Virat Kohli writing a poem in just eight words: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहली केवळ त्याच्या धडाकेबाज फलंदाजीसाठीच ओळखला जात नाही, तर त्याची विनोदबुद्धीही अप्रतिम आहे. फलंदाजीव्यतिरिक्त अनेक प्रसंगी त्याने आपल्या लपलेल्या कौशल्याची ओळख चाहत्यांना करून दिली आहे. पण आता विराटच्या चाहत्यांना हे पहिल्यांदाच कळले आहे की त्याच्या आत एक चांगला कवीही दडलेला आहे.

खरंतर, विराट कोहलीचा एक व्हिडिओ आरसीबीने शेअर केला आहे. आता या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. यामध्ये विराट कोहली एका मुलाखतीत कविता करताना दिसत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे विराटने ही कविता अवघ्या ८ शब्दांत केली आहे.

मिस्टर नॅग्सला दिली होती मुलाखत –

मिस्टर नॅग्स त्यांच्या मजेदार मुलाखतींसाठी ओळखला जातो. आरसीबीने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये विराट मिस्टर नॅग्सला मुलाखत देताना दिसत आहे. यामध्ये तो आरसीबी आणि आयपीएलशी संबंधित अनेक मुद्द्यांवर बोलताना दिसत आहे. यादरम्यान मिस्टर नॅग्स यांनी विराट कोहलीला पोएट्री चॅलेंजही दिले, ज्यामध्ये त्याने विराटला फक्त आठ शब्द दिले आणि कविता लिहिण्यास सांगितले. नॅग्सने विराटला फायर, बॅट, पिकल, टाइड, डकस मॅन आणि ४९ हे शब्द दिले होते.

विराट कोहलीने लिहिलेली कविता, “फुलफिल योर डिजायर्स, इगनाइट द फायर, बॅट थ्रू द टफ टाइम्स, समटाइम्स इट्स 263 एंड समटाइम्स 49. लाइफ कॅन पुट यू इन ए पिकल, लाफ थ्रू लाइक इट्स ए टिकल, वेदर यू गेट ए हंड्रेड अॅन्ड ए डक, लाइफ गोज ऑन, डॉन्ट गेट स्टक.” व्हिडिओमध्ये, ६ मिनिटे २४ सेकंदांनंतर, विराटला कोणते शब्द आले आणि त्याने काय लिहिले ते तुम्ही पाहू शकता. विराटने मिस्टर नॅग्सला ३ मजेदार शब्दही दिले होते.

याचा अर्थ आहे की,तुमच्या इच्छा पूर्ण करा, तुमच्यात आग प्रज्वलित करा, कठीण काळात फलंदाजी करा, कधी २६३ होईल, कधी ४९ होईल. आयुष्य तुम्हाला कठीण परिस्थितीत आणू शकते, अशा प्रकारे हसा जसे गुदगुल्या झाल्यासारखे, तुम्हचे शतक होऊ किंवा डक, आयुष्य पुढे चालूच राहते, कोठेही अडकायचे नाही.

हेही वाचा – IPL 2023: एमएस धोनीला टीव्हीवर पाहताच चाहत्याने केली आरती; पाहा व्हायरल VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वी विराट कोहलीची मार्कशीट व्हायरल झाली होती –

विराट कोहलीने यापूर्वी त्याची १०वीची मार्कशीटही शेअर केली होती. यामध्ये त्याला ६०० पैकी ४२९ गुण मिळाले होते. ही मार्कशीट समोर आल्यानंतर विराटच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर चांगलीच धमाल केली होती.