Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings IPL Final: आयपीएलच्या पहिल्यावहिल्या हंगामापासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ खेळतो आहे. स्पर्धेतल्या लोकप्रिय आणि प्रचंड चाहतावर्ग असलेला संघ अशी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची ओळख आहे. १८ वर्षात दोनशेहून अधिक खेळाडूंनी आरसीबीचं प्रतिनिधित्व केलं आहे. जो बंगळुरूकडून खेळला तो आरसीबी फॅमिलीचा भाग होतो असं संघव्यवस्थापनाचं म्हणणं आहे. आरसीबीचं जेतेपदाचं स्वप्न प्रत्यक्षात साकारल्यास आताच्या संघातील खेळाडूंच्या बरोबरीने आरसीबी फॅमिलीचं जेतेपदाचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं.
विराट कोहली सगळे हंगाम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडूनच खेळतो आहे. विराट आणि आरसीबी हे समानार्थी समीकरण झालं आहे. विराट कोहली वर्षानुवर्ष आरसीबीसाठी धावांची टांकसाळ उघडतो आहे. दोनवेळा त्याला ऑरेंज कॅपने सन्मानितही करण्यात आलं आहे. विराटला भावासारखा असलेला एबी डीव्हिलियर्स आरसीबीच्या ताफ्यात होता. मिस्टर ३६० म्हणून ओळखला जाणारा एबी भारतात प्रचंड लोकप्रिय आहे. आयपीएल स्पर्धेतल्या एबीच्या काही खेळी अद्भुत मानल्या जातात. विराट-एबी भागीदाऱ्या आणि त्यांचा ऋणानुबंध आरसीबीची ओळख आहे. धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलही आरसीबीच्या ताफ्यात होता. अचंबित करणारे फटके आणि मॅरेथॉन खेळी हे गेलच्या खेळाचे वैशिष्ट्य. गेल आणि एबी यांना आरसीबीला जेतेपद मिळवून देता आलं नाही. मात्र विराट कोहलीकडे ही संधी आहे.
पहिल्यावहिल्या हंगामात द वॉल अर्थात राहुल द्रविड आरसीबी संघाचा कर्णधार होता. या संघात दक्षिण आफ्रिकेचा विकेटकीपर आणि फिनिशर मार्क बाऊचर, वेस्ट इंडिजचा आधारवड शिवनारायण चंद्रपॉल, सार्वकालीन महान अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिस हे आरसीबीचा भाग होते. पाकिस्तानचा मिसबाह उल हक आरसीबीकडून खेळला होता. न्यूझीलंडचा आक्रमक फलंदाज रॉस टेलर, दक्षिण आफ्रिकेचा तेजतर्रार गोलंदाज डेल स्टेन, टीम इंडियाचा अनुभवी फिरकीपटू अनिल कुंबळे आरसीबीकडे होते. २००८ मध्येच विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताच्या संघाने U19 वर्ल्डकपचं जेतेपद पटकावलं होतं. विराट कोहली आरसीबीच्या संघातल्या युवा खेळाडूंपैकी एक होता. आयपीएलचा पहिलावहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात झाला होता. कोलकाताकडून खेळणाऱ्या ब्रेंडन मॅक्युलमने या लढतीत नाबाद १५८ धावांची अविश्वसनीय खेळी साकारली होती. ही खेळी क्रिकेटचाहत्यांच्या आजही स्मरणात आहे. या सामन्यात आरसीबीला पराभवाचा सामना करावा लागला होता.
१८ वर्षात आरसीबीने विविध देशातल्या प्रतिभावान खेळाडूंना संधी दिली. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, इंग्लंड, पाकिस्तान, वेस्ट इंडिज, बांग्लादेश, श्रीलंका अशा सर्वच आंतरराष्ट्रीय संघातील खेळाडू आरसीबीसाठी खेळले. सोशल मीडियावर आरसीबीसंदर्भात एक पोस्ट व्हायरल होते. आरसीबीने रिलीज केलेले खेळाडू पुढे जाऊन अन्य संघांसाठी दमदार कामगिरी करतात अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरलही होतात.
मुंबई, महाराष्ट्र आणि विदर्भ या तीन संघांपैकीही अनेक खेळाडू आरबीसीकरता खेळले. यामध्ये वासिम जाफर, केदार जाधव, विजय झोल, झहीर खान, योगेश ताकवले, सर्फराझ खान, शिवम दुबे, जितेश शर्मा यांचा समावेश होतो. मूळच्या अमरावतीच्या जितेशने यंदाच्या हंगामात आरबीसीचं नेतृत्वही केलं. मूळ मुंबईकर मात्र कुटुंबीयांबरोबर केनियात स्थायिक झालेला तन्मय मिश्रा आरसीबी संघाचा भाग होता. केनियासाठी खेळताना दमदार प्रदर्शन केल्यामुळेच तन्मयला आरसीबीने आपल्या ताफ्यात सामील केलं होतं. यंदाच्या हंगामात आरसीबीने झिम्बाब्वेचा युवा वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुझाराबानी याला संघात समाविष्ट केलं आहे.
अनिल कुंबळे, फाफ डू प्लेसिस, डॅनियल व्हेटोरी, शेन वॉटसन, राहुल द्रविड, केव्हिन पीटरसन या आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठ्या खेळाडूंनी आरसीबीचं नेतृत्व केलं आहे. विराट कोहली प्रदीर्घ काळ आरसीबीचा कर्णधार होता. रजत पाटीदारने यंदाच्या हंगामात आरसीबीच्या नेतृत्वाची धुरा हाती घेतली आहे.
आरसीबीचं प्रतिनिधित्व केलेले खेळाडू
राहुल द्रविड, मार्क बाऊचर, शिवनारायण चंद्रपॉल, भरत चिपली, श्रीवत्स गोस्वामी, वासिम जाफर, विराट कोहली, मिसबाह उल हक, रॉस टेलर, कॅमेरुन व्हाईट, सुनील जोशी, जॅक कॅलिस, अॅशले नॉफक, अब्दुल रझ्झाक, अखिल, के.अप्पन्ना, झहीर खान, प्रवीण कुमार, अनिल कुंबळे, डेल स्टेन, विनय कुमार, अय्यप्पा, अरुण कुमार, देवराज पाटील, राजेश बिश्नोई, चिदंबरम गौतम, इशांक जग्गी, मनीष पांडे, रॉबिन उथप्पा, केव्हिन पीटरसन, सौरभ बांदेकर, राजू भटकळ, गौरव धीमन, केदार जाधव, जेसी रायडर, रोलँफ व्हॅन डर मर्व्ह, श्रीनाथ अरविंद, नॅथन ब्रॅकन, भुवनेश्वर कुमार, अभिमन्यू मिथुन, पंकज सिंग, कर्ण शर्मा, रंगराज सुथेश, आयोन मॉर्गन, स्टीव्हन स्मिथ, श्रीधरन श्रीराम, डू प्रीज, मयांक अगरवाल, अरुण कार्तिक, एबी डीव्हिलियर्स, ल्यूक पॉमरबॅश, चेतेश्वर पुजारा, रायली रुसो, सौरभ तिवारी, जोनाथन वॉंडियर, डॅनियल व्हेटोरी, भरत, तिलकरत्ने दिलशान, ख्रिस गेल, निनान, जोहान वॉन डर वॉथ, प्रदीप, काझी, चार्ल लँगवेल्हडट. डॅक नॅन्स, असाद पठाण, सय्यद मोहम्मद, करुण नायर, अँड्यू मॅकडोनाल्ड, मुथय्या मुरलीधरन, हर्षल पटेल, प्रशांत परमेश्वरन, थियागराजन, विजय झोल, शेल्डॉन जॅक्सन, अभिनव मुकुंद, के.एल.राहुल, सनी सोहेल, ख्रिस बार्नवेल, डॅन ख्रिस्तियन, मॉइझेस हेन्रिके, दिनेश कार्तिक, रवी रामपॉल, संदीप वॉरियर, आरपी सिंग, जयदेव उनाडकत, तन्मय मिश्रा, पार्थिव पटेल, युवराज सिंग, निक मॅडिसन, अॅल्बी मॉर्केल, वरुण आरोन, अबू नेचिम, युझवेंद्र चहल, अशोक दिंडा, शदाब जकाती, राणा, मिचेल स्टार्क, योगेश ताकवले, सुब्रमण्यम बद्रीनाथ, शिशिर भावने, मनविंदर बिस्ला, सरफराज खान, शॉन अबॉट, इक्बाल अब्दुल्ला, जलाज सक्सेना, मनदीप सिंग, डॅरेन सॅमी, डेव्हिड व्हीजे, अॅडम मिल्ने, ट्रॅव्हिस हेड, सचिन बेबी, स्टुअर्ट बिन्नी, परवेझ रसूल, शेन वॉटसन, शिवम दुबे, ख्रिस जॉर्डन, अक्षय कर्णेवार, विक्रमजीत मलिक, केन रिचर्डसन, तबरेझ शम्सी, टोकास, सॅम्युअल बद्री, हरप्रीत, विष्णू विनोद, अवेश खान, अनिकेत चौधरी, टायमल मिल्स, पवन नेगी, बिली स्टॅनलेक, क्विंटन डी कॉक, अनिरुद्ध जोशी, ब्रेंडन मॅक्युलम, मनन व्होरा, मोईन अली, कॉलिन डी ग्रँडहोम, पवन देशपांडे, वॉशिंग्टन सुंदर, ख्रिस वोक्स, नॅथन कोल्टिअर नील, मुरुगन अश्विन, कुलवंत खेजरोलिया, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, टीम साऊदी, उमेश यादव, गुरकीरत सिंग मान, शिमोरन हेटमायर, हिंमत सिंग, हेनरिच क्लासन, अक्षदीप नाथ, देवदत्त पड्डीकल, मिलिंद कुमार, मार्कस स्टॉइनस, प्रयास राय बर्मन, आरोन फिंच, जोश फिलीपे, ख्रिस मॉरिस, शाहबाझ अहमद इसूरु उदाना, अॅडम झंपा, श्रीकर भरत, टीम डेव्हिड, मोहम्मद अझरुद्दीन, फिन अॅलन, ख्रिस गार्टन, ग्लेन मॅक्सवेल, सुयश प्रभूदेसाई, स्कॉट कुगलेजिन, डॅनियल सॅम्स, आकाश दीप, कायले जेमिसन, दुश्मंत चमीरा, अनुज रावत, शेरफन रुदरफोर्ड, लुवनिथ सिसोदिया, अनीश्वर गौतम, महिपाल लोमरुर, डेव्हिड विली, जेसन बेहनड्रॉफ, जोश हेझलवूड, सिद्धार्थ कौल, चामा मिलिंद, फाफ डू प्लेसिस, मनोज भडागे, मायकेल ब्रेसवेल, सोनू यादव, विल जॅक्स, अविनाश सिंग, वेन पारनेल, राजन कुमार, हिमांशू शर्मा, विजयकुमार व्यशक, रीस टोपले, सौरव चौहान, टॉम करन, कॅमेरुन ग्रीन, मयांक डागर, लॉकी फर्ग्युसन, अल्झारी जोसेफ, स्वप्नील सिंग, यश दयाळ, स्वस्तिक चिकारा, फिल सॉल्ट, टीम सैफर्ट, जितेश शर्मा, लायम लिव्हिंगस्टोन, मोहित राठी, कृणाल पंड्या, रोमारिओ शेफर्ड, जेकब बेथेल, अभिनंदन सिंग, ब्लेसिंग मुझाराबानी, रसिक सलाम, सुयश शर्मा, नुवान तुषारा, लुंगी एन्गिडी.