त्याला खेळण्याची संधी मिळेल, असे सांगितले होते, परंतु तसे झाले नाही. अशा प्रकारे त्याची दिशाभूल करण्यात आली होती.

हेही वाचा – IPL Auction 2023 : इंग्लंडच्या खेळाडूंची चांदी!

आयपीएल २०२३ साठी जोशुआ लिटलने त्याची मूळ किंमत ५० लाख रुपये ठेवली होती. पण लिलावादरम्यान त्याला गुजरात टायटन्सकडून कितीतरी पट जास्त पैसे मिळाले. लिलावात जोशुआला विकत घेण्यासाठी लखनौ सुपरजायंट्स आणि गुजरातमध्ये कडवी स्पर्धा पाहायला मिळाली. जोशुआचा संघात समावेश करण्यासाठी दोन्ही फ्रँचायझी उत्सुक होत्या. पण शेवटी गुजरात टायटन्सने बाजी मारून जोशुआ लिटलला ४.४० कोटींना विकत घेतले.